Thursday 5 March 2020

देवरीच्या कन्या शाळा प्रकरणी अखेर चौकशी सुरू


चौकशीच्या भीतीने संबंधित वर्गशिक्षक गेले रजेवर
हत्तीरोग दुरीकरणच्या गोळ्या वाटपासंबंधाने केंद्रप्रमुखांनी सूचना निर्गमित केल्या



देवरी,दि.05- ` विद्यार्थ्याला शाळेत कोंडून शिक्षक घरी` या मथळ्याखाली बेरारटाईम्समध्ये बातमी प्रकाशित होताच शिक्षण विभागाचे धाबे चांगलेच दणाणले आहे. वरिष्ठांचे आदेशाने तत्काल चौकशीला सुरवात झाली असून यातून शिक्षण विभाग कोणती कार्यवाही करते की दोषींना पाठीशी घालते ?  या बाबीकडे देवरी वासीयांचे लक्ष लागले आहे. दरम्यान ,चौकशीची कुणकुण लागताच संबंधित वर्गशिक्षक रजेवर गेले असून चौकशी प्रभावीत करण्यासाठी तो शिक्षक राजाश्रय शोधत असल्याची चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.
काल स्थानिक जिल्हा परिषदेच्या कन्याशाळेत शालेय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तिसऱ्या वर्गात शिकत असलेल्या तुषार महेश राऊत या विद्यार्थ्याचा जीव धोक्यात आला होता. या प्रकरणाला बेरारटाईम्स न्यूजपोर्टलने सर्वप्रथम उजेडात आणले. परिणामी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच चांगलीच खळबळ माजली. संबंधित शिक्षकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे हत्तीरोग दुरीकरण उपक्रम सुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जि.प. शिक्षण विभागातून निघालेल्या आदेशाप्रमाणे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री. डी.बी. साकुरे हे या प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून नेमले गेले असून त्यांनी लगेच चौकशीला सुरवात केली आहे. दरम्यान, संबंधित वर्गशिक्षकाला या चौकशीची कुणकुण लागताच तो शिक्षक प्रकृत्तीचे निमित्त करून रजेवर गेल्याचे केंद्रप्रमुख भानारकर यांनी सांगितले. सदर वर्गशिक्षक याचे राजकारण्यांशी घनिष्ठ संबंध असल्याने तो शिक्षक चौकशी अधिकाऱ्यावर दबाब आणण्याची शक्यता असल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात आहे. परिणामी, दोषींवर योग्य कार्यवाही करून शिक्षण क्षेत्रात सदृढ वातावरण करण्याची जबाबदारी आता शिक्षण विभागावर आली आहे.
 दरम्यान, हत्तीरोग निर्मुलन करण्यासाठी शासनाद्वारे गोळ्यांचे वाटप करण्यात येत असून शाळांमध्ये मुलांना गोळ्या देत असताना संबधित वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांनी विद्यार्थी उपाशी तर नाही, त्याची प्रकृती खराब तर नाही वा आवश्यक ती पुरेशी दक्षता घेऊन गोळ्या देण्यात यावे.या बाबतीत कोणतेही दुर्लक्ष होता कामा नये-केंद्रप्रमुख, असा संदेश व्हाटसॅपवर फिरत आहे.





No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...