Monday, 18 March 2019

नक्षलसमर्थक गुंडाना राजस्थानातून अटक

नागपूर,दि.18(विशेष प्रतिनिधी) :येथील पाचपावली पोलिसांच्या एका पथकाने राजस्थानातील बीजनगगर येथे जाऊन कुख्यात गुंड आणि नक्षल समर्थक इरफान चाचू तसेच नरेंद्र कोडापेसह १७ जणांना ताब्यात घेतले. त्या सर्वांना शनिवारी रात्री नागपुरात आणण्यात आले. मात्र, ज्याच्यासाठी पोलिसांनी सापळा लावला होता, तो कुख्यात नौशाद आणि इरफान पोलिसांना चकमा देऊन अजमेर जवळून पळून जाण्यात यशस्वी ठरला
शहरातील कुख्यात आणि मुख्य गुन्हेगारांच्या टोळींपैकी एक असलेली इप्पा टोळी संचलित करणारा तसेच पोलिसांना मोस्ट वॉन्टेड असलेला कुख्यात गुंड नौशाद तसेच इर्शाद राजस्थानमधील अजमेरकडे गेल्याची माहिती पाचपावली पोलिसांना गेल्या आठवड्यात मिळाली होती. त्यावरून परिमंडळ तीनचे उपायुक्त राहुल माकणिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांनी कारवाईची तयारी केली. त्यानुसार, पोलिसांचे एक पथक राजस्थानमध्ये रवाना करण्यात आले. या पथकाने तीन ते चार दिवस परिश्रम घेतल्यानंतर गुरुवारी आरोपी इरफान चाचू आणि नौशाद बीजनगरजवळ असल्याचे पोलिसांना कळले.पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी इरफान चाचू आणि अन्य १६ आरोपी पोलिसांच्या हाती लागले. नौशाद, इर्शाद त्यांच्या साथीदारांसह पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेले. ताब्यात घेतलेला इरफान चाचू हा कुख्यात गुंड असून तो तसेच त्याच्यासोबत पकडण्यात आलेला नरेंद्र कोडापे नक्षल समर्थक म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्याचे पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...