Sunday 29 March 2020

टोल बूथ’वर स्थलांतरितांच्या अन्नपाण्याची सोय करा- नितीन गडकरी

नागपूरदि.29 - देशभरात ‘लॉकडाऊन’मुळे हाती काम नसल्याने विविध ठिकाणी मजूर व कामगार मूळ गावी स्थलांतर करत असल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत या लोकांच्या पोटापाण्याची ‘टोल बूथ’वर सोय होऊ शकते. यासंदर्भात पुढाकार घ्यावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘एनएचएआय’च्या (नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया) अध्यक्षांना दिला आहे.
सोबतच ‘टोल ऑपरेटर्स’लादेखील आवाहन केले आहे.लॉकडाऊन’मुळे सर्वच शहरांतील कामे, आस्थापना बंद आहेत. कामानिमित्त दुसऱ्या जिल्ह्यांतून किंवा राज्यातून मोठ्या शहरांत मोठ्या प्रमाणात मजूर व कामगार आले होते. हातावर पोट असलेल्यांची कमाईच बंद आहे. त्यामुळे खाण्यापिण्याची आबाळ होत आहे. शिवाय ‘कोरोना’चादेखील धोका आहे. त्यामुळेच बरेचजण गावांकडे परतताना दिसून येत आहेत.गावांकडे स्थलांतरित होणारे मजूर-कामगार यांची ‘टोल बूथ’वर खाण्यापिण्याची सोय होऊ शकते. शिवाय त्यांच्या आरोग्यासंबंधीदेखील सुविधा निर्माण केली जाऊ शकते, अशी सूचना गडकरी यांनी ‘एनएचएआय’च्या अध्यक्षांना केली आहे. ही संकटाची स्थिती आहे. अशा काळात ‘टोल बूथ आॅपरेटर्स’देखील या आवाहनाला प्रतिसाद देतील व देशबांधवांसाठी आवश्यक त्या सुविधा प्रदान करतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...