देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त आदिवासी बहुल क्षेत्र चिचगड येथे जि.प.योजनेतंर्गत रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम करताना डांबराचा वापर योग्य प्रमाणात करण्याचे निर्देश आहे. परंतु, डांबर कीम वापरून जुने ऑईल वारले जात आहे. तसेच इतर साहित्यही निकृष्ट दर्जाचे आहे. रोलरव्दारे दाब कमी होत असल्याने आताच हा रस्ता ठिकठिकाणी फुटला आहे. संबधित कामावर कनिष्ठ अभियंता दुर्लक्ष करीत असून कंत्राटदार व शासकीय कंत्राटदाराचा संबध अ सल्याचा आरोप गावातीलच नागरिकांनी केला आहे. जिल्हा परिषद ग्राम सडक योजनेव्दारे ६०० मीटर डांबर रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली. चिचगड-देवलगाव डांबर रस्त्याचे बरेचसे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. या मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने तत्काळ कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे. कामाच्या ठिकाणी सर्व साहित्य तांत्रिक तपासणी करण्यात येते. काम सुरू असून रहदारी सुध्दा सुरूच आहे. ताज्या कामावर वाहतूक झाल्याने काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते दुरूस्त करण्यात येत नाही. त्यामुळे या रस्त्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रस्ता बांधकामाची चौकशी करून कंत्राटदारावर कार्यवाही करावी, अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment