Wednesday 25 March 2020

कोरोनाशी लढाः मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचा पगार देणार

राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

देवरी,दि.25 - कोरोना कोविड-19 या संकटावर राज्य सरकारला मात करता यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेने आपल्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये वर्ग करण्याची विनंती करणारे पत्र राज्य शासनाला दिले आहे. 
जगभरात आज कोरोना या आजाराने विक्राल रुप धारण केले आहे. आपल्या देशातही या रोगाने आपले हातपाय चांगलेच पसरले असून महाराष्ट राज्य दुसऱ्या क्रमांकावर पोचले आहे. राज्य सरकार अत्यंत संवेदनशील आणि धीरोदात्त पणे या समस्येशी लढा देत आहे. याकामी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि त्यांचे सहकारी तसेच डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस प्रशासन, आरोग्य सेवक आणि सफाई कामगार प्रथम फळीत या रोगाविरुद्ध उभे ठाकले आहेत. अशा परिस्थितीमध्ये राज्यातील गरीब जनतेला सुद्धा मदतीचा हात देण्यासाठी निधीची कमतरता भासू नये. यासाठी  नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सरकारने कापून घ्यावा, अशी विनंती करणारे पत्र महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क समितीने राज्य शासनाला दिले आहे. यासोबत या संघटनेने राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संघटनांना या आपातस्थितीमध्ये जनतेला कोणतीही कमतरता भासू नये, यासाठी सरकारच्या पाठीशी राहण्याचे आवाहन केले आहे. जुनी पेंशन हक्क संघटनेने घेतलेल्या या भूमिकेचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...