गडचिरोली दारूबंदी असलेला जिल्हा असल्याने इतर जिल्ह्यातून दारू व रसद पुरवठा होऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर तसेच ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी लावण्यात आली आहे. गडचिरोलीवरून जात असताना आरमोरी शहराच्या वेशीवर नाका लावण्यात आला आहे. या नाक्यावर आरमोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दिवस-रात्र तैनात आहेत. शनिवारी मध्यरात्री पोलीस नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत असताना नागपूरवरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाने नाक्यावर वाहन न थांबवता आरमोरी पोलीस ठाण्यात कार्यरत नायक पोलीस केवळराम येलोरे यांना जबर धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेनंतर कारचालक मोरेश्वर वामन हेडाऊ (रा. गोकुलनगर) गडचिरोली याला अटक करून (एमएच ३३, ८८८) या क्रमांकाची कार ताब्यात घेण्यात आली आहे. पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेश्वर हेडाऊ हा गडचिरोली येथील एका नामांकित व्यवसायिकाचा ड्रायव्हर असून तो आपल्या मालकाला नागपूर येथे सोडून गडचिरोली परत येत होता.
दरम्यान, दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन आणून त्याने पोलीस शिपायाच्या अंगावर चढविले. मृत पोलीस शिपाई गणेशपूर येथील रहिवासी असून ते आरमोरी पोलीस ठाण्यात कार्यरत असून ठाणेदाराचे रायटर म्हणून काम पाहत होते.रविवारी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस अधिक्षक बलकवडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी हजर होते.
No comments:
Post a Comment