Monday, 11 March 2019

पहिल्या टप्यात पुर्व विदर्भातील लोकसभा मतदारसंघाचा समावेश


गोंदिया जिल्हयात 10 लाख मतदार 1281 मतदान केंद्रावर मतदान करणार

गोंदिया,दि.10ः- केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली असून महाराष्ट्रात 4 टप्यात निवडणुका होणार आहेत.
त्यामध्ये  11 एप्रिल 7 जागांवर मतदान,18 एप्रिल 10 जागांवर मतदान,23 एप्रिल 14 जागांवर मतदान,29 एप्रिल 17 जागांवर मतदान होणार आहे.यातील पहिल्या टप्यात पुर्व विदर्भातील मतदारसंघाचा समावेश आहे.त्या पहिल्याटप्यात  ११ एप्रिल रोजी ज्या  ७ मतदारसंघात नि़वडणुक होणार आहे.त्यामध्ये वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम या मतदारसंघाचा समावेश आहे.तर दुसरा टप्पा- १८ एप्रिल- १० मतदारसंघात बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, #सोलापूर. तिसरा टप्पा- २३ एप्रिल- १४ मतदारसंघ यामध्ये जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले आणि चौथा टप्पा- २९ एप्रिलला १७ मतदारसंघात मतदान होणार आहे,त्यामध्ये नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, दक्षिण मुंबई, मावळ, शिरुर, शिर्डी या मतदारसंघाचा समावेश राहणार आहे.
पहिल्या टप्यात 18 मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होणार आहे.तर 25 मार्चला उमेदवारी अर्जभरण्याचा शेवटचा दिवस राहणार आहे.26 मार्चला उमेदवारी अर्जाची छाननी आणि 28 मार्चला उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस राहणार आहे.गोंदिया जिल्ह्यात भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघात 3 व गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात 1 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात 316 मतदान केंद्र असून 2 लाख 50 हजार259 मतदार राहणार आहेत.तिरोडा 295 केंद्र व  2 लाख 51 हजार 189 मतदार,गोंदिया 360 मतदार केंद्रात 3 लाख 12 हजार 591 मतदार मतदानाचा हक्क बजावतील तसेच आमगाव मतदारसंघात 310 केंद्र असून 2 लाख 61 हजार 897 मतदार आहेत.एकूण 1281 मतदान केंद्र तयार कऱण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे,पोलीस अधिक्षक विनिता शाहू व मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.राजा दयानिधी व जिल्हा उपनिवडणुक अधिकारी सुभाष चौधरी यांनी दिली.1541 सेनादलातील मतदारांची संख्या आहे.10 लाख 75 हजार 936 मतदार या चारही मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...