Wednesday 25 March 2020

गोंदिया विधानसभा व्हाटसपगृपच्या एका सदस्याने चुकीचा संदेश फिरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

गोंदिया,दि.25ः गोंदिया शहर पोलीस ठाणेतंर्गत शहरातील नामाकिंत असलेल्या गोंदिया विधानसभा या व्हाटसअप सोशल मिडिया गृपमधील एका सदस्याने कुठले दुकान किती वाजता उघडणार अशा आशयाची पोस्ट घालून जनतेपर्यंत चुकीची माहिती पसरविल्यामुळे जिल्हाधिकारी गोंदिया यांच्या आदेशाने गोंदिया शहर पोलीस ठाण्यात त्या सदस्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.कोरोनाचा प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून देशभरात लाॅकडाऊन लागू करण्यात आले आहे.सोबतच धारा 144 पण लागू करण्यात आले असून जनतेला जिवनावश्यक वस्तु वेळेवर उपलब्ध होतील याबद्दल प्रशासन माहिती देत असतानाच गोंदिया विधानसभा व्हाटसअप गृपच्या एका सदस्याने चुकीची पोस्ट घातल्याने  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा दुरुपयोग झाल्याने सरकार तर्फे फिर्यादि पोहवा प्रीतम खामले यांच्या तक्रारीवरुन कलम 188, 505 सहकलम 52,54 के अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक सपाटे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...