Wednesday 25 March 2020

लग्नसमारंभ आयोजकावर गुन्हा दाखल


गोंदिया,दि.25 :-राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता जमावबंदी आणि संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. तसेच सगळे सामाजिक कार्यक्रम, विवाह समारंभ तसेच स्वागत समारंभ रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोंदिया जिल्हाधिकाèयांनीही तसेच आदेश जारी केले आहेत. मात्र ग्रामीण भागात याची पायमल्ली होत आहे. अजूनही नागरिकांना या आजाराचे गांभीर्य लक्षात येत नाही. हे दुर्दैव आहे. प्रशासन आणि पोलिसांच्या वतीने तसेच माध्यमांमधून सतत याविषयीची जागृती सुरू आहे, तरीही लोकांनी आपले कार्यक्रम, समारंभ सुरूच ठेवले आहेत.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील घाटटेमणी या गावात लग्नाप्रित्यर्थ स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी तब्बल २०० नातेवाईकांच्या जेवणाची तयारी सुरु असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले आणि त्यांनी त्यांच्या स्टाईलने संबंधितांना दम देखील दिला. तिथे स्वयंपाक करणाèया आचाèयाला तर पोलिसांचा चोपही मिळाला. घडलेल्या प्रसंगी आयोजकाविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून , यापुढे अशा समारंभास मज्जाव करण्यात आला आहे.
तर दुसरीघटना सालेकसा तालुक्यातील पाथरी येथे घडली असून याठिकाणी सुध्दा लग्नसमारंभाचे कार्यक्रम मंडप घालून आयोजित केल्याप्रकरणी सालेकसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राजकुमार डुनगे यांनी राजेश दशरिया,नोहरदास दशरिया,मीराबाई दशरिया,योगराज दशरिया,कुंती हिरामण नागपूरे,विनोद डहारे,जागेश्वर लिल्हारे,रामचंद अलगदेवे,सरोज दशरिया व इतर १५ ते २० जणांवर जमावबंदीचे उल्लघंन करुन आशिर्वाद समारोह आयोजित केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...