
सविस्तर असे की, देवरीचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना डुग्गीपार पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सौंदड या गावात मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री व साठा याची माहिती मिळाली. या माहितीवरून गोंदियाचे पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे यांचे मार्गदर्शनात अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पथकातील अधीक्षकांचे वाचक सहायक पोलिस निरीक्षक विजय धुमाळ, पोलिस नायक खोटेले. खडसे, राउत, पोलिस शिपाई झोडे आणि मडावी यांनी सौंदड येथे सापळा कार्यवाही केली. यामध्ये सकाळी साडे आठ वाजता सौंदड येथील संतोष तुळशीराम सावळकर यांचे राहत्या घराची झळती घेतली असता एका खोलीत एका स्टीलच्या ड्रम मध्ये डिप्लोमेट व्हिस्कीचे 4 पव्वे आणि मॅक डोवेल्सचे 21 पव्वे असा 2 हजार 948 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस नायक खडसे यांचे तक्रारीवरून आरोपी सावळकर याचे विरुद्ध डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हवालदार अण्णा ब्राम्हणकर हे करीत आहेत. दुसरी सापळा कार्यवाही सकाळी सव्वा दहा वाजता करण्यात आली. यामध्ये सौंदड येथीलच संतोष राजाराम बनकर यांच्या नवीन घरावर धाड टाकण्यात आली. यामध्ये 35 हजार किमतीचे टायगर ब्रॉंडचे 14 पेट्यांतील 672 पव्वे, 98 हजार 800 रुपये किमतीचे टायगर ब्रांड 90 मिलीच्या 38 पेट्या , 54 हजार 580 रुपये किमतीचे बी के प्रिमिअमचे 22 पेट्या आणि 54 हजार 400 रुपये किमतीचे 38 पोते मोहफुलाचा सडवा असा एकूण 2 लाख 42 हजार 780 रुपयांचे मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणातील आरोपी संतोष बनकर हा फरारी आहे. या प्रकरणी पोलिस नायक राऊत यांचे तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस उपनिरीक्षक धर्मशिल सोळंके हे पुढील तपास करीत आहेत.
No comments:
Post a Comment