तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष अड. प्रशांत संगीडवार हे होते. यावेळी देवरी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष अन्नू शेख तर सत्कारमूर्ती जि.प.सदस्य तथा जिल्हा महिला कॉंग्रेसच्या उषा शहारे, सरिता काळसर्पे आणि जसवंतकौर भाटीया उपस्थित होते.

सत्कारमूर्तीचा मान्यवरांचे हस्ते शालश्रीफळ आणि साडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तींनी सत्काराला उत्तर देताना महिलांनी आजच्या युगात आपला दृष्टीकोन बदल्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याचे धैर्य महिलांनी दाखविले पाहिजे, असेही त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश चन्ने यांनी केले. उपस्थितांचे आभार चंचल जैन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशिस्वितेसाठी सुनील चोपकर, सुरेश भदाडे, जुबीन खान, महेंद्र वैद्य, सुशील जैन, सुरेश साखरे, सुनील अग्रवाल, नंदूप्रसाद शर्मा आदींनी सहकार्य केले.

No comments:
Post a Comment