Wednesday 25 March 2020

राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता 116

मुंबई,(वृत्तसंस्था),दि.25 – महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 116 झाल्याची माहिती बुधवारी प्रशासनाने जाहीर केली असे पीटीआयने म्हटले आहे. यात मंगळवारी रात्री सापडलेल्या 5 नव्या कोरोना व्हायरस रुग्णांची भर पडली आहे. हे सर्व पाच रुग्ण सांगली जिल्ह्यातील एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत. तर बुधवारी मुंबईत 4 नवे रुग्ण सापडले आहेत.उल्लेखनीय बाब म्हणजे, महाराष्ट्रात मंगळवारी एकूण 10 नवीन कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर सोमवारी राज्यात 8 कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण सापडले होते.

सांगली – हज यात्रेहून आलेल्या इस्लामपुरातील चौघा कोरोनाबाधित भाविकांच्या कुटुंबातील आणखी पाच जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सकाळी स्पष्ट झाले. त्या पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून, जिल्ह्यातील अशा रुग्णांची संख्या नऊवर पोहोचली आहे.इस्लामपूर शहरातील एका कुटुंबातील चौघे सौदी अरेबिया येथे हज यात्रेला गेले होते. तेथून ते १३ मार्चरोजी परतले होते. त्यांना १४ दिवस ‘होम क्वारंटाईन’ करण्यास सांगितले होते. या कुटुंबात ३५ सदस्य असून, हज यात्रेहून परतलेल्यांचा घरातील सर्वांशीच संपर्क आला होता. त्यामुळे दि. १९ रोजी सर्वांची तपासणी करून त्यातील १८ जणांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या घशातील स्रावाचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यातील चौघांचा अहवाल सोमवारी आला. त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वैद्यकीय पथकाने हालचाली करून या कुटुंबाच्या घराचा परिसर निर्जंतुक केला. बॅरिकेटस लावून तो बंदिस्त केला.बुधवारी सकाळी आणखी पाच जणांचा अहवाल मिळाला असून, तो पॉझिटिव्ह असल्याने पुन्हा खळबळ उडाली. एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोना झाल्याने जिल्हा हादरला आहे. त्यांच्यावर सांगलीच्या विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय पथक मंगळवारपासून सक्रिय झाले आहे. मात्र रुग्ण शोधण्याचे आव्हान या पथकापुढे आहे. इस्लामपूर शहरात मात्र घबराटीचे वातावरण आहे.
डॉक्टरांनी क्लिनिक बंद ठेवू नये, राज्यमंत्र्यांनी दिला परवाना रद्द करण्याचा इशारा
कोरोना व्हारसच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये डॉक्टरांनी आपले क्लिनिक बंद ठेवले आहेत. त्यांनी आप-आपले खासगी क्लिनिक आणि रुग्णालये सुरू ठेवावीत असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. तर खासगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल असा इशारा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...