Saturday 28 March 2020

प्रशासन निर्देशाला ठेंगा: सौदंड,आमगाव,इटखेडा व बोंडगावदेवीत भरले आठवडी बाजार

इटखेडा व बोंडगावदेवी येथील सरपंच,सचिवासह इतरावर गुन्हे दाखल
आमगाव/अर्जुनी मोरगाव /सडक अर्जुनी,दि.28:-देशात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी १४ एप्रिल पर्यंत २१दिवस लॉकडाऊन जाहिर करण्यात आले.तसेच संपूर्ण देशात कलम १४४ व संचारबंदी लावण्यात आली आहे. नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी होणार नाही याकरीता स्थानिक जिल्हाप्रशासन वेळोवेळी मार्गदर्शक सुचना देत असतानाही त्या सुचना व निर्देशाकडे दुर्लक्ष करीत आमगाव,अर्जुनी मोरगाव तालुक्याती इटखेडा व बोंडगावदेवी आणि सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे स्थानिक प्रशासनाने गर्दी टाळण्याच्या निर्देशाला ठेंगा दाखवित आठवडी बाजार भरविल्याने नागरिकात चांगलाच रोष उफाळून आला आहे.दरम्यान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटखेडा व बोडंगाव देवी येथील सरपंच,सचिवासंह काही नागरिवार पोलीस ठाण्यात प्रशासनाच्यावतीने शासन नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डाॅ.कादबंरी बलकवडे यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार रद्द करण्याचे निर्देश दिले होते.त्यानंतरही त्या सर्व ठिकाणी बाजार भरविण्यात आले.सोबतच सौंदड ग्रा.प.ने पालन केल्याचे दिसत नाही.ग्रा.प.ने २५ मार्चला बुधवारला आठवडी बाजार भरवला.या बाजारात मोठी गर्दी दिसून येत होती.मात्र याकडे पोलीस विभागाने सुद्धा लक्ष दिले नाही.यामूळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.सडक अर्जुनी तालुक्यातील आठवडी बाजार दोन आठवडे बंद करण्याचे आदेश तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सडक अर्जुनी यांनी दिले असतांनी सुध्दा सौंदड येथील आठवडी बाजारात दुकाने थाटण्यात आली होती.कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी व प्रतिबंध उपाय म्हणून सडक अर्जुनी तालुक्यातील आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश १६मार्चला तहसीलदार सडक अर्जुनी यांनी सर्व ग्रा.प.ला बजावले होते.सौंदडचे सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी आठवडी बाजार लावण्यास मनाई केली नाही.भाजी विक्रेत्यांनी ग्रामीण रुग्णालयापासून सुंदरी रोडापर्यंत दुकाने थाटली होती.यासंदर्भात उपाय योजना करण्यासाठी पोलिस विभागाने काही ठोस पावले उचलली नाही.यामुळे नागरिकाकडूनरोष व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...