गोंदिया,दि.२7:गेल्या काही दिवसापासून राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.त्यातच गोंदिया जिल्ह्यातही विदेशातून आलेल्या 129 जणांना ताब्यात घेत त्यांची तपासणी करण्यात आली,त्यापैकी 1 व्यक्ती बाधित निघाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.सदर व्यक्ती काही दिवसापुर्वी थायलंड येथील बँकाकवरुन आलेला आहे.सदर व्यक्तीची तपासणी पाॅझिटिव्ह आल्याचे आज प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. जिल्ह्यात आजपर्यंत १२९ जण विदेशातून प्रवास करून आले आहेत. तसेच या व्यक्तींच्या संपर्कात आलेले ६१३ व्यक्ती आढळून आल्या त्यापैकी 1 जण विदेशातून आलेला होता,तो पाॅझिटिव्ह निघाला आहे.एकूण ७४२ व्यक्ती आहेत.त्यापैकी एकूण ७४० व्यक्तींना त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी ५ व्यक्तींचे वैद्यकीय तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या व्यक्तींची दररोज तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.श्याम निमगडे यांनी दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...

-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment