गोंदिया,दि.30 मार्च -नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात देण्यात आज 30 मार्चपासून देण्यात येणाऱ्या ‘कोविड १९’च्या व्हेंटिलेटर प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील महिला आरोग्य सेविकांनी जाण्यास दिला नकार दिल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील ९० आरोग्य सेविकांना नागपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात आज सोमवार (३० मार्च)पासून पाच दिवसीय ‘कोविड १९’ व्हेंटिलेटर प्रशिक्षण देण्यात येणार होते. मात्र ९० आरोग्य सेविकांपैकी फक्त १२ आरोग्यसेविका रविवारला जाण्याच्या वेळेपर्यंत जिल्हा रुग्णालयात हजर झाल्या होत्या.त्यातच जिल्हा सामान्य रुग्णालयातील १० आरोग्य सेविकांनाही या प्रशिक्षणाला जायचे होते.मात्र जिल्हा सामान्य रुग्णालयातील एकही आरोग्यसेविका नागपूरला जाण्यासाठी न आल्याने जिल्हाप्रशासन या आरोग्य सेविकांच्या मनातील भिती दूर करण्यात अपयशी ठरल्याचे चित्र समोर आले.विशेष म्हणजे जिल्ह्यातच वैद्यकीय महाविद्यालय असताना आरोग्यसेविकांना बाहेरच्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणासाठी का पाठविण्यात येत आहे असा प्रश्न उपस्थित करीत काही आरोग्य सेविकांनी तर साधे व्हेंटिलटर समजत नसतांना त्याचे प्रशिक्षण देणे योग्य आहे का अशा प्रश्नच प्रक्षिणासाठी जायला आलेल्या १२ आरोग्य सेविकांनी करीत प्रशिक्षणास जाण्यास नकार दिला.त्यातच सर्व 900 आरोग्य सेविकांना रविवारला सायंकाळी ४ वाजता रुग्णालयात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले होते,मात्र सायंकाळचे ६ वाजूनही इतर आरोग्यसेविका उपस्थित न झाल्याने रुग्णालयात हजर झालेल्या १२ आरोग्य सेविकांनीही प्रशिक्षणाकरता जाण्यास नकार दिला.त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील एकही आरोग्य सेविका आजपासून नागपूर येथे सुरु होत असलेल्या प्रशिक्षणाला हजर न होऊ शकल्याने भविष्यात जिल्ह्यात रुग्णसंख्येत वाढ झाल्यास उपचाराच्यावेळी मोठे संकट आरोग्य विभागासमोर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आत्ता ज्या आरोग्यसेविकांनी प्रशिक्षणाला जाण्यास नकार दिला,त्यांच्याबद्दल काय भूमिका आरोग्य विभाग व जिल्हाप्रशासन घेते याकडे लक्ष लागले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment