Wednesday 25 March 2020

प्रियंका मेश्रामचा पोलिस स्टेशन आमगाव येथे सत्कार

आमगांव,दि.25- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला. त्यात ३८७ विद्याथ्र्यांची निवड करण्यात आली एमपीएससी तर्फे ३८७ पदासाठी १३ मे २०१८ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षा दोन सप्टेंबर तर डिसेंबर मध्ये शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्या परीक्षचा अंतीम निकाल जाहीर झाला दोन वर्षापासून उमेदवारांचे निकालाकडे लक्ष लागले होते. ३८७ उमेद्वारामध्ये खुल्या प्रवर्गातील ६६, महिला ३८, क्रिडा १०, मागास प्रवर्ग ३३, मागास प्रवर्ग महिला १५, ओबीसी ६६, ओबीसी महिला ६६ असा समावेश आहे. या निकालात आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील प्रियंका खेमराज मेश्राम (डोंगरे) यांनी मागास प्रवर्ग महिला गटातून ५ वा क्रमांक  प्राप्त करून आमगाव तालुक्यात महिला पीएसआय होण्याचा मान मिळविला आहे.
संसार सांभाळून पीएसआय होणाèया प्रियंकाचा समाजातील विभीन्न गटातून अभिनंदनाचा शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अत्यंत विपरीत परिस्थितीत पीएसआय होण्याचे स्वप्न उराशी बाळगून जिद्दीने प्रवास करणाèया या सावित्रीच्या लेकीच सर्वत्र सत्कार केले जात आहे. अशातच आमगांव पोलिस स्टेशन येथे प्रियंकाचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सपोनी घनश्याम काळे, सपोनी संजयसिंग सपोनी जाधव, प्रियंकाचे पती दिनेश डोंगरे, आई-ललिता मेश्राम, वडील खेमराज मेश्राम, भाऊ राहुल मेश्राम, मामा प्रा.विनोदकुमार माने, मामी सौ.सुषमा माने, आयुष माने, खिलेश माने आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...