Tuesday 31 March 2020

मुख्यमंत्र्यासह सर्व लोकप्रतिनिधीचे ६० टक्के तर अधिकारी कर्मचार्याचे ५० टक्के वेतन कपात-उपमुख्यमंत्री पवार


मुंबई, दि. 31 :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे. 
राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.
‘कोरोना’चं संकट आणि ‘टाळाबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दिली.

पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात राज्य नियामक आयोगाची घोषणा


मुंबई,दि.31: महाराष्ट्रातील विविध संवर्गाकरिता महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात सरासरी 7 ते 8 टक्के कपात सुचविली आहे. आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज ही कपात  जाहीर केली.
गेल्या 10- 15 वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची दर कपात होत असून यामुळे सध्याच्या परिस्थितीत आर्थिक विकासाला चालना मिळण्यास प्रोत्साहन मिळेल असे श्री. कुलकर्णी यांनी याबाबतची घोषणा करतांना सांगितले.
केंद्र शासनाच्या विद्युत कायदा 2003 नुसार हा आयोग स्थापन करण्यात आला आहे. या आयोगाच्या अध्यक्षांव्यतिरिक्त मुकेश खुल्लर आणि इक्बाल बोहरी हे सदस्य आहेत. आयोगाचा दराबद्दलचे निर्णय सर्व वीज
निर्मिती, वीज पारेषण व वीज वितरण यांना बंधनकारक असतात.
आयोगाच्या निर्णयानुसार, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी उद्योगासाठीचे वीज दर तब्बल 10 ते 12 टक्क्यांनी कमी होणार असून घरगुती विजेकरिताचे दर 5 ते 7 टक्क्यांनी कमी होणार आहेत तर शेतीसाठीचे वीज दर 1
टक्क्यांनी कमी होणार आहेत.
मुंबईत बेस्टचे उद्योगासाठीचे वीज दर 7 ते 8 टक्क्यांनी, तर व्यवसायासाठीचे वीज दर 8 ते 9 टक्क्यांनी आणि घरगुती विजेचे दर 1 ते 2 टक्क्यांनी कमी होतील. मुंबईत बऱ्याच मोठया भागात टाटा आणि अदानी या कंपन्या वीज वितरण करतात. त्यांच्यासाठीही आयोगाने वीज दर कपात सुचविली आहे. त्यानुसार या कंपन्यांचे उद्योगासाठी विजेचे दर 18 ते 20 टक्क्यांनी तर व्यवसायासाठी विजेचे दर 19 ते 20 टक्क्यांनी आणि घरगुती वापराचे विजेचे दर तब्बल 10 ते 11 टक्क्यांनी कमी होणार आहेत.
या दरांची निश्चिती करताना सर्व संबंधितांशी प्रदीर्घ चर्चा करून आणि तपशिलवार अभ्यासाअंती आयोगाने हा निर्णय घेतल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले. या दर कपातीमुळे उद्योग- व्यवसाय यांना मोठा दिलासा मिळेल, ते
पुन्हा नव्याने उभारी घेण्यास सज्ज होतील, अशी आशा व्यक्त करून श्री. कुलकर्णी यांनी सांगितले की, ही दर कपात केवळ पुढच्या वर्षापुरती लागू राहणार नाही तर आयोगाने अशा प्रकारे इनबिल्ट पद्धत तयार केली आहे की
त्यानुसार ते दर येत्या 5 वर्षापर्यंत लागू राहतील. या निर्णयामुळे शासनाला कोणताही आर्थिक भार पडणार नाही. वीज वितरण कंपन्या अधिक व्यावसायिक पद्धतीने चालवून कमी दरामध्ये ग्राहकांना वीज पुरवण्यास सक्षम
असतील. तथपि वीज दरात कपात झाली आहे, म्हणून ग्राहकांनी विजेचा अनावश्यक वापर न करता गरजेपुरता वापर करावा, असे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.




महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचा याबाबतचा संपूर्ण निर्णय www.merc.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

Monday 30 March 2020

आरोग्य सेविकांचा ‘कोरोना’च्या प्रशिक्षणास जाण्यास नकार

गोंदिया,दि.30 मार्च -नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात आज 30 मार्चपासून देण्यात येणाऱ्या ‘कोविड १९’च्या व्हेंटिलेटर प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील महिला आरोग्य सेविकांनी जाण्यास दिला नकार दिल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील ९० आरोग्य सेविकांना नागपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात आज सोमवार (३० मार्च)पासून पाच दिवसीय ‘कोविड १९’ व्हेंटिलेटर प्रशिक्षण देण्यात येणार होते. मात्र  ९० आरोग्य सेविकांपैकी फक्त १२ आरोग्यसेविका रविवारला जाण्याच्या वेळेपर्यंत जिल्हा रुग्णालयात हजर झाल्या होत्या.त्यातच जिल्हा सामान्य रुग्णालयातील १० आरोग्य सेविकांनाही या प्रशिक्षणाला जायचे होते.मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील एकही आरोग्यसेविका नागपूरला जाण्यासाठी न आल्याने जिल्हाप्रशासन या आरोग्य सेविकांच्या मनातील भिती दूर करण्यात अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले.विशेष म्हणजे जिल्ह्यातच वैद्यकीय महाविद्यालय असताना आरोग्यसेविकांना बाहेरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी का पाठविण्यात येत आहे असा प्रश्न उपस्थित करीत काही आरोग्य सेविकांनी तर साधे व्हेंटिलटर समजत नसतांना त्याचे प्रशिक्षण देणे योग्य आहे का अशा प्रश्नच प्रक्षिणासाठी जायला आलेल्या १२ आरोग्य सेविकांनी करीत प्रशिक्षणास जाण्यास नकार दिला.त्यातच सर्व 900 आरोग्य सेविकांना रविवारला सायंकाळी ४ वाजता रुग्णालयात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले होते,मात्र सायंकाळचे ६ वाजूनही इतर आरोग्यसेविका उपस्थित न झाल्याने रुग्णालयात हजर झालेल्या १२ आरोग्य सेविकांनीही प्रशिक्षणाकरता जाण्यास नकार दिला.त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील एकही आरोग्य सेविका आजपासून नागपूर येथे सुरु होत असलेल्या प्रशिक्षणाला हजर न होऊ शकल्याने भविष्यात जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ झाल्यास उपचाराच्यावेळी मोठे संकट आरोग्य विभागासमोर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आत्ता ज्या आरोग्यसेविकांनी प्रशिक्षणाला जाण्यास नकार दिला,त्यांच्याबद्दल काय भूमिका आरोग्य विभाग व जिल्हाप्रशासन घेते याकडे लक्ष लागले आहे.

Sunday 29 March 2020

वाघाच्या हत्ल्यात इसमाचा मुत्यू

गोरेगाव,दि.29ः- तालुक्यातील शहारवानी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या धानुटोला येथील जंगलपरिसरात वाघाने सकाळच्या सुमारास फिरायला गेलेल्या इसमावर हल्ला केल्याने सदर इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज रविवारला सकाळच्या सुमारास घडली.सदर इसमाचे नाव अरुण भलावी असे आहे.

टोल बूथ’वर स्थलांतरितांच्या अन्नपाण्याची सोय करा- नितीन गडकरी

नागपूरदि.29 - देशभरात ‘लॉकडाऊन’मुळे हाती काम नसल्याने विविध ठिकाणी मजूर व कामगार मूळ गावी स्थलांतर करत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत या लोकांच्या पोटापाण्याची ‘टोल बूथ’वर सोय होऊ शकते. यासंदर्भात पुढाकार घ्यावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘एनएचएआय’च्या (नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया) अध्यक्षांना दिला आहे.
सोबतच ‘टोल ऑपरेटर्स’लादेखील आवाहन केले आहे.लॉकडाऊन’मुळे सर्वच शहरांतील कामे, आस्थापना बंद आहेत. कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यांतून किंवा राज्यातून मोठ्या शहरांत मोठ्या प्रमाणात मजूर व कामगार आले होते. हातावर पोट असलेल्यांची कमाईच बंद आहे. त्यामुळे खाण्यापिण्याची आबाळ होत आहे. शिवाय ‘कोरोना’चादेखील धोका आहे. त्यामुळेच बरेचजण गावांकडे परतताना दिसून येत आहेत.गावांकडे स्थलांतरित होणारे मजूर-कामगार यांची ‘टोल बूथ’वर खाण्यापिण्याची सोय होऊ शकते. शिवाय त्यांच्या आरोग्यासंबंधीदेखील सुविधा निर्माण केली जाऊ शकते, अशी सूचना गडकरी यांनी ‘एनएचएआय’च्या अध्यक्षांना केली आहे. ही संकटाची स्थिती आहे. अशा काळात ‘टोल बूथ आॅपरेटर्स’देखील या आवाहनाला प्रतिसाद देतील व देशबांधवांसाठी आवश्यक त्या सुविधा प्रदान करतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

Saturday 28 March 2020

सौंदड येथे अडीच लाखाचा अवैध दारू साठा जप्त

देवरी,दि.28 - राष्ट्रीय महामार्गावरील सौंदड येथे अप्पल पोलिस अधीक्षकांच्या भरारी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे धाड घालून सुमारे अडीच लाख रुपये किमतीची देशी-विदेशी दारू सह मोहफुलाचा सडवा जप्त केला. ही कार्यवाही आज सकाळी (दि.28) रोजी करण्यात आली. याविषयी डुग्गीपार पोलिसांत दोन आरोपींविरुद्ध गन्ह्याची नोंद करण्यात आली.
सविस्तर असे की, देवरीचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना डुग्गीपार पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सौंदड या गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री व साठा याची माहिती मिळाली. या माहितीवरून गोंदियाचे पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांचे मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पथकातील अधीक्षकांचे वाचक सहायक पोलिस निरीक्षक विजय धुमाळ, पोलिस नायक खोटेले. खडसे, राउत, पोलिस शिपाई झोडे आणि मडावी यांनी सौंदड येथे सापळा कार्यवाही केली. यामध्ये  सकाळी साडे आठ वाजता सौंदड येथील संतोष तुळशीराम सावळकर यांचे राहत्या घराची झळती घेतली असता एका खोलीत एका स्टीलच्या ड्रम मध्ये डिप्लोमेट व्हिस्कीचे 4 पव्वे आणि मॅक डोवेल्सचे 21 पव्वे असा 2 हजार 948 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस नायक खडसे यांचे तक्रारीवरून आरोपी सावळकर याचे विरुद्ध डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार अण्णा ब्राम्हणकर हे करीत आहेत. दुसरी सापळा कार्यवाही सकाळी सव्वा दहा वाजता करण्यात आली. यामध्ये सौंदड येथीलच संतोष राजाराम बनकर यांच्या नवीन घरावर धाड टाकण्यात आली. यामध्ये 35 हजार किमतीचे  टायगर ब्रॉंडचे 14 पेट्यांतील 672 पव्वे, 98 हजार 800 रुपये किमतीचे टायगर ब्रांड 90 मिलीच्या 38 पेट्या , 54 हजार 580 रुपये किमतीचे  बी के प्रिमिअमचे 22 पेट्या आणि 54 हजार 400 रुपये किमतीचे 38 पोते मोहफुलाचा सडवा असा एकूण 2 लाख 42 हजार 780 रुपयांचे मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणातील आरोपी  संतोष बनकर हा फरारी आहे. या प्रकरणी पोलिस नायक राऊत यांचे तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक धर्मशिल सोळंके हे पुढील तपास करीत आहेत.

6 पान ठेला संचालकों पर जुर्म दर्ज

गोंदिया,28 मार्च - कोरोना वायरस के संक्रमण को रोकने के लिए जिला प्रशासन ने एहतियातन कदम उठाते हुए जिले में रोग निवारण प्रतिबंधात्मक कायदा 1897 लागू कर दिया है । उपाय योजना के तहत जिले के सभी पान टपरी और तंबाकूयुक्त पदार्थ की बिक्री करने वाले दुकानों को बंद रखने के निर्देश जिलाधिकारी द्वारा दिए गए हैं। बावजूद इसके सिविल लाइंस के फेंडारकर वार्ड , मामा चौक , गुर्जर चौक , कुड़वा नाका , रानी अवंतीबाई चौक ( रिंग रोड ) तथा फुलचुर पेठ के सेल टैक्स कॉलोनी निकट स्थित पान सेंटर पर गुटखा व पाऊच की बिक्री की जा रही थी ,, पुलिस ने कार्रवाई करते हुए उक्त पानठेलों के संचालकों के खिलाफ धारा 188 के तहत थाने में जुर्म दर्ज किया है।

घरी राहणे हाच कोरोनापासून बचावाचा उत्तम उपाय- विजय बोरुडे




देवरी,दि.28 -  कोरोना (कोविड-19) या विषाणूच्या प्रसारामुळे आज जगावर मोठे संकट घोंघावत आहे. या रोगावर अद्याप तरी हमखास उपाय उपलब्ध नाही. संसर्ग टाळणे हाच एक रामबाण उपाय आपल्या हातात आहे. त्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. याचे गांभीर्य जनतेने लक्षात घेणे अत्यावश्यक झाले आहे. जर आपल्याला आपले जीवन वाचवायचे असेल,तर प्रत्येकाने शासन-प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले पाहिजे. जर परिस्थिती वेळीच सावरण्यासाठी आपण मदत केली नाही. तर आपल्या हातात काहीही शिल्लक उरणार नाही, अशी सूचनावजा इशारा देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी देत जनतेला स्वतःच्या घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.
Image may contain: 1 person, smiling
नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने एक सूचक आणि धोक्याचा इशारा दिलेला आहे की भारतात कोरोना विषाणू ने बाधित रुग्णांच्या संख्येत अचानक मोठी वाढ होऊ शकते. त्यावर संपूर्ण लॉकडाऊन पाळून कोरोना विषाणू पासून बचावासाठी घरी राहणे, लोकांपासून अलिप्त राहणेहाच एकमेव उपाय असल्याचे श्री बोरुडे यांनी सांगितले.
 जीवनावश्यक वस्तू बाबत देवरी  तालुक्यात सर्व नागरिकांना वेळेवर सर्व सुविधा उपलब्ध होतील, यासाठी प्रशासनाने पूर्ण नियोजन केलेले आहे

1 पेट्रोल  सर्वांना उपलब्ध करुन दिले आहे. परंतु,  ज्यांना खरच आवश्यक आहे त्यांनीच पेट्रोलपंप वर यावे, अत्यावश्यक सेवा मेडिकल, हॉस्पिटल, किराणा ,भाजीपाला ,दुधाचे टँकर आदी वाहनांना  प्राधान्य दिले आहे.

2 किराणा दुकानदार आपणास घरपोच सेवा देण्यास तयार आहेत. त्याबाबत संबंधित सर्व किराणा दुकानदार यांना सूचना दिल्या आहेत. घरपोच सेवेसाठी मुख्याधिकारी नगरपंचायत देवरी अजय पाटनकर (9765332928)   यांचेशी सम्पर्क करावा.

3 भाजीपाला किराना सामान साठी सकाली 9 ते 2 या वेळेत घरातील 1 जण सर्व ती काळजी घेऊन या वेळेखेरीज कोणीही बाहेर पडू नये . संपर्क विरेश आचले  (9987346711)


4 मेडिकल आणि हॉस्पिटल ची सुविधा आपणास 24 तास उपलब्ध करुन दिली आहे, देवरी  तालुक्यातील सर्व हॉस्पिटल आणि सर्व खाजगी डॉक्टर यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत 
वैद्यकीय सेवेसाठी  साठी उत्पल शर्माजी (8888670904, 8208819741),ड़ॉ गुल्हाने  (9226058060) आणि ड़ॉ  ललीत कुकडे ( 9422509770) यांचेशी संपर्क करावा.


5 देवरी  तालुक्यातील सर्व गॅस वितरक यांना घरपोच गॅस सिलेंडर देणेबाबत सक्त सूचना देण्यात आली आहे,
 संपर्क सुधीर  (9422131133) आणि नरवरे  (9422961511)


6 फळे , भाजीपाला यांची ने आण 
तालुक्यात कुठेही करणेसाठी काही अडचण नाही फक्त इतर जिल्ह्यात किंवा राज्यात पाठविणेसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.  संपर्क राजपूत ( 9527627800)

7. दूध -24 तास सेवा करिता निखिल शर्मा 8669154530

8. हात मजूरी करणारे, पर राज्यातुन येथे काही कालावधीसाठी वास्तव्यास असलेले, तसेच इतर कारणा स्तव आपल्या तालुक्यात अड्कूण पड्लेले नागरिक असतील त्यांचे खाण्या पिण्या चा प्रश्न निर्माण झाला असेल तर
आपल्या मधुन च काही चांगले लोक या कामा साठी मदत देण्यास तयार आहेत. त्यासाठी सम्बंधीत गावच्या सरपंच पोलिस पाटिल तलाठी ग्राम सेवक कृषि सहायक व नगर पंचायत साठी संबंधीत वार्ड चे नगर सेवक यांना कल्पना देण्यात यावी, जेणे करुन प्रशासन त्यांची व्यवस्था करु शकेल... काही अडचण आल्यास खालील मोबाइल वर  सम्पर्क करा.
 9422132755, 9405513500, 7218942626,9823568058, 9923139597, 7378730000, 9422817611, 9673030203, 9579280120,  9923916000,  9423415777, 
9545211553

9. तहसील च्या कोणत्याही कामाकरिता सम्पर्क करावा
ओंकार ठाकरे 9860920869, मोहसिन खान 8788224017,प्रवीण राऊत 9673031266,बन्डू केवट 9823582158

 महसूल, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग फक्त आपली आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्यावर आले आहेत , वेळ प्रसंगी कठोर भूमिका घेऊन कारवाई करावी लागत आहे. आम्हाला देखील कुटुंब आहे , परंतु आज आम्ही तुमची सुरक्षितता याला प्रथम प्राधान्य दिले आहे ,

 आपली लढाई एका अदृश्य शक्ती विरुद्ध आहे आणि ती आपल्याला जिंकायचीच. यासाठी बाहेप पडून विनाकारण प्रशासनावर ताण न आणता सहकार्य करावे, असे आवादन तहसीलदार बोरुडे यांनी केले आहे. आपात स्थितीमध्ये नागरिकांनी श्री बोरुडे यांच्या भ्रमणध्वनीवर  9834479978, 7588365265 संपर्क करावा.
         

गौरनगर येथे सॅनिटाइझर औषधी फवारणी

अर्जुनी मोरगाव,दि.28ः तालुक्यातील गौरनगर येथे ग्रामपंचायतीच्यावतीने संपूर्ण गावात कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून औषधी फवारणी करण्यात आली.यावेळी सरपंच वंदना अधिकारी,उपसरपंच विका वैद्य व सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय बिश्वास,देवनाथ सरकार,तापण सरकार,विश्वजित मंडल,जि.प.शाळेचे मुख्याध्यापक महेंद्रा कोहाडकर हे सुद्धा उपस्थित होते.21 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये बाहेरील व्यक्तीला गावात प्रवेश दिला जात नाही. तसेच घरातून कुणीही बाहेर पडू नये यासाठी ग्रामस्थांनी सुचना देत तपासणी मोहिम राबविली आहे.तसेच गावातील बैठकी साठी असलेले आसन उलटे करून त्यांना काळे फासले आहे.अन्नधान्याचा तुटवडा पडल्यास शालेय पोषण आहार अंतर्गत शिल्लक साठा घरपोच पोहचवून देण्यात येइल असे मुख्यध्यापक महेंद्रा कोहाडकर यांनी म्हटले आहे.

प्रशासन निर्देशाला ठेंगा: सौदंड,आमगाव,इटखेडा व बोंडगावदेवीत भरले आठवडी बाजार

इटखेडा व बोंडगावदेवी येथील सरपंच,सचिवासह इतरावर गुन्हे दाखल
आमगाव/अर्जुनी मोरगाव /सडक अर्जुनी,दि.28:-देशात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत २१दिवस लॉकडाऊन जाहिर करण्यात आले.तसेच संपूर्ण देशात कलम १४४ व संचारबंदी लावण्यात आली आहे. नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होणार नाही याकरीता स्थानिक जिल्हाप्रशासन वेळोवेळी मार्गदर्शक सुचना देत असतानाही त्या सुचना व निर्देशाकडे दुर्लक्ष करीत आमगाव,अर्जुनी मोरगाव तालुक्याती इटखेडा व बोंडगावदेवी आणि सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे स्थानिक प्रशासनाने गर्दी टाळण्याच्या निर्देशाला ठेंगा दाखवित आठवडी बाजार भरविल्याने नागरिकात चांगलाच रोष उफाळून आला आहे.दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा व बोडंगाव देवी येथील सरपंच,सचिवासंह काही नागरिवार पोलीस ठाण्यात प्रशासनाच्यावतीने शासन नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार रद्द करण्याचे निर्देश दिले होते.त्यानंतरही त्या सर्व ठिकाणी बाजार भरविण्यात आले.सोबतच सौंदड ग्रा.प.ने पालन केल्याचे दिसत नाही.ग्रा.प.ने २५ मार्चला बुधवारला आठवडी बाजार भरवला.या बाजारात मोठी गर्दी दिसून येत होती.मात्र याकडे पोलीस विभागाने सुद्धा लक्ष दिले नाही.यामूळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील आठवडी बाजार दोन आठवडे बंद करण्याचे आदेश तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सडक अर्जुनी यांनी दिले असतांनी सुध्दा सौंदड येथील आठवडी बाजारात दुकाने थाटण्यात आली होती.कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी व प्रतिबंध उपाय म्हणून सडक अर्जुनी तालुक्यातील आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश १६मार्चला तहसीलदार सडक अर्जुनी यांनी सर्व ग्रा.प.ला बजावले होते.सौंदडचे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी आठवडी बाजार लावण्यास मनाई केली नाही.भाजी विक्रेत्यांनी ग्रामीण रुग्णालयापासून सुंदरी रोडापर्यंत दुकाने थाटली होती.यासंदर्भात उपाय योजना करण्यासाठी पोलिस विभागाने काही ठोस पावले उचलली नाही.यामुळे नागरिकाकडूनरोष व्यक्त केला जात आहे.

शिरपूर/बांध गावात नो एन्ट्री : कोरोनाला गावाबाहेरच रोखणार, या गावाचा निर्धार

देवरी,दि.28: जमावबंदी, संचारबंदी अशा उपाययोजनांना न जुमानता बाहेर पडणाऱ्या नागरिकांसमोर देवरी तालुक्यातील  शिरपुर/बांध या गावाने आपत्कालीन स्थितीआधीच कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी कशी करायची याचा आदर्श घालून दिला आहे.
  या गावातील लोकांनी गावाच्या सीमा बंद करून गावबंदी केली आहे. कोरोनाला गावाबाहेरच रोखण्याचा निर्धार या गावकऱ्यांनी केला आहे. कोरोनाचं संकट संपूर्ण देशभर फैलावलं आहे आणि देवरी तालुक्यातील  बहुतांशी गावातील लॉकडाऊन केलं आहे. देशभरातही ३२ राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तरीही अनेक ठिकाणी नागरिक रस्त्यावर दिसत आहेत. आपत्कालिन स्थितीत जी खबरदारी घ्यायला हवी त्या नागरी शिस्तीचा अभाव काही ठिकाणी दिसत असताना शिरपुर/बांध गावातील युवकांनी एकत्र येऊन गावाच्या सीमा सील केल्या आहेत. गावातील कुणीही व्यक्तीनं गावाबाहेर पडायचं नाही आणि गावाबाहेरील कुणीही व्यक्तीला गावात प्रवेश द्यायचा नाही, असा कठोर निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
गावाची सीमा सील करताना गावातील युवकांनी मोठमोठे दगड आणि मोठमोठी लाकडं रस्त्यावर आडवी ठेवली आहेत. त्यामुळे कोणतंही वाहन गावात येऊ शकणार नाही, याची व्यवस्था गावकऱ्यांनी केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यभरात शाळा, कॉलेज बंद करण्यात आले. कार्यालयंही बंद करण्यात आली. मुंबईसह अन्य शहरांत लॉकडाऊन करण्यात आलं. सर्वांना घरीच राहायचे असल्यानं मुंबई, पुण्यासह शहरांत राहणाऱ्या अनेकांनी आपआपल्या गावी जाणं पसंत केलं. त्यामुळे गावाकडे येणाऱ्या लोकांचा ओघ वाढला आणि सिरपुर हे गाव एन.एच.6या महामार्गावर असून राज्य सिमा शुल्क तपासणी नाका असल्यामुळे येथे बाहेरिल वाहने येवून थांबतात त्यामुळे कोरोनाचे संक्रमण पसरण्याची भिती जास्त असल्याने गावकर्यांनी गाव बंदी लॉक डाऊन चे निर्णय घेतले.

‘लॉकडाऊनचा कालावधी वाढणार’ ; २१ दिवसाहून थेट ३ महिने करण्याचा सरकारचा विचार

(डेस्क न्युज बेरार टाईम्स)ः सध्या पूर्ण राज्यामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. पूर्ण राज्यासहित देशात देखील लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे कोरोना विषाणूला आवरणे सरकारला सोपे पडत आहे. सरकार विषाणूला रोखण्यासाठी योग्य ती कारवाही केली जात आहे. या लॉकडाऊन मध्ये नागरिकांना घराच्या बाहेर पडता येत नाही.घराच्या बाहेर पडला की पोलीस कारवाहीला सामोरे जावे लागते आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊन पालन करत आहेत. ३१ मार्च पर्यंत कोणीही घराच्या बाहेर पडू नये असे आदेश राज्य सरकारने दिले होते त्यानंतर या प्रकरणाची गांभीर्यता पाहता, केंद्र सरकारने २१ दिवस म्हणजे १४ एप्रिल पर्यंत कालावधी वाढवला.
मात्र सध्या सरकार हा २१ दिवसांचा कालावधी वाढविण्याचा विचार करत आहे. कोरोना विषाणूची सध्याची परिस्थिती जर अशीच राहिली, तर हा कालावधी २१ दिवसांहून ३ महिन्यांपर्यंत करण्यात येणार असल्याचा, सरकारचा विचार आहे. या २१ दिवसापर्यंत जर विषाणू कमी नाही झाला तर हे ३ महिने कालावधी वाढविण्याचा विचार सरकार करत आहे.यामुळे सरकारच्या सूचनांचे पालन करायला सरकार सांगत आहे. कोणीही घराच्या बाहेर पडणार नाही. बाहेर पडल्यावर कठोर कारवाही होणार आहे. त्यामुळे नागरिक सध्या घरात बसून पूर्णपणे लॉकडाऊनला सहयोग करताना दिसत आहेत.

सायकलने नागपूरवरुन निघाले ककोडीचे 16 कामगार

साकोली(राकेश भाष्कर),दि.28ःःकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने २१ दिवसांच्या लॉक डाऊन केला आहे. परिणामी सर्वच बससेवेसह रेल्वे वाहतूक ठप्प पडली आहे. त्यामुळे मजुरीसाठी दुसऱ्या शहर व राज्यात गेलेल्या मजुरांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.त्यातच गोंदिया जिल्ह्यातील ककोडी भागातील काही मजुर हे कामानिमित्त नागपूरला गेले होते.त्या मजुरांनी साधनाअभावी सायकलने सुमारे 150 किलोमीटरचा प्रवास सुरु केला आहे.
शुक्रवारच्या रात्री हे मजुर साकोली येथे दाखल झाले.दरम्यान त्या 16 मजुरामधील एकाची सायकल नादुरुस्त झाल्याने ती दुरुस्त करण्यात आली.त्याच काळात साकोली येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या 16 मजुरांना जेवण घातले.जेवण घेतल्यानंतर त्या मजुरांनी साकोलीवरुन ककोडीकडे सायकलने आपल्या गावाचा रस्ता धरला आहे.असे अनेक मजुर विविधठिकाणी अडकले असून सरकारने यांनाही पोचविण्याची सोय करायला हवी असा सुर येत आहे.विदेशात अडकलेल्यासांठी जर विमान पाठविले जात असेल तर राज्यात व देशातल्या देशात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी प्रशासन सोय का करीत नाही असा प्रस्न मध्यप्रदेशातील मंडला मजुरांना गावाकडे परतण्यासाठी कुठलेही साधन न मिळाल्याने त्यांनी शुक्रवारी (दि.२७) पहाटेपासून गोंदिया ते मंडला हे दोनशे कि.मी.चा प्रवास रेल्वे मार्गाने पायीच सुरू केला.मध्यप्रदेशातील मंडला बैहर येथील १३ मजूर मुंबई येथे मजुरीच्या कामासाठी गेले होते. मात्र कोरोनामुळे तेथील काम बंद झाल्याने त्यांना संबंधित ठेकेदाराने गावाकडे परत जाण्यास सांगितले. त्यामुळे हे सर्व मजूर २४ मार्च रोजी गोंदिया येथे कसे तरी पोहचले. मात्र यानंतर देशभरात सर्वत्र लॉकडाऊन व राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या. तर रेल्वेसह इतर वाहतूक ठप्प झाली. खासगी वाहने सुध्दा बंद असल्याने त्यांना मंडला
हे सोळा मजुर रात्री नागपुर वरुन काकोडी च्या समोर सायकल ने निघाले आहेत साकोलीत एक सायकल पंचर झाली , दुरुस्ती सुरु आहे पोलेतेक्नीक रोड थांबले आहेत

लॉकडाउन पुरेसे नाही, गरिबांना बसणार सर्वाधिक फटका - रघुराम राजन

CoronaVirus: Lockdown is not enough, the worst hit to the poor - Raghuram Rajan | CoronaVirus : लॉकडाउन पुरेसे नाही, गरिबांना बसणार सर्वाधिक फटका - रघुराम राजननवी दिल्ली,दि.28 - कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी केवळ लॉकडाउनच पुरेसे नाही, असा इशारा रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.
रघुराम राजन यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ही एक मोठीच चिंतेची बाब आहे. कारण लॉकडाउनमुळे लोक कामापासून दूर राहतील. मात्र, त्यामुळे ते विलग स्थळी राहतीलच, असे नाही. काही लोक एखाद्या झोपडपट्टीतीलही असतील. घरी राहिल्याने त्यांच्या निवास परिसरात गर्दी वाढून विषाणू प्रसाराचा धोका वाढेल.राजन यांनी सांगितले की, लॉकडाउन हे गरिबांसाठी अधिक कठीण ठरणार आहे. लॉकडाउनमुळे देशातील सर्व व्यावसायिक घडामोडी बंद झाल्या आहेत. कोरोना विषाणूविरोधी लढ्यात पायाभूत सुविधांची कमतरता ही एक अडथळा बनू शकते. त्यामुळे सर्व संसाधने साथ नियंत्रणासाठीच वापरायला हवीत. लॉकडाउनमुळे भारताच्या समस्या आणखी गंभीर बनतील. राजन यांनी म्हटले की, कोरोना विषाणूच्या लढाईत श्रीमंत देशांनी अविकसित देशांना संसाधने उपलब्ध करून देण्यासाठी मदत करायला हवी. गरीब देश आधीच व्हेंटिलेटरच्या टंचाईने ग्रस्त आहेत. ही समस्या आता आणखी गंभीर बनली आहे. राजन यांनी म्हटले की, हा विषाणू जगातील प्रत्येक देशातून नष्ट करावा लागेल; अन्यथा तो पुन्हा परत येईल.विषाणूची दुसरी आणि तिसरी लाट येणेही शक्य आहे.त्यादृष्टीने सर्व नजरा चीनकडे असायला हव्यात.

कोरोनीशी लढण्यासाठी राहुल गांधी, थरूर, अँटोनींनी दिले प्रत्येकी २.६६ कोटी रुपये

CoronaVirus: Rahul Gandhi, Tharoor, Antoine paid Rs2.66 crore each | CoronaVirus : राहुल गांधी, थरूर, अँटोनींनी दिले प्रत्येकी २.६६ कोटी रुपयेथिरुवनंतपुरम,दि.28 - काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, ए. के. अँटोनी आणि शशी थरूर यांनी आपापल्या मतदारसंघांत कोरोना विषाणूविरुद्ध (कोविड-१९) लढण्यासाठी खासदारांना मिळणाऱ्या स्थानिक भाग विकास निधी योजनेतील (एमपीएलएडीएस) पैसा उपलब्ध केला आहे.
राहुल गांधी यांनी २.६६ कोटी आपल्या वायनाड, थरूर यांनी २.६६ कोटी थिरुवनंतपुरम, तर ए. के. अँटोनी यांनी त्यांच्या अलाप्पुझा जिल्ह्यासाठी २.६६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या योजनेंतर्गत लोकप्रतिनिधी जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या मतदारसंघात कोणत्या प्रकल्पावर निधी खर्च करायचा याची शिफारस करू शकतात. केरळमधील इतर लोकप्रतिनिधीही या योजनेंतर्गत राज्यात कोरोना विषाणूशी लढण्यासाठी निधी मंजूर करतील, असे समजते. केरळमध्ये ७८ हजारांपेक्षा जास्त जणांना सध्या कोरोनाची संशयित लक्षणे आहेत, म्हणून एक तर घरात किंवा रुग्णालयांत क्वारंटाईन केले गेलेले आहेत. केरळमध्ये ११८ लोक कोरोना विषाणूच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत.तत्पूर्वी, आदल्या दिवशी शशी थरूर यांनी ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलेल्या आवाहनात म्हटले होते की, ‘‘नव्या पार्लमेंट इमारतीसाठी काढून ठेवलेले २० हजार कोटी आणि सेंट्रल व्हिस्टासाठीचे १५ हजार कोटी रुपये कोविड-१९ शी लढण्यासाठी उपलब्ध करून द्यावेत. याचा अर्थ प्रत्येक जिल्ह्यासाठी केवळ २० कोटी रुपये असतील. अतिभव्य इमारतींवर आजच्या परिस्थितीत एवढा खर्च करणे ही लांबणीवर टाकता येईल अशी चैन आहे.

लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या व्यथा, वेदना कमी करा; राष्ट्रपती रामनाथ कोविंद

Lockdown, alleviate the pain of the poor; President Ram Nath Kovind and Vice President M Appeal by Venkaiah Naidu | लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या व्यथा, वेदना कमी करा; राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आवाहननवी दिल्ली,दि28 - सरकारने लागू केलेल्या पॅकेजची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशातील नायब राज्यपाल आणि प्रशासनातील वरिष्ठांनी सक्रिय सहकार्य करावे. लॉकडाऊनच्या काळात गरिबांच्या व्यथा, वेदना कमी करा, असे आवाहन यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांनी सर्व राज्यांना केले.

ते विविध राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल आणि प्रशासनातील वरिष्ठांसोबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सला संबोधित करीत होते. कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायांची चर्चा यावेळी करण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, हरयाणा, गुजरात, राजस्थान, तेलंगणा आणि पंजाबचे राज्यपाल व दिल्लीचे नायब राज्यपाल व चंदीगडमधील प्रशासनातील वरिष्ठांनी भाग घेतला. या संकटाच्या काळात असंघटित क्षेत्रातील कामगार आणि निराधारांपर्यंत सरकारी उपाययोजना पोहचविण्याचे आवाहन यावेळी सर्व राज्यांना करण्यात आले. या व्हिडिओ कॉन्फरन्सला १४ राज्यांचे राज्यपाल उपस्थित होते.महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. त्यानंतर केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती दिली. केरळातील १८०० निवृत्त डॉक्टर, एमबीबीएसचे विद्यार्थी यांची मदत घेतली जात आहे. लोकांमध्ये जागृती करण्यासाठी ३७५ मानसशास्त्रज्ञांचीही मदत घेतली जात आहे.तेलंगणाचे राज्यपाल डॉ. तमिलसाई सुंदरराजन यांनी सांगितले की, राजभवन परिसरात राहणाºया ८०० गरजू कुटुंबांना भोजन उपलब्ध करुन दिले जात आहे. एम. व्यंकय्या नायडू यांनी तेलंगणाच्या राज्यपालांना सूचना केली की, चित्रपट कलाकार, लेखक आणि बुद्धीजीवी लोकांची मदत घेतली जावी. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी कोरोनाशी लढण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी राज्य सरकारच्या उपाययोजनांची माहिती दिली.ज्येष्ठ, दिव्यांगांना आगाऊ पेन्शन- विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना तीन महिन्याची पेन्शन आगाऊ देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रमांतर्गत (एनएसएपी) ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांगांना ही पेन्शन दिली जाते. हा कार्यक्रम केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतो.- ही रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा होते. २.९८ लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. एनएसएपी अंतर्गत २०० प्रति महिना पेन्शन ६० ते ७९ वर्षांदरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना दिली जाते. तर, ८० वर्षांवरील ज्येष्ठांना ५०० रुपये प्रति महिना दिले जातात.

भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ८७९ , २० जण दगावले

CoronaVirus: 879 cases of Coronavirus in India | CoronaVirus : भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८७९ वर पोहोचली, आतापर्यंत २० जणांचा मृत्यूनवी दिल्ली,दि.28 : भारतात शुक्रवारी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोविड-१९ रोगाने मरण पावलेल्याची संख्या २० झाली असून संसर्गित रुग्णांची संख्या ८७९ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत नवीन ७५ रुग्ण आढळले.एकीकडे भारतात लॉकडाऊनसोबत तपासणीला गती दिली जात असताना संसर्गित रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंताजनक बाब आहे. शुक्रवारी केरळमध्ये ३९ आणि मुंबईत कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेले ९ रुग्ण आढळले. जम्मू-काश्मिरमध्ये आणखी चौघांना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले असून यापैकी दोघे विदेशातून आले होते.

Friday 27 March 2020

लॉकडाऊनमुळे मजुरांचा गोंदिया ते बैहर दोनशे कि.मी.चा पायी प्रवास

गोंदिया,दि.२७ : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने २१ दिवसांच्या लॉक डाऊन केला आहे. परिणामी सर्वच रेल्वेसह सर्वच वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे मजुरीसाठी दुसऱ्या शहर व राज्यात गेलेल्या मजुरांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. मध्यप्रदेशातील मंडला मजुरांना गावाकडे परतण्यासाठी कुठलेही साधन न मिळाल्याने त्यांनी शुक्रवारी (दि.२७) पहाटेपासून गोंदिया ते मंडला हे दोनशे कि.मी.चा प्रवास रेल्वे मार्गाने पायीच सुरू केला.मध्यप्रदेशातील मंडला बैहर येथील १३ मजूर मुंबई येथे मजुरीच्या कामासाठी गेले होते. मात्र कोरोनामुळे तेथील काम बंद झाल्याने त्यांना संबंधित ठेकेदाराने गावाकडे परत जाण्यास सांगितले. त्यामुळे हे सर्व मजूर २४ मार्च रोजी गोंदिया येथे कसे तरी पोहचले. मात्र यानंतर देशभरात सर्वत्र लॉकडाऊन व राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या. तर रेल्वेसह इतर वाहतूक ठप्प झाली. खासगी वाहने सुध्दा बंद असल्याने त्यांना मंडला बैहर येथे जाण्याची अडचण निर्माण झाली. त्यांनी गोंदिया येथे दोन दिवस कसे बसे काढले. मात्र आता त्यांच्याकडील पैसे संपल्याने आणि जेवणाची देखील सोय नसल्याने उपाशी राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. दरम्यान शुक्रवारी पहाटे ४ वाजताच या सर्व १३ मजुरांनी पायीच आपल्या गावाला जाण्याचा निर्धार केला. यानंतर गोंदियाहून बालाघाटकडे जाणाºया रेल्वे मार्गाने  त्यांनी आपल्या सामानासह गोंदिया ते मंडला बैहर या दोनशे किमीच्या पायी प्रवासाला सुरूवात केली. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय असून यात काही लहान मुलांचा सुध्दा समावेश आहे.लॉकडाऊनमुळे सध्या विविध राज्यात कामासाठी गेलेले मजूर आपल्या गावाकडे परतत असताना अनेक ठिकाणी फसले आहे. मात्र शासनाने अद्यापही अशा लोकांची कुठलीच व्यवस्था केली नाही. त्यामुळे या मजुरांना उपाशी तापाशी आणि पायी आपले गाव गाठण्याची वेळ आली आहे.

खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत परराज्यातील अडकलेल्या नागरिकांची काळजी घेणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि 27: खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहनांतून प्रवासी प्रवास करताना केली जाईल . राज्यांच्या सीमा बंद असून आता इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी वर्षा येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील महत्वपूर्ण सूचना केल्या. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता , पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंह , मनपा आयुक्त प्रवीण परदेशी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले कि, खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाव्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात त्यांची गैरसोय होऊ नये. लवकरच आपण अत्यावश्यक सेवेतील सर्वाना ओळखपत्र देत आहोत त्यात डॉक्टर, त्यांच्याकडील कर्मचारी सर्वांचा समावेश असेल.
आपल्या जिल्ह्यात परदेशांतून गेल्या १५ दिवसांत जर कुणी प्रवास करून आले असेल तर जिल्हाधिकारी यांनी त्यांची माहिती घ्यावी व सदरील व्यक्तींची तपासणी करून घेणे महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित राहील , औषधी लोकांना मिळतील हे पाहावे. शेतकरी आणि विशेषतः: शेतीच्या कामासाठी जा ये करणारे याना अडथळा होणार नाही हे पाहावे.कोणत्याही परिस्थितीत इतर राज्यांतून आपल्या राज्यात येऊन थांबलेल्या नागरिकांची इथेच आम्ही काळजी घेऊ , त्यांना लॉक डाऊन पूर्ण होईस्तोवर परत पाठवणे शक्य होणार नाही. महाराष्ट्रातले लोक जर इतर राज्यांत कुठे अडकले असतील तर त्यांचीही त्या त्या राज्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.
जीवनावश्यक वस्तूंसाठी उपयोगात आणली जाणारी वाहतूक पोलीस अडवणार नाहीत पण कोणत्याही परिस्थितीत अशा वाहनांमधून या कामाशी संबंधित नसलेले लोक प्रवास करताना आढळले तर कारवाई केली जाईल.प्रत्येक जिल्ह्यात किती रुग्ण क्वारंटाईन करू शकतो तसेच कोरोना साठी किती वॉर्ड किंवा रुग्णालय राखून ठेवू शकतो त्याचे व्यवस्थित नियोजन करून तात्काळ कळवावे.कोरोना विरुद्धच्या या लढाईत आपण अतिशय नियोजनपूर्व पद्धतीने जात आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक कामाची योग्य विभागणी करावी, अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून द्यावी व मुख्यालयाच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले
पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे, त्यांनी डोके शांत ठेवावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात किराणा, भाजीपाला घेण्यासाठी काही ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून नागरिकांमध्ये योग्य अंतर ठेवण्याच्या कल्पनांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

कोरोना जैसी आपदा से निपटने हेतु सासंद निधीसे भंडारा-गोंदिया जिला प्रशासन को 25-25 लाख

गोंदिया,27 मार्च। संपूर्ण भारत में वैश्विक महामारी से सबसे अधिक जूझ रहे महाराष्ट्र में इस कोरोना वायरस (कोविड-19) की रोकथाम हेतु केंद्र व राज्य सरकार द्वारा भरपूर प्रयास किये जा रहे वही अनेको उपाय योजनाओं के तहत संचारबदी कर लोंगो को एहतियात बरतने की सलाह दी जा रही है।आज राष्ट्रवादी काँग्रेस के नेता एंव पूर्व केंद्रीय मंत्री व राज्यसभा सासंद प्रफुल पटेल ने इस आपदा पर गंभीर चिंता व्यक्त करते हुए इससे निपटने हेतु सभी लोगो को सहयोग करने की अपील कर घरों में ही रहने की हिदायत दी है।सासंद पटेल ने गोंदिया एंव भंडारा जिले के जिलाधिकारी से बातचीत कर संकट के इस दौर से निपटने हेतु अपनी सासंद विकास निधि से 25-25 लाख रुपये देने की घोषणा की है।
सासंद प्रफुल पटेल ने कहा, आज आपातकालीन एव अतिआवश्यक सेवा के रुप में डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, पुलिस कर्मी, सफाई कर्मी व मीडिया कर्मी अपनी जान खतरे में डालकर सेवाएं दे रहे है। मैं उनका आभार व्यक्त करता हूँ। इसके साथ ही सासंद पटेल ने इस आपदा पर सभी सार्वजनिक, धार्मिक व सेवाभावी संस्थाओं को जरूरत पड़ने पर सहयोग करने की अपील भी की।

गोंदियात निघाला कोरोनाचा रुग्ण

गोंदिया,दि.२7:गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.त्यातच गोंदिया जिल्ह्यातही विदेशातून आलेल्या 129 जणांना ताब्यात घेत त्यांची तपासणी करण्यात आली,त्यापैकी 1 व्यक्ती बाधित निघाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.सदर व्यक्ती काही दिवसापुर्वी थायलंड येथील बँकाकवरुन आलेला आहे.सदर व्यक्तीची तपासणी पाॅझिटिव्ह आल्याचे आज प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.  जिल्ह्यात आजपर्यंत १२९ जण विदेशातून प्रवास करून आले आहेत. तसेच या व्यक्तींच्या संपर्कात आलेले ६१३ व्यक्ती आढळून आल्या त्यापैकी 1 जण विदेशातून आलेला होता,तो पाॅझिटिव्ह निघाला आहे.एकूण ७४२ व्यक्ती आहेत.त्यापैकी एकूण ७४० व्यक्तींना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी ५ व्यक्तींचे वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या व्यक्तींची दररोज तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.श्याम निमगडे यांनी दिली आहे.

Wednesday 25 March 2020

पोलीस अधिकाऱ्याची हिंगोलीत जमादारासह त्यांच्या मुलीस मारहाण

हिंगोली(विशेष प्रतिनिधी),दि.25- शहरातील नांदेड नाका येथे कर्तव्य बजावून औषधी घेऊन घरी जाणाऱ्या जमादारासह त्याच्या मुलीस पोलीस अधिकाऱ्याने बेदम मारहाण केल्याची घटना आज बुधवारी सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यामुलीस डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिला उपचारासाठी हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान मारहाणीनंतर तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयात फोन करुन आपल्या कर्मचार्याचा अपघात झाल्याची खोटी माहिती दिल्याचे जमादार साहेबराव राठोड यांनी म्हटले आहे.याप्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गृहमंत्र्यासह वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

हिंगोली जिल्हयातील कनेरगावनाका येथील चौकीमध्ये कर्तव्यावर असलेले जमादार साहेबराव राठोड हे आज सकाळी मधुमेहाच्या गोळ्या घेण्यासाठी हिंगोलीत आले होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत हिंगोली शहरातील मस्तानशहा नगरात त्यांची मुलगी प्रियंका राठोड यांनी सर्वेक्षणाचे काम केले. यावेळी तिने जमादार राठोड यांना दुरध्वनीकरून घरी घेऊन जाण्यासाठी या असा दुरध्वनी केला. त्यानुसार जमादार राठोड त्यांची मुलगी प्रियंका हिस घेऊन घरी निघाले होते. यावेळी नांदेडनाका भागात एका पोलीस अधिकाऱ्याने जमादार राठोड व प्रियंका राठोड यांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. राठोड यांनी मी पोलीस कर्मचारी असल्याचे सांगितल्यानंतरही त्यांना मारहाण सुरुच ठेवली त्यामुळे ते बाजुला पळून केले. तर अधिकाऱ्यांनी प्रियंका यांनाही मारहाण केली. या मारहाणीत तिच्या डोक्याला काठी लागल्याने ती बेशुध्द झाली. त्यानंतर तेथे असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिच्या डोक्यावर पाच टाके पडले आहेत. त्यानंतर तिला उपचारासाठी शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात आता वरिष्ठ अधिकारी काय भुमीका घेतात याकडे पोलीस खात्याचेच लक्ष लागले आहे

जिल्ह्यात स्वयंस्फुर्तीने गावबंदी,तहसिलदार गावभेटीवर

गोंदिया,दि.25ः- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदीला साथ देत जिल्ह्यातील गावकऱ्यांनी गावबंदीचा आदेश काढून गावाच्या सीमा बंद केल्या आहेत.जिल्ह्यात गोरेगाव तालूक्यातील चिचगाव व सटवा गावात गावबंदी करण्यात आली आहे.या गाावतील नागरिकांनी गावाच्या सीमेवरील रस्त्यावर झाडे कापून आडवी घातली आहेत. गावात कुणी बाहेरून न विचारता आला तर अडीच हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील कोणत्याही व्यक्तीला बाहेर निघताना गावकºयांची परवानगी घ्यावी लागणार आहे.
त्याचप्रमाणे गोंदिया तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तहसिलदार राजेश भांडारकर व त्यांचे सहकारी पदाधिकारी यांना मार्गदर्शक सुचना देत आहेत.सोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांत कोरोना संसर्गाचे रुग्ण मिळाल्यास करावयाच्या सोयी सुविधांची पाहणी करीत वैद्यकीय पथकाची भेट घेत आहेत.तर भंडारा जिल्ह्यात पवनारा येथे गावात शिरणाºया रस्त्यावर काटे लावून तो रोखून धरला आहे.” 

पोलीस अधीक्षक कार्यालयात आग;सीसीटीव्ही कंट्रोल रुम जळून खाक

वर्धा,दि.25ः- -येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाला  आज 25 मार्च रोजी अचानक आग लागल्याने सीसीटीव्ही कंट्रोल रुम जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे.शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून या आगीमुळे पोलीस यंत्रणेत अचानक खडबळ माजली आहे. पोलिसांनी धावपड करीत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.
संचारबंदी
आणि लॉकडाऊन सारख्या गंभीर विषय हाताळण्यात व्यस्त असणाऱ्या पोलिस यंत्रणेच्या कार्यालायलात आज अचानक आग लागली. दुपारच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्ष आणि सीसीटीव्ही कंट्रोल रुम या दोन्ही ठिकाणी आग लागली. आग विझविण्यासाठी अग्नीशामक दलाची मदक घेण्यात आली.पोलीस कर्मचारी आणि अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले आहेत. या आगीत जीवितहानी झाली नसली तरी सिसीटीव्ही कंट्रोल रुमचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गोंदिया विधानसभा व्हाटसपगृपच्या एका सदस्याने चुकीचा संदेश फिरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

गोंदिया,दि.25ः गोंदिया शहर पोलीस ठाणेतंर्गत शहरातील नामाकिंत असलेल्या गोंदिया विधानसभा या व्हाटसअप सोशल मिडिया गृपमधील एका सदस्याने कुठले दुकान किती वाजता उघडणार अशा आशयाची पोस्ट घालून जनतेपर्यंत चुकीची माहिती पसरविल्यामुळे जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या आदेशाने गोंदिया शहर पोलीस ठाण्यात त्या सदस्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.कोरोनाचा प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून देशभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आले आहे.सोबतच धारा 144 पण लागू करण्यात आले असून जनतेला जिवनावश्यक वस्तु वेळेवर उपलब्ध होतील याबद्दल प्रशासन माहिती देत असतानाच गोंदिया विधानसभा व्हाटसअप गृपच्या एका सदस्याने चुकीची पोस्ट घातल्याने  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा दुरुपयोग झाल्याने सरकार तर्फे फिर्यादि पोहवा प्रीतम खामले यांच्या तक्रारीवरुन कलम 188, 505 सहकलम 52,54 के अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सपाटे करीत आहेत.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 116

मुंबई,(वृत्तसंस्था),दि.25 – महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 116 झाल्याची माहिती बुधवारी प्रशासनाने जाहीर केली असे पीटीआयने म्हटले आहे. यात मंगळवारी रात्री सापडलेल्या 5 नव्या कोरोना व्हायरस रुग्णांची भर पडली आहे. हे सर्व पाच रुग्ण सांगली जिल्ह्यातील एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत. तर बुधवारी मुंबईत 4 नवे रुग्ण सापडले आहेत.उल्लेखनीय बाब म्हणजे, महाराष्ट्रात मंगळवारी एकूण 10 नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर सोमवारी राज्यात 8 कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण सापडले होते.

सांगली – हज यात्रेहून आलेल्या इस्लामपुरातील चौघा कोरोनाबाधित भाविकांच्या कुटुंबातील आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सकाळी स्पष्ट झाले. त्या पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील अशा रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली आहे.इस्लामपूर शहरातील एका कुटुंबातील चौघे सौदी अरेबिया येथे हज यात्रेला गेले होते. तेथून ते १३ मार्चरोजी परतले होते. त्यांना १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ करण्यास सांगितले होते. या कुटुंबात ३५ सदस्य असून, हज यात्रेहून परतलेल्यांचा घरातील सर्वांशीच संपर्क आला होता. त्यामुळे दि. १९ रोजी सर्वांची तपासणी करून त्यातील १८ जणांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यातील चौघांचा अहवाल सोमवारी आला. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वैद्यकीय पथकाने हालचाली करून या कुटुंबाच्या घराचा परिसर निर्जंतुक केला. बॅरिकेटस लावून तो बंदिस्त केला.बुधवारी सकाळी आणखी पाच जणांचा अहवाल मिळाला असून, तो पॉझिटिव्ह असल्याने पुन्हा खळबळ उडाली. एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोना झाल्याने जिल्हा हादरला आहे. त्यांच्यावर सांगलीच्या विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय पथक मंगळवारपासून सक्रिय झाले आहे. मात्र रुग्ण शोधण्याचे आव्हान या पथकापुढे आहे. इस्लामपूर शहरात मात्र घबराटीचे वातावरण आहे.
डॉक्टरांनी क्लिनिक बंद ठेवू नये, राज्यमंत्र्यांनी दिला परवाना रद्द करण्याचा इशारा
कोरोना व्हारसच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांनी आपले क्लिनिक बंद ठेवले आहेत. त्यांनी आप-आपले खासगी क्लिनिक आणि रुग्णालये सुरू ठेवावीत असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. तर खासगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल असा इशारा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे.

‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती

ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समितीत समावेश प्रतिबंधात्मक उपाययोजनां अंमलबजावणीसाठी सहकार्याची जबाबदारी
वाशिम, दि. २५ : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये, यासाठी सहकार्य करण्यासाठी सर्व गावांमध्ये सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. या समितीमध्ये ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्यासह सर्व  आरोग्य कर्मचारी, डॉक्टर यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाशिम जिल्ह्यात या विषाणूच्या प्रसाराला तत्काळ प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून गावस्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, गावात राहणारे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य यांचा समावेश असून पोलीस पाटील हे या समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.
समितीने अत्यावश्यक कामाशिवाय गावातून कोणीही बाहेर जाणार नाही, यावर लक्ष ठेवावे. यासह पुणे, मुंबई यासारख्या महानगरातून गावात आलेल्या लोकांची नजीकच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. याशिवाय या सर्व लोकांना किमान १५ दिवसांसाठी त्यांच्या राहत्या घरी विलगीकरण करून ठेवण्याची जबाबदारी या समितीवर राहणार आहे. विलगीकरण करण्यास नकार दिल्यास अशा व्यक्तींची नावे तहसील कार्यालयास सादर करावीत. गावात अत्यावश्यक सेवा जसे, किराणा माल, अन्नधान्य दुकाने, पिण्याचे पाणी, मेडिकल, डॉक्टरचे दवाखाने चालू राहतील याची खात्री करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
गावस्तरीय या समितीने भाजीपाला, फळे घरपोच देण्यासाठी नियोजन करावे. जीवनावश्यक वस्तू वगळता पान टपऱ्या, कोल्ड्रिंक्स, आयस्क्रीमची दुकाने, केशकर्तनालय (सलून) बंद ठेवावीत. सर्व राशन दुकाने सुरु ठेवावीत. दुध डेअरीवर गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दोन व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर ठेवून लोकांना दुध उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. अत्यावश्यक सेवांच्या सर्व ठिकाणांवर हात धुण्याची व्यवस्था करावी. गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करून त्यांचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे. तसेच समितीवर सोपविलेल्या सर्व कामे सुरु करून तसा अहवाल तहसीलदार कार्यालयास सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी गावस्तरावर स्थापन केलेल्या समित्यांना दिले आहेत.

प्रियंका मेश्रामचा पोलिस स्टेशन आमगाव येथे सत्कार

आमगांव,दि.25- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. त्यात ३८७ विद्याथ्र्यांची निवड करण्यात आली एमपीएससी तर्फे ३८७ पदासाठी १३ मे २०१८ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षा दोन सप्टेंबर तर डिसेंबर मध्ये शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्या परीक्षचा अंतीम निकाल जाहीर झाला दोन वर्षापासून उमेदवारांचे निकालाकडे लक्ष लागले होते. ३८७ उमेद्वारामध्ये खुल्या प्रवर्गातील ६६, महिला ३८, क्रिडा १०, मागास प्रवर्ग ३३, मागास प्रवर्ग महिला १५, ओबीसी ६६, ओबीसी महिला ६६ असा समावेश आहे. या निकालात आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील प्रियंका खेमराज मेश्राम (डोंगरे) यांनी मागास प्रवर्ग महिला गटातून ५ वा क्रमांक  प्राप्त करून आमगाव तालुक्यात महिला पीएसआय होण्याचा मान मिळविला आहे.
संसार सांभाळून पीएसआय होणाèया प्रियंकाचा समाजातील विभीन्न गटातून अभिनंदनाचा शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीत पीएसआय होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिद्दीने प्रवास करणाèया या सावित्रीच्या लेकीच सर्वत्र सत्कार केले जात आहे. अशातच आमगांव पोलिस स्टेशन येथे प्रियंकाचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सपोनी घनश्याम काळे, सपोनी संजयसिंग सपोनी जाधव, प्रियंकाचे पती दिनेश डोंगरे, आई-ललिता मेश्राम, वडील खेमराज मेश्राम, भाऊ राहुल मेश्राम, मामा प्रा.विनोदकुमार माने, मामी सौ.सुषमा माने, आयुष माने, खिलेश माने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

लग्नसमारंभ आयोजकावर गुन्हा दाखल


गोंदिया,दि.25 :-राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता जमावबंदी आणि संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. तसेच सगळे सामाजिक कार्यक्रम, विवाह समारंभ तसेच स्वागत समारंभ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोंदिया जिल्हाधिकाèयांनीही तसेच आदेश जारी केले आहेत. मात्र ग्रामीण भागात याची पायमल्ली होत आहे. अजूनही नागरिकांना या आजाराचे गांभीर्य लक्षात येत नाही. हे दुर्दैव आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या वतीने तसेच माध्यमांमधून सतत याविषयीची जागृती सुरू आहे, तरीही लोकांनी आपले कार्यक्रम, समारंभ सुरूच ठेवले आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील घाटटेमणी या गावात लग्नाप्रित्यर्थ स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तब्बल २०० नातेवाईकांच्या जेवणाची तयारी सुरु असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले आणि त्यांनी त्यांच्या स्टाईलने संबंधितांना दम देखील दिला. तिथे स्वयंपाक करणाèया आचाèयाला तर पोलिसांचा चोपही मिळाला. घडलेल्या प्रसंगी आयोजकाविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून , यापुढे अशा समारंभास मज्जाव करण्यात आला आहे.
तर दुसरीघटना सालेकसा तालुक्यातील पाथरी येथे घडली असून याठिकाणी सुध्दा लग्नसमारंभाचे कार्यक्रम मंडप घालून आयोजित केल्याप्रकरणी सालेकसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राजकुमार डुनगे यांनी राजेश दशरिया,नोहरदास दशरिया,मीराबाई दशरिया,योगराज दशरिया,कुंती हिरामण नागपूरे,विनोद डहारे,जागेश्वर लिल्हारे,रामचंद अलगदेवे,सरोज दशरिया व इतर १५ ते २० जणांवर जमावबंदीचे उल्लघंन करुन आशिर्वाद समारोह आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

देवरी पं.स.बिडीओचा शासन निर्णयाला ठेंगा

गोंदिया,दि.24ः-राज्यात सध्या कोरोना प्रार्दुभावाचे वातावरण दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यसरकारने कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे.सरकारी व निमसरकारी कार्यालयात कार्यरत कर्मचारी अधिकारी यांचाही बचाव व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही धोरणात्मक निर्णय घेतले.सुरवातीला शासकीय कार्यालयातील कर्मचारी संख्या 50 टक्यावर आणणे,त्यानंतर 25 टक्के कर्मचारीनाच कामावर येण्याची परवानगी देणे.त्यानंतर मात्र परिस्थिती चिघळत असतानाचे चित्र आणि संचारबंदी व लाॅकडाऊन मुळे अपडाऊन जे कर्मचारी करतात त्याना होमा फार्म वर्क ची परवानगी देण्याचे काम सरकारने केले.त्यातही 23 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी सरळ 5 टक्के कर्मचारीच कार्यालयात हजर होणार असे निर्देश मुख्य सचिवामार्फेत दिल्यानंतर त्याची अमलबजावणी होण्यास सुरवात झाली.जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तसे धोरण तयार करुन कर्मचारी कोण कधी येणार याचे नियोजन करुन सुचना देण्यात आल्या.परंतु देवरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रमुणी मोडक यांना मात्र शासन निर्णयाशी काहीच देण घेणं दिसून येत नसून त्यांनी शासन निर्णयाला ठेंगा दाखवित आपल्या अधिनस्थ कर्मचार्यांनाच कशाचा कोरोना काही होत नाही असे म्हणून शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यालयात कर्मचारी नेमणुकीच्या पत्रावरच स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ केल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे.देवरी पंचायत समितीच्या कर्मचार्यांनी शासनाच्या निर्देशानुसार कर्मचारीचे नियोजन केले तसेच वर्क प्राम होम अंतर्गत काम करणारे यांचीही नोंद करुन ठेवली मात्र त्यावर अद्यापही गटविकास अधिकारी मोड़क यांनी स्वाक्षरी न केल्याने पंचायत समितीमध्ये सर्वच कर्मचारी वर्गाला हजेरी लावण्याची वेळ आली आहे.जेव्हा की देवरीतच तहसिल कार्यालयासह इतर कार्यालयात मात्र शासन निर्णायानुसार कर्मचार्यांना नियोजन करुन कुणाला कधी यायचे ते ठरवून देण्यात आले आहे.त्यामुळे बीडीओ मोडक यांच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

बेरार टाईम्स ईपेपर 25 ते 31 मार्च ताज्या बातम्यासांठी आमच्या berartimes.com या पोर्टल व फेसबुक पेजला भेट द्या





आज रात्री 12 पासून देशभरात 21 दिवस लॉकडाऊन – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली,दि.24ः- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आज रात्री 12 वाजेपासून देशात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पीएम मोदी म्हणाले, निष्काळजीपणा केल्यास भारताला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. ही किती मोठी किंमत असेल त्याचा अदाजही लावता येणार नाही. देशात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या प्रयत्नांना गांभीर्याने घ्यायला हवे. आरोग्य क्षेत्रातील अनुभव लक्षात घेता, देशात महत्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. त्यासाठीच आज रात्री 12 वाजल्यापासून देशभर लॉकडाउन जारी केला जात आहे.तो 14 एप्रिलच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत राहणार आहे.
भारताला वाचवण्यासाठी, प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला वाचवण्यासाठी आज रात्रीपासून घराबाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी लावली जात आहे. राज्य, केंद्र शासित प्रदेश, प्रत्येक जिल्हा, गाव, वस्ती आणि गल्लीत सुद्धा लॉकडाउन केले जात आहे. हा एक प्रकारचा कर्फ्यू आहे. जनता कर्फ्यूपेक्षा अधिक सक्तीचा. कोरोनाच्या विरोधात निर्णायक लढा देण्यासाठी हे पाउल उचलणे आवश्यक आहे.

कोरोनाशी लढाः मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचा पगार देणार

राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

देवरी,दि.25 - कोरोना कोविड-19 या संकटावर राज्य सरकारला मात करता यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने आपल्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करण्याची विनंती करणारे पत्र राज्य शासनाला दिले आहे. 
जगभरात आज कोरोना या आजाराने विक्राल रुप धारण केले आहे. आपल्या देशातही या रोगाने आपले हातपाय चांगलेच पसरले असून महाराष्ट राज्य दुसऱ्या क्रमांकावर पोचले आहे. राज्य सरकार अत्यंत संवेदनशील आणि धीरोदात्त पणे या समस्येशी लढा देत आहे. याकामी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि त्यांचे सहकारी तसेच डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस प्रशासन, आरोग्य सेवक आणि सफाई कामगार प्रथम फळीत या रोगाविरुद्ध उभे ठाकले आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज्यातील गरीब जनतेला सुद्धा मदतीचा हात देण्यासाठी निधीची कमतरता भासू नये. यासाठी  नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारने कापून घ्यावा, अशी विनंती करणारे पत्र महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क समितीने राज्य शासनाला दिले आहे. यासोबत या संघटनेने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संघटनांना या आपातस्थितीमध्ये जनतेला कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी सरकारच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले आहे. जुनी पेंशन हक्क संघटनेने घेतलेल्या या भूमिकेचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Sunday 22 March 2020

गोंदिया जिल्ह्यात जनता कर्फ्यू : रस्ते पडलेओसाड

देवरीकरांचाही कोविड-19 विरोधात संकल्प
सायंकाळी थाळी, शंख व टाळ्या वाजवून प्रशासनाचे मानले आभार
गोंदिया,दि.22 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील १० महानगरे पूर्णपणे लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला. या पार्श्वभुमीवर शनिवारी (दि.२१) जिल्ह्यातील आठ ही तालुक्यात जिल्हाप्रशासनाच्या आदेशावर स्थानिक नगर परिषद व नगर पंचायत प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठ पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले. आज(दि.22) सकाळपासूनच संपूर्ण देशात जनता कर्फ्यू पुकारण्यात आले असून गोंदिया जिल्ह्यातील जनतेने त्यास उत्स्फुर्त प्रतिसाद दिलेला. व्यापारी प्रतिष्ठाने आणि इतर दुकाने सर्व बंद ठेवण्यात आली. भाजीबाजारासह औषधांचेही दुकाने आज बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर शुकशुकाट बघावयास मिळाला. गोंदियातील मुख्य बाजारपेठी,जयस्तंभ चौक,फुलचूर नाका,अवंतीबाई चौक,कुडवा नाका परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले असून मुख्य रस्तावरील वाहतुकही ओसरली आहे.गावखेड्यातही चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. दरम्यान, देवरी शहरात ही कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्यात आला. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची चाके सुद्धा थांबल्याचे चित्र होते.सायंकाळी देवरीकरांनी थाळी, टाळ्या,शंख वाजवून तर काहींनी फटाके फोडून पोलिस, आरोग्य आणि सफाई कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
 

जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्यापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रविवारी (दि.२२) जनता का कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. या आवाहनाला जिल्हा व ग्रामीण भागातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीने शनिवारी (दि.२१) गावांमध्ये दवंडी देऊन जनता का कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले. तर व्यापारी संघटनानी सुध्दा यात सहभागी होत जनता का कर्फ्यूला प्रतिसाद देण्यास नागरिकांना सांगितले.सोशल मीडियावरुन जनजागृतीकोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र उपाय योजना केली जात आहे.गोंदिया,सडक अर्जुनी,गोरेगाव,आमगाव,सालेकसा,तिरोडा,अर्जुनी मोरगाव व देवरी तालुक्यात चांगला प्रतिसाद जनता कर्फ्यूला मिळालेला आहे.विशेष म्हणजे ग्रामीण भागातील जनता सुध्दा घराबाहेर पडली नसल्याचे वृत्त स्थानिक प्रतिनिधींकडून येत आहे.


सडक अर्जुनी, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव येथील आठवडी बाजार सुध्दा बंद ठेवण्यात आले होते.राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी शासनातर्फेआवश्यक ती पाऊले उचलली जात आहे. कोरोनाचा संसर्ग आणि गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता इतर व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे. गोंदिया जिल्ह्यात अद्यापही एकही कोरोना बाधीत किंवा संशयीय रूग्ण आढळलेला नाही. मात्र जिल्हा प्रशासनातर्फेआवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी जिल्ह्यातील सर्व पानठेले आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शनिवारी (दि.२१) तालुका स्तरावर नगर परिषद व नगर पंचायत प्रशासनाने आपल्या स्तरावर निर्णय घेत तालुका स्तरावरील सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले. यातून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. नगर परिषद व नगर पंचायत प्रशासनाकडून यासाठी व्यापाऱ्यांना नोटीस देण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत आपली प्रतिष्ठाने न उघडण्याचे निर्देश दिले आहे.त्यातच आजपासून देशी विदेशी दारुची सर्व दुकानेही पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहेत.

Saturday 14 March 2020

देवरीत पोलीस कर्मचार्याची आत्महत्या


देवरी,दि.14ःः देवरी पोलीस ठाणेंतर्गत कार्यरत पोलीस कर्मचारी ओमप्रकाश रहीले (रा.मोरगाव अजुनी) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारला उघडकीस आली.

रहिले हा येथील वार्ड क्रमांक 5 मधील शिक्षक काॅलनीत बडवाईंक यांच्या घरी भाड्याने राहायचा.सदर कर्मचारी हा नक्षल आपरेशनच्या स्पेशल एक्सन फोर्समध्ये होता.सी 60 पथकासाेबत हे पथक पोलीस महानिरिक्षकाच्या मार्गदर्शनात काम करते.ओमप्रकाश गेल्या 2 वर्षापासून या पथकामध्ये कार्यरत आहे.त्याची काही दिवसापुर्वीच साक्षगंध झाले असून आई आजारी आहे.तर वडिलांचा मृत्यू आधीच झालेला आहे. पोलीस विभागातील कामाचा ताण व वरिष्ठांचा दबावामुळे आत्महत्या केली असावी अशी चर्चा सुरु आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...