Saturday 7 March 2020

विद्यार्थ्याला शाळेत कोंडणारा शिक्षक कुंभलकर निलंबित

देवरी,दि.07 - `विद्यार्थ्याला शाळेत कोंडून शिक्षक घरी` या मथळ्याखाली बेरारटाईम्समध्ये बातमी प्रकाशित होताच शिक्षण विभागाचे धाबे चांगलेच दणाणले आहे. वरिष्ठांचे आदेशाने तत्काल चौकशीला सुरवात झाली असून यातून शिक्षण विभाग कोणती कार्यवाही करते की दोषींना पाठीशी घालते ?  या बाबीकडे देवरी वासीयांचे लक्ष लागले असतानाच झालेल्या चौकशी सदर शिक्षक दोषी आढळल्याने प्रभारी शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी एन.डी.कुंभलकर या शिक्षकाला निलंबित केले आहे. दरम्यान, चौकशीची कुणकुण लागताच संबंधित वर्गशिक्षक रजेवर गेला होता. 
काल स्थानिक जिल्हा परिषदेच्या कन्याशाळेत शालेय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तिसऱ्या वर्गात शिकत असलेल्या तुषार महेश राऊत या विद्यार्थ्याचा जीव धोक्यात आला होता. या प्रकरणाला बेरारटाईम्स न्यूजपोर्टलने सर्वप्रथम उजेडात आणले. परिणामी, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच चांगलीच खळबळ माजली. संबंधित शिक्षकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे हत्तीरोग दुरीकरण उपक्रम सुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जि.प. शिक्षण विभागातून निघालेल्या आदेशाप्रमाणे वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी  डी.बी. साकुरे हे या प्रकरणात चौकशी करीत सदर अहवाल गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना सादर केला.त्यामध्ये शिक्षक एन.डी.कुंभलकर हे दोषी आढळून आले असून शिक्षणाधिकारी हिवारे यांनी निलंबन आदेश काढताना शिक्षकाने केलेली चूक अक्षम्य असल्याचे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...