Sunday 30 April 2017

हुंड्यासाठी लग्न मोडणारा शिक्षकाला आईवडिलासंह अटक

गोंदिया,दि.३०(berartimes.com)-समाजात शिक्षकाला आदराने बघीतले जाते मात्र काही शिक्षक याला अपवाद ठरतात. साक्षगंध झाल्यावर केवळ हुंडा न दिल्याचे कारण पुढे करत ब्रम्हपुरी येथील नामाकिंत शाळेच्या एका शिक्षकाने लग्न मोडत आपल्या पेशाला काळीमा फासला. ही घटना २६ एप्रिल रोजी अर्जुनी-मोर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडीलांच्या तक्रारीवरून अर्जुनी-मोर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदविला असून त्या शिक्षका बरोबरच त्याच्या आई-वडीलांनाही अटक केली आहे.
अमोल श्यामराव लांजेवार रा. साकोली जि. भंडारा, ह.मु. ब्रम्हपूरी जि. चंद्रपूर असे त्या शिक्षकाचे नाव आहे. त्याचे अर्जुनी-मोर येथील  एका प्रतिष्ठत कुटूंबातील मुलीशी २५ नोव्हेंबर २०१६ रोजी लग्न जुळले. त्यानूसार ४ डिसेंबर २०१६ ला लाखांदूर येथे मुलीच्या काकांच्या निवासस्थानी दोघांचा साक्षगंधाचा कार्यक्रमही पार पडला. यासाठी मुलीच्या वडीलांनी मोठी रक्कम खर्च करताना कार्यक्रमात कोणतीही उणीव येऊ दिली नाही. मात्र नेमकी माशी कोठे शिंकली ते कळलेच नाही. साक्षगंधानंतर वधु पित्याकडून वारंवार वर पित्याला लग्नाची तारीख काढण्याची विनंती केली, मात्र अमोलच्या वडीलांकडून यासाठी टाळाटाळ करण्यात येवू लागली. दरम्यानच्या काळात अमोल मुलीच्या घरी आला असताना तिच्या वडीलांनी लग्नाची तारीख ठरविण्याविषयी विनंती केली असता त्याने नोकरीसाठी पाच लाख रुपयाची गरज असल्याचे कारण सांगताना लग्नात पाच लाख रुपयाच्या हुंड्याची मागणी केली. यावेळी मुलीचे वडील व इतर नातेवाईकांनी त्याची समज काढण्याचे प्रयत्न करताना व एवढी मोठी रक्कम देवू शकणार नसल्याचे सांगितले. मात्र अमोलने आपल्या मागणीवर ठाम राहत लग्नच मोडले. त्यामुळे एका प्रतिष्ठीत कुंटूबाचे आर्थिक नुकसान तर झाले शिवाय समाजातही मोठी बदनामी झाली. विषेश म्हणजे अमोल हा ब्रम्हपूरी येथील नेवजाबाई हितकारणी विद्यालयात अध्यापक म्हणून कार्यरत असून त्याचे वडील श्यामराव लांजेवार, आई शारदा लांजेवार व स्वत: अमोल यांनी मयूरीला पसंत केले होते. असे असतानाही केवळ हुंड्यासाठी लग्न मोडणारा शिक्षक समाजकंटकच ठरतो. याप्रकरणी मुलीच्या वडीलांनी अर्जुनी-मोर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.असून पोलीसांनी आरोपी शिक्षक अमोल व त्यांच्या आई-वडिलांना हुंडाबळी अधिनियम अंतर्गत ब्रम्हपुरी येथून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपीने गत दोन वर्षात अनेक मुलींशी हा प्रकार केला असल्याचे कळते. मुलींना होकार देवून शेवटी नापसंती करने, अशाप्रकारे मुलीच्या जिवाशी खेळण्याèया शिक्षकाविरुध्द योग्य कारवाई ची मागनी मुलीच्या वडीलांनी केली आहे.

जीर्ण नोटा स्वीकारणे बँंकांना बंधनकारक – रिझर्व्ह बँक


मुंबई(वृत्तसंस्था),दि.30- बँका खराब झालेल्या किंवा लिहिलेल्या नोटा स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे. अशा नोटांना बाद झालेल्या नोटा ग्राह्य न धरता यावर तोडगा काढावा असेही आरबीआयने सांगितले आहे.
रिझर्व्ह बँकेकडे गेल्या काही दिवसांत रंग लागलेल्या तसेच ज्यांच्यावर काही लिहिले आहे, धुतल्याने रंग उडाला आहे अशा नोटा बँका स्वीकारत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. यामध्ये खासकरून ५00 आणि २000 च्या नोटांचा समावेश होता. यानंतर आरबीआयने परिपत्रक काढत बँकांना या नोटा स्वीकारण्याचा आदेश दिला आहे.
सोशल मीडियावर अशा नोटा बँका स्वीकारणार नसल्याची अफवा परसली होती. बँकांही आठमुठेपणा दाखवत नोटा स्वीकारण्यास नकार देऊ लागल्या होत्या. अफवा वेगाने पसरू लागल्यानंतर आरबीआयने दखल घेत आपल्या २0१३ मधील आदेशाची आठवण करून दिली. खराब नोटा स्वीकारण्यासंबंधी आपण कोणताच आदेश दिला नसल्याचे आरबीआयने त्यावेळी सांगितले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे की, नोटांवर लिहिण्यासंबंधी जो आदेश देण्यात आला होता तो बँक कर्मचार्‍यांसाठी होता. त्यांनी नोटांवर काही लिहू नये असे सांगितले होते. अनेक बँक कर्मचार्‍यांना नोटांवर लिहिण्याची सवय लागल्याचे लक्षात आल्यानंतर आरबीआयने हा आदेश काढला होता. अशाप्रकारे नोटांवर लिहिणे आरबीआयच्या क्लीन नोट पॉलिसीविरोधात आहेत.

नवयुवक किसान गणेश मंडळाची विजयी शोभायात्रा


देवरी,३०(प्रतिनिधी)- स्थानिक नवयुवक किसान गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शहरात शोभायात्रा काढून विभागीय स्तरावर प्रथम पुरस्कार मिळाल्याचा आनंद साजरा केला.
 सविस्तर असे की, यावर्षी राज्यशासनाने सर्वोत्कृष्ठ सजावट करणाऱ्या गणेश मंडळाला लोकमान्यांच्या नावे पुरस्कार देण्याचे जाहीर केले होते. यानुसार, देवरीच्या नवयुवक गणेश मंडळाला लोकमान्य महोत्सव अंतर्गत उत्कृष्ट गणेश मंडळचा जिल्हास्तर आणि विभाग स्तरावर प्रथम पारितोषिक मिळाला होता.  सदर पुरस्कार नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे हस्ते देण्यात आला. या पुरस्काराचा आनंद साजरा करण्यासाठी शहरात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या थाटात बैलबंडी सजावट करुन शेतकरीवर्ग आणि मोठया प्रमाणात गृहिणी सुद्धा  या मध्ये सामील झाल्या होत्या.  विशेष म्हणजे क्षेत्राचे आमदार संजय पुराम  हे सुध्दा या उत्साहात सहभागी झाले होते.
यावेळी सर्व लोकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते. 

देवरी येथील अग्रसेन चौकात अपघाताला आमंत्रण

देवरी,दि.३० (प्रतिनिधी)-  देवरी येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ६ वरील अग्रसेन चौकात खासगी कंपन्यांनी खड्डे  खोदल्याने हा चौक अपघातप्रवण क्षेत्र बनला आहे. परिणामी, आमगावच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी आणि वाहनचालकांना  जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. सदर रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,  २७ एप्रिलला या ठिकाणी खाज़गी कंपन्यांकडून राज्य मार्ग २७६ चे पाइप लाइन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले. खोदकाम करून पाइप तर टाकले, परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठमोठे खड्डे करुन ते बुजविण्यात आले नाही. परिणामी, या चौकात अपघाताची शक्यता बळावली आहे.
खासगी कंपन्यांनी खोदलेले हे खड्डे लवकर बुजविन्याची मागणी देवरीतील  व्यापाऱ्यांसह नागरिकांनी केली आहे

Saturday 29 April 2017

प्रेमासाठी स्त्रीवर सक्ती नकोच - सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली, दि. 29 - प्रत्येक स्त्रीला तिच्या मर्जीने आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. तिला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. तिचा समाजाने आदर केला पाहिजे. कोणीही स्त्रीला प्रेम करण्यासाठी भाग पाडू शकत नाही. तिला नकार देण्याचा पूर्ण अधिकार आहे असे महत्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. 
 
सुसंस्कृत समाजात पुरुषी अहंकार, दुराग्रहाला अजिबात थारा नाही. भारताच्या संविधानाने महिलेला अधिकार बहाल केले आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. छेडाछाडीच्या प्रकरणात सातवर्ष तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या एका आरोपीच्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. 
 
छेडछाड आणि तरुणीला आत्महत्येचे पाऊल उचलायला भाग पाडल्याबद्दल हिमाचलप्रदेश उच्च न्यायालयाने या आरोपीला सातवर्ष तुरुंवासाची शिक्षा सुनावली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. 
 
सार्वजनिक ठिकाणी स्त्रीची छेडछाड हा छळवणुकीचाच प्रकार आहे. अशा घटनांमधून महिलेला आदर देण्याची वृत्ती अजूनही समाजामध्ये  नसल्याचे दिसते. पुरुषांसारखे महिलेलाही तिचे स्वातंत्र्य आहे. संविधानाच्या कलम 14 नुसार तिलाही पुरुषाइतके स्वातंत्र्य आहे असे न्यायालयाने सांगितले. 

'तोंडी तलाक'ला राजकीय चष्म्यातून पाहू नका : नरेंद्र मोदी


Narendra Modi

नवी दिल्ली,29(वृत्तसंस्था) - 'तोंडी तलाक' या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा भाष्य केले असून या मुद्याला राजकीय चष्म्यातून पाहू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
संत बसवेश्‍वर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आज (शनिवार) मोदी बोलत होते. ते म्हणाले, "मुस्लिम समुदायातील सुधारकांनी मुस्लिम समुदायातील महिलांना सामोरे जाव्या लागणाऱ्या समस्यांविरुद्ध (तोंडी तलाक) लढण्यासाठी समोर यावे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा. मी मुस्लिम समुदायाला विनंती करतो की त्यांनी या मुद्याला राजकीय चष्म्यातून पाहू नये.'
ओडिशा येथील भुवनेश्‍वर येथे नुकत्याच पार पडलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मोदी यांनी तोंडी तलाकवर भाष्य केले होते. या विषयावर जे लोक मौन बाळगतात ते ही दोषी असल्याचे मोदी यांनी त्यावेळी सांगितले होते.
तोंडी तलाकचे रोज नवेनवे प्रकरणे समोर येत आहेत. स्पीड पोस्टाने, व्हॉटसऍपद्वारे तोंडी तलाक देण्यात येत आहेत. अशा तलाकपीडित महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना न्यायाच्या आशेने पत्र लिहून व्यथा मांडत आहेत.

IAS अधिकारी शहिदांच्या कुटुंबांना घेणार दत्तक


नवी दिल्ली, दि. 29 – नक्षलवादी तसंच दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्यांसाठी फक्त अश्रू ढाळत शोक व्यक्त करण्यापेक्षा आयएएस अधिका-यांनी त्यांच्या कुटुंबांना मदत करण्याचा निर्धार केला आहे. आयएएस अधिका-यांनी पुढाकार घेत शहिदांच्या कुटुंबांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशासाठी जीवाची बाजी लावून लढत असताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबावर त्यांच्यानंतर हालाखीत राहण्याची वेळ येऊ नये यासाठी आयएएस अधिका-यांनी हे स्तुत्य पाऊल उचललं आहे. त्यांच्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण आणि कुटुंबाला लागणारी आर्थिक मदत याची काळजी अधिकारी घेतील.
‘आयएएस अधिका-यांच्या संघटनेने देशाची सुरक्षा करत असताना शहिद झालेल्या संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलिस आणि राज्य पोलीस दलातील शहिद जवानांच्या कुटुंबांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक अधिकारी एका कुटुंबाला पाच ते दहा वर्षांसाठी दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ करेल. ज्या कुटुंबाला दत्तक घेण्यात येईल ती शक्यतो आयएएस अधिका-याची नियुक्ती असणा-या राज्यातील असेल’, अशी माहिती इंडियन सिव्हिल अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (सेंट्रल) असोसिएशनचे सचिव संजय भुसरेड्डी यांनी दिली आहे.

सरपंचांवर अविश्वास आणणार्यांना चपराक

सरपंचपदी सविता तरोणे कायम : सत्याची बाजू जिंकल्याची चर्चा
आमगाव,दि.29 : तालुक्यातील चिरचाळबांध येथे पुरेशी सदस्यसंख्या नसताना देखील वारंवार सरपंचांवर अविश्वास आणण्याचा प्रयत्न केला गेला. ६ मार्च २०१७ रोजी अविश्वासाकरिता सभा बोलावण्यात आली. तहसीलदारांवर राजकीय दबाव आणण्यात आला.  त्यात तहसीलदारांनी देखील अविश्वास प्रस्ताव पारीत केला. सरपंच आणि त्यांच्या साथीला असलेल्या सदस्यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागीतली. दरम्यान १५ एप्रील रोजी सरपंचांच्या बाजूने निकाल आला. या निकालामुळे सत्याचा विजय झाल्याची चर्चा तालुक्यात आहे.
चिरचाळबांध येथील ग्रामपंचायतीची निवडणूक २७ जुलै २०१५ रोजी पार पडली. सरपंच पदाकरिता १ आॅगस्ट २०१५ रोजी मतदान घेण्यात आले. त्यात सविता बळीराम तरोणे यांची सरपंच म्हणून निवड झाली. सर्वकाही सुरळीत सुरू  असताना काही सदस्यांच्या पोटात पोटशूळ उठले. त्यांनी अवघ्या सहा महिन्यात अविश्वास आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पुन्हा सहा महिन्यानंतर अविश्वास आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र एकूण नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीतील तीन सदस्यांनी निवडणूक विभागाकडे कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने त्यांना अपात्र घोषीत करण्यात आले. अविश्वास प्रस्ताव पारीत करण्याकरिता ठरवून दिलेल्या सदस्यसंख्येपेक्षा कमी संख्या असताना देखील ६ मार्च तहसीलदारांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. राजकीय दबाव असल्यामुळे तहसीलदारांनी अविश्वास प्रस्ताव पारीत केला. हा निर्णय अयोग्य असल्याचे कारण पुढे करून सरपंच सविता तरोणे आणि त्यांच्यासह असलेल्या एका सदस्याने ७ मार्च रोजी अपर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात धाव घेतली. अपर जिल्हाधिकारी यांनी यांनी पÑकरणाची तपासणी करून अविश्वास प्रस्ताव निरस्त करून सरपंचपदी सविता तरोणे कायम राहतील, असा निर्वाळा १५ एप्रील रोजी दिला.
ग्राम विकासात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न चिरचाळबांध येथील काही मंडळी नेहमी करतात. सरपंच सविता तरोणे यांच्या बाबतीत देखील असेच झाले. मात्र, त्यांचा कारभार आणि प्रशासन अगदी स्वच्छ असल्यामुळे त्यांचीच बाजू वरचढ ठरली. त्यांच्या विरोधकांना मात्र चांगलीच चपराक बसल्यामुळे चिरचाळबांध येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

57 व्या महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण


      गोंदिया,दि.30 - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 मे रोजी सकाळी        8 वाजता पोलीस मुख्यालय मैदान कारंजा येथे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होईल. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. तरी नागरिकांनी मोठ्या संख्येनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

30 लाख शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्या : मुख्यमंत्री


मुंबई दि.28: आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचे शिखर बँकेत विलीनीकरण करा, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरीप आढावा बैठकीत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेत असताना त्यांनी सहकार विभागाला सूचना दिल्या.जिल्हा बँका डबघाईला आल्याने पीक कर्ज वाटपाचं लक्ष्य पूर्ण होत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मत मांडले. राज्यातील 31 बँकांपैकी 11 बँका तोट्यात असून त्यापैकी 9 बँकांची स्थिती अत्यंत नाजूक आहे.सोलापूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, जालना, परभणी, बुलडाणा, वर्धा आणि नागपूर बँकांची स्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे या डबघाईला आलेल्या बँकांचं शिखर बँकांमध्ये विलीनीकरण करण्याचे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले.
सन 2017-18 ची राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संपन्न झाली. त्यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील- निलंगेकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जून खोतकर, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, सहकार विभागाचे प्रधान सचिव एस.एस.संधू, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांचीही शाळा घेतली. आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. शेतकऱ्यांची मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे, त्यासाठी अविश्रांत काम करा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.कर्जाच्या परिघाबाहेर गेलेल्या 30 लाख शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होईल यासाठी तात्काळ योजना तयार करा. अडचणीत असलेल्या 10 ते 12 जिल्हा बँकांचे ग्रामीण भागात जाळे मोठे आहे. त्याचा उपयोग करुन कमर्शियल बँकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या बँकांना एजंट बनवून टार्गेट पूर्ण करावेत. शेतकाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
पीक पद्धतीचं प्लॅनिंग करताना कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना सल्ला आणि सूचना देणे गरजेचे आहे. शिवाय हलक्या प्रतीच्या जमिनीत कापसाचे पीक घेऊ नका, हेही सांगणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.तुरीसारख्या पिकांसाठी यावर्षी शाश्वत मॉडेल तयार करु. येत्या दोन महिन्यात जलयुक्त शिवाराची कामं, मागेल त्याला शेततळं आणि विहिरी पूर्ण झाल्या पाहिजेत. यासाठी निधीचा तुटवडा भासू देणार नाही. मात्र वॉटर स्ट्रक्चर तयार करण्यासाठी मिशन मोडमध्ये कामं झाली पाहिजेत, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.कृषी आणि पणन विभागाने स्टोरेज आणि फूड प्रोसेसिंगसाठी जास्तीत काम केलं पाहिजे. शेतकऱ्यांना चांगला भाव देण्यासाठी या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यंदा दुष्काळी परिस्थिती उदभवली तर जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला तोंड देण्यासाठीचा आराखडा आतापासून तयार करावा. पुढचे तीन महिने महत्वाचे आहेत. त्यामुळे सर्व करण्याची तयारी ठेवा, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

मत्स्यतलावांच्या समस्येवर शिवहरेंच्या पुढाकाराने मंत्रालयात सकारात्मक चर्चा


गोंदिया,दि.28(berartimes.com)- गोंदिया-भंडारा जिल्हे हे तलावांचे जिल्हे म्हणून ओळखले जात असून या तलावांच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात मत्स्यव्यवसायही केला जातो.परंतु सरकारच्या अनास्थेमुळे व मत्स्यविभागातील अपुर्या कर्मचारी वर्गामूळे पाहिजे तो योजनांचा लाभ व योग्य मार्गदर्शन जिल्ह्यातील मत्स्यव्यसायीकांसह गोंदिया जिल्हा मत्स्य पालन संघाच्या पदाधिकार्यांना मिळत नसल्याने जिल्ह्यातील निलक्रांती पाहिजे तशी यशस्वी होऊ शकली नाही.ती यशस्वी करण्यासाठी गोंदिया जिल्हा मच्छिमार संघाचे संचालक व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विंध्य मुकेश शिवहरे यांनी आज(दि.28)शुक्रवारला मंत्रालयात राज्याचे मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर व  सामाजिक न्याय मंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.त्यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री जानकर यांनी शिवहरेंच्या प्रत्येक मुद्यावर लक्ष देत येत्या काळात गोंदिया भंडारा जिल्ह्यातील मत्स्यतलावांच्या खोलीकरणाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यासह मत्स्यव्यवसायासाठी मच्छिमार संघाला जुन्या तलावांसह अजून नवीन तलाव देण्यावर सकारात्मक आश्वासन दिले.तसेच रिक्त पदे भरण्यासंबधीही कारवाईचे आश्वासन दिले.यावेळी गोंदिया मत्स्यव्यवसाय विभागाचे उपायुक्त डाॅ.परवेझ यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ट अधिकारीही उपस्थित होते.

Friday 28 April 2017

विमान प्राधिकरणाकडून अपघातस्थळाची पाहणी

गोंदिया,दि.28-येथील बिरसी विमानतळावरील राजीव गांधी विमान प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास अपघात होऊन कोसळले होते. या अपघातात जागीच ठार झालेले दोन पायलट रंजन गुप्ता यांच्यावर गोंदिया येथे; तर, प्रशिक्षणार्थी पायलट हिमानी गुरुदयावसिंह कल्याण हिच्यावर दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या अपघाताच्या चौकशीसाठी आलेल्या दिल्ली येथील विमान प्राधिकरणाच्या समितीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

पायलट रंजन गुप्ता हे गोंदियातील अंगुर बगीचा भागात कुटुंबीयांसह भाड्याने राहत होते. गुप्ता हे गेल्या चार वर्षांपासून नॅशनल फ्लाइंग अकादमीसोबत काम करीत असलेली कनेडियन कंपनी सीएआयमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करीत होते. त्यांच्या पत्नी श्रावणी ह्या स्थानीक पोद्दार स्कूलमध्ये नोकरीला असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. गुप्ता हे गेल्या १८ वर्षांपासून विमान चालवित होते.
हिमानी कल्याण हिचे वडीलसुद्धा वायुसेनेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे आपल्या मुलीनेही पायलट व्हावे, या उद्देशाने ‌त्यांनी हिमानीला प्रोत्साहित केले होते. हिमानीचा मृतदेह गुरुवारी तिचे कुटुंबीय दिल्लीला घेऊन गेले होते. या घटनेनंतरही सीएएआयच्यावतीने अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.

आधारकार्ड सक्ती म्हणजे गुलामगिरी- एससी


 नवी दिल्ली,28- केंद्र सरकारने आधार कार्ड नंबर पॅनकार्डशी संलग्न ठेवणे बंधनकारक केले आहे. आधार नंबर असेल तरच पॅनकार्ड काढता येणार आहे. त्याशिवाय कर जमा करण्यासाठीही आधार कार्ड सक्तीचे करण्यात आल्याने त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करण्यात आली आहे. अशा प्रकारे आधार कार्डची सक्ती करणे म्हणजे लोकांना गुलाम बनवणे असून त्यामुळे नागरिकांना सरकारच्या दावणीला बांधले जाईल असा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए.के. सीकरी आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली आहे. ज्येष्ठ विधीज्ञ श्याम दिवाण यांनी आधार कार्डची सक्ती करणे हे संविधानानुसार नागरिकांच्या मुलभूत अधिकाराचे हनन असल्याचा दावा केला. निवृत्त लष्करी अधिकारी सुधीर वोम्बाटकरे आणि दलित कार्यकर्ते बेजवादा विल्सन यांनी ही याचिका दाखल केली असता त्यांच्यावतीने दिवाण यांनी हा युक्तिवाद केला. आधार कायद्यानुसार आधार कार्ड बंधनकारक नसावे ते ऐच्छिक असावे. आयकर कायद्यानुसार सरकार आधार कार्ड सक्तीचे करू शकत नसल्याचंही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
माझ्या हात आणि डोळ्याचे प्रिंट हे माझ्या शरीराचे भाग आहेत. माझा माझ्या शरीरावर पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे त्याचे प्रिंट मागण्याचा सरकारला अधिकार नाही. आधारच्या माध्यमातून सरकार सर्वांवर लक्ष ठेवू शकत नाही. लोकशाहीत हा प्रकार नैतिकतेला धरून नसल्याचंही ते म्हणाले.

131 जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्या


नागपूर, दि. 28 – मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती आणि प्रशासकीय न्यायाधीश डॉ. मंजुळा चेल्लूर यांनी राज्यातील 131 जिल्हा न्यायाधीश आणि 161 वरिष्ठ दिवाणी न्यायाधीशांच्या बदल्या केल्या आहेत. या बदली आदेशानुसार विदर्भात येणारे आणि विदर्भातून जाणारे न्यायाधीश नावे पुढील प्रमाणे आहेत.
– जिल्हा न्यायाधीशांच्या करण्यात आलेल्या बदल्या
 मुंबई येथील ए.एस. शेंडे यांची वर्धा, बीड येथील एस.एस. शर्मा यांची बुलडाणा, बुलडाणा येथील ए.एस. कलोटी यांची मुंबई, नागपूर येथील एम. सलमान आझमी यांची मुंबई, नागपूर येथील एम.एम. उमर यांची मुंबई, नागपूर येथील व्ही. सी. बरडे यांची मुंबई, ठाणे पालघर येथील ए. डी. क्षीरसागर यांची बुलडाणा,  नागपूर येथील एम.ए. बरालिया यांची मुंबई, यवतमाळ केळापूर येथील एस. पी. डोरले यांची भुसावळ, बीड येथील व्ही.व्ही. विद्वंस यांची अमरावती अचलपूर, अचलपूर एस. बी. हेडाऊ  येथून मुंबई, वाशिमचे ए. के. शहा यांची पुणे, मुंबईचे ए. एस. काझी यांची नागपूर, नागपूरचे एस. एच. ग्वालानी यांची पुणे, मुंबईचे शैलेश देशपांडे यांची नागपूर , नाशिक मालेगावचे एस. एस. खंडागळे यांची नागपूर, भंडाºयाचे व्ही. जी. धांडे हे भंडारा येथेच कायम आहे.  औरंगाबादचे बी.पी. क्षीरसागर यांची नागपूर, मुंबईचे ए.ए. सय्यद यांची अचलपूर, अमरावती अचलपूरचे एम.एस. शेख यांची नांदेड, नागपूरचे वाय. जी. खोब्रागडे यांना नागपुरात कायम. मुंबईचे एम.के. महाजन यांची नागपूर, अमरावती अचलपूरचे व्ही.पी. पाटकर यांना अचलपुरात कायम. जालनाचे व्ही.एस. देशपांडे यांची वाशिम, मुंबईचे आर. एन. जोशी यांची यवतमाळ केळापूर, बुलडाणाचे पी.एल. गजभिये यांची धुळे, अमरावतीचे एस. एस. भीष्म, यवतमाळचे ए.टी. वानखेडे, अकोल्याचे जी.जी. भालचंद्र, नागपूरचे डी.डी. खोचे, चंद्रपूर वरोराचे के.एन. गौतम, नागपूरचे जी.पी. अग्रवाल यांना कायम ठेवण्यात आले.  भुसावळचे संजय कुळकर्णी यांची नागपूर,  नागपूरचे एस.एस. कंठाळे यांची जालना. एच.एस. सातभाई यांची मुंबईहून गोंदियाला, एस. एन. राजूरकर यांची वर्धाहून यवतमाळ, व्ही.के. देशमुख यांची नागपूरहून नांदेड, आर.पी. देशपांडे यांची यवतमाळहून मुंबई, एस.एन. मोरवले यांची अकोलाहून जालना, ए.ए. ढोमणे यांची नागपूरहून मुंबई, डी.एन. खडसे यांची यवतमाळहून बीड, एस.एस. ओझा अमरावतीला कायम. डी.एन. सुरवसे यांची बुलडाणा खामगावहून बीड, सी.व्ही. मराठे यांची मुंबई माजगावहून नागपूर , आर.एम. कुळकर्णी यांची ठाण्याहून बुलडाणा, व्ही.डी. पिंपळकर यांची अकोलाहून पुणे बारामती, आर.डी. गोधणे यांची परभणीहून चंद्रपूर वरोरा, के.पी. श्रीखंडे यांची यवतमाळ पुसदहून चंद्रपूर, एस.सी. शिरसाठ यांची बुलडाणाहून औरंगाबाद, व्ही.बी. पारगावकर यांची अहमदनगर श्रीगोंदाहून अमरावती, एस.एच. जगताप यांची अहमदनगरहून  अमरावती, आर. एन. बरड यांची लातूरहून नागपूर, व्ही.ए. पाटील यांची अहमदनगर कोपरगावहून वर्धा, एस.बी. पवार यांची अमरावतीहून लातूर, डी.पी. शिंगाडे यांची मुंबईहून अकोला, एम.जी.चव्हाण यांची औरंगाबादहुन बुलडाणा, एस.एम. आगरकर यांची यवतमाळहून पुणे, बी.एम.पाटील यांची मुंबईहून गडचिरोली, के.एस. तोतला यांची मुंबईहून नागपूर, ए.सी. डागा यांची यवतमाळहून औरंगाबाद, व्ही.आर.अग्रवाल यांची नाशिकहून पुसद यवतमाळ, आर. के. क्षीरसागर यांची मुंबईहून नागपूर, एम.आय. लोकवानी नागपुरात कायम. जी.पी. कौडीकर यांची नागपूरहून लातूर, आर. आर. राऊत यांची मुंबईहून यवतमाळ, पी.पी. मुळे यांची जळगाव भुसावळहून यवतमाळ, एम.आर.ए. शेख यांची सांगलीहून यवतमाळ, ए. ए. आयचित यांची मुंबईहून वर्धा, एन.जी. शुक्ला यांची पुण्याहून अकोला, पी.एम. गुप्ता यांची यवतमाळहून अहमदनगर कोपरगाव, एस. बी. भगत यांची बुलडाणाहून ठाणे कल्याण, ए.जी. सातपुते यांची नागपूरहून मुंबई, एस. यु. हाके यांची मुंबईहून नागपूर, एस.पी. अग्रवाल यांची मुंबईहून नागपूर, संतोष पी. देशमुख यांची वाशिमहून सोलापूर, आर. एम. राठोड यांची चंद्रपूरहून मुंबई, आर. बी. रेहपाडे यांची गडचिरोलीहून मुंबई, डी. ए. जाधव यांची मुंबईहून नागपूर, सी.एल. देशपांडे यांची चंद्रपूरहून यवतमाळ, ए.एन. भंडारवार यांची पुण्याहून यवतमाळ, के. पी. क्षीरसागर ूयांची मुंबईहून नागपूर, एस.बी. भाजीपाले यांची अमरावतीहून मुंबई, पी. एस. काळे यांची नागपूरला कायम. एच. एल. मनवर यांची यवतमाळहून मुंबई, एस.आर. अग्रवाल यांची नागपूरहून मुंबई, पी.एम. बडगी यांची अकोलाहून मुंबई, डी.वाय. काळे वर्धाहून नागपूर, एम.एस. तिवारी यांची यवतमाळहून परभणी, ए.व्ही. मिश्रा यांची अकोल्याहून मुंबई, वाय.एन. तिवारी यांची यवतमाळहून परभणी, एस.बी. राठोड यांची पुण्याहून अमरावती, आर. एस. सालगावकर यांची नागपूरहून मुंबई, एस.जी. शेख यांची नागपूरहून मुंबई, व्ही.एम. कºहाडकर यांची चंद्रपूरहून पुणे येथे बदली झाली आहे.

अन् ‘तिला’ मिळाले नवजीवन


देवरी,दि.28 : हृदयाचे एक व्हॉल्व्ह खराब असलेल्या शेतकरी पत्नीला पैशाअभावी उपचार करता आले नाही. मात्र सत्य सामाजिक संस्थेने पुढाकार घेत मुख्यमंत्री सहायता निधीतून सदर महिलेचा उपचार करवून ‘तिला’ नवजीवन मिळवून दिले. प्रीती गजानन शिवणकर रा. शिरपूर (ता. देवरी) असे त्या महिलेचे नाव असून आता ती गुण्यागोविंदाने आपल्या कुटुंबासह संसार करीत आहे.
प्रीतीचे लग्न सन २०१३ मध्ये झाले होते. चांगले सहजीवन सुरू असतानाच पहिल्या बाळाच्या प्रसूतीवेळेस तिच्या हृदयाचे एक व्हॉल्व्ह खराब असल्याचे कळले. मुलगा लहान असताना काहीच करता आले नाही. मात्र नंतर उपचारासाठी नागपुरातील अनेक नामांकित हॉस्पिटलमध्ये भटकंती झाली. सर्वच ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी अडीच ते तीन लाखांचा खर्च सांगण्यात आला. पती शेतकरी असल्याने एवढा खर्च झेपावत नव्हता.
अशातच सत्य सामाजिक संस्था आरोग्याविषयी काम करते व संस्थेची आपल्याला काही मदत होवू शकते, ही बाब लोकांच्या माध्यमातून पती गजानन यांना कळली. त्यांनी विलंब न करता संस्थेचे कार्यकारी संचालक देवेंद्र गणवीर यांना संपर्क साधला व आपली परिस्थिती सांगितली. गणवीर यांनी नागपूरच्या (कामठी) आशा हॉस्पिटलमध्ये डॉ. सौरभ अग्रवाल यांच्याशी संपर्क करून हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विवेक लांजे यांना प्रीतीला दाखविले. लगेच शस्त्रक्रिया करावी लागेल अन्यथा दुसरा वॉलसुद्धा खराब होवू शकतो, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
मात्र, शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या पैशाची अडचण होती. गणवीर मागील पाच वर्षांपासून या क्षेत्रात कार्य करीत असल्याने त्यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची कल्पना होती. त्यांनी गजाजन यांंना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सांगितले व स्वत: नागपूरच्या जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून कागदपत्रांवर स्वाक्षरी घेतली. यानंतर नागपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयात प्रीतीची फाईल जमा केली. आठ दिवसांनी फाईल पास झाली व एक लाख २५ हजार रूपये शस्त्रक्रियेसाठी मंजूर झाले. प्रीती १४ एप्रिलला आशा हॉस्पिटल नागपूर येथे भरती झाली व दुसऱ्या दिवसी तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता ती स्वगावी कुुटंबासह आनंदी असून तिने हॉस्पिटलचे संचालक डॉ. सौरभ अग्रवाल, सर्जन डॉ. विवेक लांजे, सत्य संस्थेचे देवेंद्र गणवीर, समन्वयक राहुल राऊत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

सामूहिक विवाह सोहळ्यात ओबीसी सदस्यता नोंदणी

सालेकसा,दि. 27- युवा कुणबी समाज समिती साखरीटोल्याच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात ओबीसी संघर्ष कृती समितीतर्फे ओबीसी सदस्यता नोंदणी शिबिर घेण्यात  आले. या शिबिरात नऊ जोडप्यांसह दोनशेच्या वर वऱ्हाड्यांनी नावनोंदणी केली.
यावेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, जिल्हा सचिव मनोज शरणागत, जिल्हा संघटक शैलेश बहेकार, सावन डोये, तालुकाध्यक्ष मनोज डोये, संजय बोहरे, गिरीजा मेंढे, उपस्थित होते.  यशस्वितेसाठी  यशवंत शेंडे, पवन पाथोडे, विवेक बहेकार, उद्देश चौरागडे, सुमित मेंढे, धम्मदीप शहारे, लखन बहेकार आदींनी सहकार्य केले.

शेतकरी कुटुंबातील तिघांनी विष घेतले

यवतमाळ,दि.28 : शेतजमिनीवर ताबा करण्यात येत असल्याच्या कारणावरून दारव्हा तालुक्यातील डोल्हारी येथील शेतकरी कुटुंबातील तिघांनी जिल्हाधिकार्‍यांच्या कक्षासमोर विष प्राशन केले. ही घटना गुरुवार, २७ एप्रिल रोजी घडली. उमेश दत्तसिंग गौतम (२८), कुंदन रामचंद्र गौतम (१७), आशिष अरुण गौतम (३२) अशी विष प्राशन करणार्‍यांची नावे आहेत. येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात तिघांवरही उपचार सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल सभागृहामध्ये प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत दुपारी नागरिकांच्या अडचणी जाणून घेत होते. दरम्यान निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकरी कुटुंबातील तिघांनी विष प्राशन केल्याचा प्रकार घडला. याची माहिती शिपायाने वरिष्ठांना दिली. तिघांनाही कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. दरम्यान प्रभारी जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, दारव्हा एसडीओ जयंत देशपांडे, यवतमाळ एसडीओ राजेंद्र देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, तहसीलदार सचिन शेजाळ, एसडीपीओ पीयूष जगताप आदींनी रुग्णालय गाठले. सोनू गौतम याला आत्या मृतक सरस्वती बैस यांनी २ हेक्टर ८ आर शेती वाटणीपत्र करून दिली होती. तो अज्ञान असल्यामुळे सदर शेतजमीन वडील यांच्या ताब्यात आहे. दरम्यान, गंगा इंद्रबहाद्दूर ठाकूर, रवी जनकवार, अमोल ठाकूर (रा. सर्व धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) यांनी जमिनीवर अवैधरीत्या ताबा करण्याचा प्रय▪केला. यामध्ये दारव्हा ठाणेदारही सहभागी असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

श्रीनिवासनचा मृतदेह आढळला


नागपूर/गोंदिया, दि.27 : उमरेड-कारांडला अभयारण्यातून बेपत्ता झालेला जय वाघाचा बछडा  ‘श्रीनिवास’ चा मृतदेह आढळल्याने त्याची शिकार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. उमरेड  कर्हांडला अभयारण्याची ओळख बनलेला जय हा तरणाबांड वाघ 18 एप्रिलपासून बेपत्ता आहे. त्याला शोधण्यासाठी 100 हून अधिक स्वयंसेवकांनी मोहीम राबवली होती. तब्बल 250 किलो वजन असलेला हा तरणाबांड वाघ या अभयारण्याची ओळख बनला होता.चंद्रपुर जिल्ह्यातून काही दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या जय वाघाच्या बछड्याची शिकार झाल्याचे आज  समोर आले आहे. श्रीनिवासन या बछड्याचा मृतदेह आढळल्याची माहिती वन विभागातर्फे देण्यात आली आहे.श्रीनिवासनची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. विद्युतस्पर्शाने श्रीनिवासनचा जीव घेतल्याची कबुलीही आरोपींनी दिली आहे. श्रीनिवासन या बछड्याच्या अवयवांची तस्करी करुन उर्वरित भाग पुरल्याचे त्यांनी सांगितल्याचे बोलले जात आहे.नागभीडपासून पाच किलोमीटर अंतरावर श्रीनिवासनचा मृतदेह आढळला. महादेव इरपाते या शेतकऱ्याच्या शेतात बछड्याचा मृतदेह सापडला. याच ठिकाणापासून अर्ध्या किमी अंतरावर दोन दिवसांपूर्वी श्रीनिवासनचा कॉलर बेड सापडला होता.

Thursday 27 April 2017

उडान’द्वारे पर्यटन, औद्योगिक, शिक्षण क्षेत्रातील अमर्याद संधी खुल्या – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी



नांदेड-हैद्राबाद विमानसेवेस व्हिडीओलिंकींगद्वारे प्रारंभ

नांदेड, दि. 27 - ‘उडान’- उडे देश का आम नागरिक’ या योजनेद्वारे देशाचे अनेक भाग हवाई मार्गाने जोडून देशाची एकात्मता आणखी दृढ करण्याचा प्रयत्न आहे. या माध्यमातून भारताकडे हवाई क्षेत्राच्या विकासाबरोबरच पर्यटन, औद्योगिक, व्यापार, शिक्षण अशा क्षेत्रातील अमर्याद संधी खुल्या होतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ‘उडान’ या केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या महत्त्वाकांक्षी क्षेत्रीय संपर्क योजनेतील नांदेड–हैद्राबाद विमान सेवेचा प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओलिंकीगद्वारे आज करण्यात आला. या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी शिमला येथून बोलत होते.
यानिमित्ताने नांदेड येथील गुरुगोबिंदसिंघजी विमानतळावर शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार जवळगावकर, नांदेडच्या महापौर शैलजा स्वामी, आमदार सर्वश्री अमर राजूरकर, डी. पी. सावंत, हेमंत पाटील, डॉ. तुषार राठोड, एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे किशनलाल शर्मा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे,  मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमानंतर नांदेड-हैद्राबाद विमानाच्या प्रवाशांना शुभेच्छा देऊन विमान हैद्राबादकडे रवाना करण्यात आले. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते नांदेड-हैद्राबाद विमानसेवेसह, शिमला –दिल्ली, कडप्पा-हैद्राबाद या विमानसेवांचाही प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी बोलताना प्रधानमंत्री मोदी म्हणाले, परवडेल अशा दरात हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध झाल्याने, देशातील नागरिकांना आपल्या विविध क्षमतांचा विकास करण्याची संधी मिळेल. यामुळे देश विकासाच्या वाटेवर अग्रेसर होईल. उडानमध्ये सामान्य नागरिकांना हवाई प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. देशाचा कानाकोपरा जोडला जाईल. यातून देशाची एकात्मता आणखी दृढ होईल. पर्यटन, औद्योगिकीकरण, व्यापार, शिक्षण अशा क्षेत्रातील अमर्याद संधीही खुल्या होतील. नांदेड, अमृतसर आणि पाटणा या शिख धर्मियांच्या तीर्थस्थळांसाठी विमानसेवा सुरु करण्याने जगभरातील शिखबांधव या सेवेला चांगला प्रतिसाद देऊ शकतात, असेही प्रधानमंत्री मोदी यांनी विमान कंपन्यांना सूचित केले.
तत्पुर्वी, नांदेड विमानतळ येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना श्रीमती मुंडे म्हणाल्या की, देशाच्या प्रगतीत सामान्य नागरिकांना केंद्रस्थानी
ठेवून उडान या संकल्पनेला प्रधानमंत्री मोदी यांनी चालना दिली आहे. केवळ पायाभूत सुविधांचा विकास नव्हे, तर त्या सुविधांचा सामान्य नागरिकांसाठी वापर होणे आवश्यक आहे. या योजनेमुळे विमान प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येईल. नांदेड येथून सुरु होणाऱ्या विमानसेवेचा फायदा लगतच्या जिल्ह्यांनाही होणार आहे. पर्यटन क्षेत्राच्या विकासासह, या परिसरातील प्रत्येक क्षेत्रासाठी विमानसेवा महत्त्वाची ठरणार आहे. श्री. संभाजी पाटील-निलंगेकर म्हणाले की, विमानसेवा केवळ खास वर्गासाठी असू नये, तर ती देशातील आम नागरिकांनाही उपयुक्त ठरावी, अशी ही योजना आहे. या विमान सेवेचा नांदेडसह अन्य जिल्ह्यांना निश्चितच फायदा होणार आहे. या विमानसेवेचा भविष्यात चांगला विस्तारही होईल, असेही त्यांनी सांगितले.
खासदार अशोक चव्हाण यांनीही या विमान सेवेमुळे नांदेडमधील पर्यटन, औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल, तसेच मराठवाड्याच्या विकासाच्यादृष्टीने विमान सेवा उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

लोकप्रतिनिधींसह अधिकार्‍यांना निवेदन;समस्यांसाठी शिक्षकांचा एल्गार!


गोंदिया ,दि.27 : राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाच्यावतीने २८ फेब्रुवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयात नवीन बदल धोरणातील तरतूदीचा फेरविचार करण्यात यावा तसेच शिक्षकांच्या अन्य प्रलंबित मागण्यांना घेत महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाच्यावतीने बुधवार २६ एप्रिल रोजी संपूर्ण राज्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजन करण्यात आले होते. या पाश्‍वभूमीवर गोंदियातही महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिक्षकांनी धरणे आंदोलन करीत जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाला निवेदन पाठविले.जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांनी धरणेमंडपात येऊन शिक्षकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निवेदन स्विकारले,तसेच बदली प्रर्कियेत अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली.
निवेदनातील मागण्यांमध्ये ग्राम विकास विभागाने काढलेल्या नवीन बदली धोरण शिक्षकांच्या हिताच्या नसल्याने त्यातील तरतूदी सुधारित करण्यात याव्यात तसेच प्रशासकीय बदल्या तालुक्यातच करण्यात याव्या, विनंती करून किंवा स्वच्छेने जे शिक्षक जाण्यास तयार आहेत त्यांना बदली देण्यात यावी, अतिदुर्गम भागात जे शिक्षक स्वच्छेने राहण्यास तयार आहेत त्यांची बदली करण्यात येऊ नये, १ नोव्हेंबर २00५ नंतर सेवेत दाखल झालेल्यांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, शिक्षकांना ७ वा वेतन आयोग लागू करण्यात यावा, जिल्हा परिषद शाळांतील मुला-मुलींना मोफत गणवेश देण्यात यावे, जिल्हा परिषद, नगरपरिषद शाळेतील विद्युत बिल जिल्हा परिषदेकडून भरण्याची तरतूद करण्यात यावी, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे भरण्यात यावी, प्रसुती रजेवर असलेल्या शिक्षकांच्या रजा कालावधीत हंगामी शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेला मुख्याध्यापक पद मान्य करण्यात यावे, विधान परिषदेत दिलेल्या आश्‍वासनानुसार संगणक प्रशिक्षणाबाबत शासन निर्णय निर्गमित करून वसुली थांबविण्यात यावी व तिची परतफेड करण्यात यावी, नगरपालिका शाळेतील शिक्षकांना गट विमा लागू करण्यात यावा याशिवाय प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला शिक्षकांचे वेतन देण्यात यावे, १२ वर्ष पूर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लावण्यात यावी यासह अनेक मागण्यांचा समावेश होता. यातील राज्य पातळीवरच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली असली तरी, जिल्हा पातळीवरील समस्यांसाठी हे आंदोलन उभारले असल्याचे शिक्षक संघाच्यावतीने सांगण्यात आले.
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष व शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र कटरे, शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष नूतन बांगरे, अनिरुद्ध मेश्राम, टी.के. नंदेश्‍वर, यू.पी. पारधी, नागसेन भालेराव, सुधीर वाजपेयी, केदार गोटाफोडे, वाय.एस.भगत, बी.बी.ठाकरे, शंकर नागपुरे, ओमेश्‍वरी बिसेन, गौरीशंकर खराबे, गणेश चुटे, विनोद लिचडे,शंकर चव्हाण,अयुब खान यांच्या शिक्षक संघाचे पदाधिकारी व शिक्षक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आंदोलनानंतर शासनाला जिल्हाधिकार्‍यांमार्फत निवेदन देण्यात आले.

गोंदियातील अतिक्रमण शहराला लागलेला काळा डाग-खासदार पटोले


गोंदिया, दि.27=शहर हे माझे जन्मस्थळ आहे,त्यामुळे सुरवातीपासूनच गोंदिया शहराचे सौदर्यीकरण व्हावे यासाठी खासदार झाल्यापासून मी काम करीत आहे.परंतु काही लोकांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करुन दुकाने थाटल्यानेच नव्हे तर रस्त्यावर दुकानातील साहित्य ठेवून रस्ता अडविणाèयामुळे गोंदिया शहर हे कलqकत झालेले आहे.ज्या लोकांनी रस्ते,नाल्यावर अतिक्रमण केले आहे,त्यांनी आपले अतिक्रमण स्वतःच हटवून परिषदेच्या मोहिमेला सहकार्य करायला हवे अशी प्रतिक्रिया खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केली.
शहराच्या विकासासाठी व सौंदर्यीकरणासाठी जेव्हा केव्हा प्रयत्न केले तेव्हा नगरपरिषद क्षेत्रातील अतिक्रमण व इतर बाबीच अडचणीच्या ठरल्या,उलट रेल्वेच्या परिसरात झपाट्याने विकासाची कामे सुरु झाली आहेत.शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांना अतिक्रमणधारकापासून होणाèया त्रासामुळे गोंदियाचे नाव जनमानसात वाईट होत चालले आहे,त्यामुळे दुकानदारांनीच आपल्या शहराच्या नावाचे लौकीक टिकवून ठेवण्यासोबत प्रशासनाने जे बेरोजगार अतिक्रमणधारक आहेत,त्यांच्यासाठी कुठेतरी पर्यायी व्यवस्था सुध्दा उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे पटोले यांनी सांगितले.त्याचप्रमाणे एप्रिल महिन्यातच झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत पत्रकारावर काही अतिक्रमणधारकांनी हल्ला केला ही निंदनीय घटना आहे. त्या सर्वांना कडक शिक्षा कायद्यानुसार मिळेल. कुठल्याही पोलीस अधिकाèयाला अतिक्रमणहटाव मोहिमेतील प्रकरणात कारवाई करु नका किंवा या पोलिस अधिकार्याला हटविण्यासाठी कुणालाही बोललो नाही.तरीही माझ्यानावाने कुणी गैरप्रचार करीत असेल तर त्यास मी काहीच करु शकत नाही.परंतु लोंकानी अतिक्रमण हटाव मोहिमेत प्रशासनाला सहकार्य करावे मग ते कुठल्याही मोठ्या नेत्याचेच काय लहान व्यापाèयाचेही असले तरी अतिक्रमण हटणे महत्वाचे आहे.
अतिक्रमण हटाव मोहिम माझ्या घरापासूनच सुरु करा-दादरीवाल
गोंदिया शहरातील अतिक्रमण हटाव मोहिम ही एकदा काटेकोरपणे राबविणे गरजेचे आहे.ही मोहीम राबविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असून माझ्या घरापासूनच प्रशासनाने आधी अतिकॅ्रमण असल्यास मोहीमेची सुरवात करावी माझे पुर्ण सहकार्य राहणार असल्याची ग्वाही माजी नगरसेवक दिनेश दादरीवाल यांनी दिले.सोबतच अस्थायी अतिक्रमण जे असतात त्यांना हटविण्यासाठी प्रशासनाकडून कुठलेही नोटीस देणे कायदेशीर बंधनकारक नसल्याचेही सांगितले.
अतिक्रमण हटाव मोहिमेत जनतेसोबत-नगरसेवक अग्रवाल
शहरातील अतिक्रमण हटविण्याबाबत आपल्या वार्डातीलच नव्हे तर शहरातील जनतेची जी भूमिका आहे,त्या भूमिकेसोबतच आपण असल्याची ग्वाही नगरसेवक धर्मेश(बेबी)अग्रवाल यांनी व्यक्त केली.
संपूर्ण गोन्दिया जिल्हा अतिक्रमण मुक्त करावा. सर्वत्र कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. जनतेच्या हितासाठी शासनाने सोडलेली जागा जनतेच्या उपयोगासाठी असावी तेव्हा ‘सबका साथ सबका विकास ‘ होईल. शासन सर्व जनतेच्या हितासाठी रस्त्याच्या बाजूला जागा सोडते, अनेक ठिकाणी सार्वजनिक ऊपयोग करण्यासाठी जागा सोडलेली असते.त्या जागा अतिक्रमण मुक्त असाव्यात. सर्व अतिक्रमण काढण्याप्रसंगी कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे. जगदीश शर्मा ,आमगाव

समाजाची व्याख्या समजली तेच समाजकार्य करतात : केळझरकर

सुरेश भदाडे


गोंदिया,दि.27 : नाभिक समाजाची व्याख्या तशी सरळ व सोपी आहे. ज्यांना-ज्यांना समाजाची व्याख्या किंवा संघटनेची व्याख्या समजली ते सर्व बंधू-भगिनी समाज कार्य करून समाज संघटना मजबूत करतात. समाजाला वैभव शिखरावर नेण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्यांना समजली नाही ते स्वत:च्या मुलांमुलीच्या लग्नापर्यंतची वाट बघतात असे विचार महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांत अध्यक्ष पुंडलिकराव केळझरकर यांनी व्यक्त केले.

अखेरच्या तासातच हिमानीचे पायलट होण्याचे स्वप्न भंगले


खेमेंद्र कटरे
गोंदिया(berartimes.com),दि.26– येथील बिरसी विमानतळावरील कॅनडियन कंपनीसोबत असलेल्या नॅशनल फ्लाईंग अकादमीच्या प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी विमानाला आज बुधवारला सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास अपघात होऊन दोन पायलट जागीच ठार झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत घडली.हे विमान चार आसनी असून डीए.४२ क्रमांकाचे होते.मृत पायलटमध्ये वरिष्ट पायलट रंजन रंजीत गुप्ता(वय ४५) यांचा समावेश असून प्रशिक्षणार्थी पायलट ही कु.हिमानी गुरुदयाल कल्याण (वय २४,रा.दिल्ली )चा समावेश आहे.विशेष म्हणजे या अपघाताने हिमानीच्या कुटूबियांतील सदस्यांचे आयुष्यातील सर्वात मोठं स्वप्नच हिरावून घेतले आहे.पायलट होण्यासाठी जो 200 तास सराव करावा लागतो,त्या सरावाताली अपघाताच्यापुर्वी उड्डाण घेतलेला अखेरचा तास हा 199 चा टप्पा पार करुन 200 तास होणार होता.परंतु नियतीला हिमानीचे हे 200 तास पुर्णच होऊ द्यायचे नव्हते की काय अशी चर्चा रुंगू लागली आहे.अकादमीतील काहींच्या मते हिमानीने 200 व्या तासासाठी उड्डाण भरले होते.त्यानंतर ती सोलो पायलट म्हणून एकटी विमान चालविण्याचे काम करु शकली असती.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षणार्थी वैमानिक आपल्या वरिष्ट पायलटसोबत प्रशिक्षणार्थी विमानाने (विमान क्र.डीए.४२) विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर गोंदियापासून पश्चिमेला असलेल्या देवरी गावाजवळून वाहणाèया वैनगंगा नदीच्या मधल्या पात्रात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले.प्रत्यक्षदर्शी लोकानी दिलेल्या माहितीनुसार विमानात बिघाड आले असावे त्यामुळे ते नदीपात्रात सुरक्षित विमान उतरविण्याचा प्रयत्न करीत असताना विमान हलत होते त्याचवेळी वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी मोजण्यासाठी लावलेल्या देवरी ते मध्यप्रदेशातील लावणी या गावाला जोडणाèया रोपवेच्या ताराला विमानाचे पंखे अडकले गेले.त्यात पंखे वेगळे झाले आणि  प्रशिणार्थी विमानाचे चार ते पाच तुकडे झाले.रोपवेच्या तारापासून विमानाचा मुख्य इंजिन किमान १०० मीटर दुरपर्यंत फेकला गेला.एक इंजिन एकीकडे तर दुसरा इंजिन एकीकडे फेकला गेला. या घटनेची माहिती तेथील सरिता जलमापन केंद्र देवरीच्या कर्मचाèयाने दवनीवाडा पोलीसांना दिली.या अपघातातात महिला पायलटचा पाय मोडला गेला असून दोन्हीच्या डोक्याला जबर मार लागलेला आहे.मृत पायलट यांचे मृतदेह केटीएस जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले आहे.उत्तरीय तपासणीqनतर मृतदेह हे एयरएंबुलसने पाठविण्याची तयारी विमानतळ प्राधिकरणाने केल्याची माहिती सुत्रांनी दिली.या घटनेच्या तपासासाठी दिल्ली येथील विमानतळ प्राधिकरणाची एक चमु सुध्दा बिरसी विमानतळावर दाखल झाली आहे.
आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाचे प्रबधंक राजा रेड्डी,अप्पर तहसिलदार एन.एस.मेश्राम,बालाघाट जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अमित सांघी व उपविभागीय अधिकाèयांनी घटनास्थळावर धाव घेत परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांच्या सहकार्याने मदतकार्य करीत अपघातग्रस्त विमानातून मृत पायलट यांना काढले.अपघातात पुर्णत मोडकळील आलेल्या प्रशिक्षणार्थी विमानाच्या ब्ॅलकबाँक्स च्या तपासणीनंतरच विमानात बिघाड आला होता की नाही याचा उलगडा होणार आहे.
बिरसी विमानतळ व प्रशिक्षण केंद्रावरील काही घटना
यापुर्वी २०१० मध्ये विमानतळावरुन उडालेला विमान मध्यप्रदेशातील लांजी येथे इमरजंसी लँडीगच्या माध्यमातून उतरविण्यात आला होता.त्यावेळी तो प्रशिक्षणार्थी विमान पुर्णत क्षतीग्रस्त झाला होता.
१८ मार्च २०१३ रोजी विमानतळाच्या रनवे वरुन सरळ प्रशिक्षणार्थी विमान रनवेच्या बाहेर येऊन एका वाहनात शिरले होते.तिसरी घटना
गोंदियाच्या बिरसी विमानतळावरुनच प्रशिक्षणासाठी उडालेल्या रायबरेली येथील प्रशिक्षणार्थी विमानाचा(डायमंड-४०) मध्यप्रदेशातील पचमढी परिसरात २४ डिसेंबर २०१३ मध्ये अपघात होऊन एका पायलटचा मृत्यू झालेला होता.त्यामध्ये सोहेल अंसारी या पायलटचा मृत्यू झाला होता.
 तर दीड महिन्यापुर्वी सुध्दा बिरसी विमानतळावर प्रशिक्षण घेणाèया दोन प्रशिक्षर्णार्थी पायलटचा आकस्मिक मृत्यू झाल्याचे प्रकरण समोर आले होते.आत्तापर्यत येथील विमानतळावरील राष्ट्रीय विमान प्रशिक्षण संस्थेत ३-४ घटना घडलेल्या आहेत.त्यातच ज्या विमानातून सराव केला जातो ते विमान जुने असल्याचे बोलले जात आहे.
लोकांच्यानुसार विमान लँडीग करतांना अपघात-पोलिस निरिक्षक हेमने
दवनीवाडा पोलीस ठाणेंतंर्गत येणाèया देवरीनजीकच्या वैनगंगा नदीपात्रात आज झालेल्या विमान अपघातप्रकरणी माहिती देतांना पोलीस निरिक्षक वासुदेव हेमने यांनी सांगितले की,पायलट नदीपात्रात विमानाचे लँडीग करण्यासाठी प्रयत्न करीत असताना हा अपघात झाला.लोकांनी दिलेल्या माहितीनुसार विमानात काहीतरी बिघाड झाले असावे त्यामुळेच ते विमान खाली उतरवित होते तेव्हाच रोपवेच्या ताराला विमानाचे पंखे लागले आणि विमानाचे तुकडे तुकडे झाले.याप्रकरणाचा तपास सुरु असून आज गोंदिया विमानतळाच्या वरिष्ठांनी पाहणी केली असून उद्याला विमान प्राधिकरणाचे वरिष्ठ पाहणीसाठी घटनास्थळी येणार असल्याचे सांगितले.
प्रशिणार्थी विमानाला अपघात-प्रबंधक राजा रेड्डी
गोंदियाच्या बिरसी विमानतळाचे प्रबंधक राजा रेड्डी यांनी प्रशिक्षणार्थी विमानाला अपघात झाल्याचे मान्य करीत नॅशनॅल फ्लार्इंग ट्रेqनग इस्टिट्युटचे(एनएफटी) प्रशिक्षणार्थी असल्याची माहिती दिली.सोबतच हा अपघात घटनास्थळापासून काही अंतरावरुन बालाघाट जिल्ह्यात जात असलेल्या हायटेंशन तारेला विमानाचा पंखा टकरावल्याने इंजिन बंद पडले असावे असा अंदाज व्यक्त करीत याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासंदर्भातच एनएफटीच्या वरिष्ठांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून उत्तर देण्यास टाळाटाळ कऱण्यात आली.

आता धान पिकाचे होणार लसीकरण!



सुरेश भदाडे


गोंदिया, दि.२५- शीर्षक वाचून दचकू नका! ज्याप्रमाणे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांना वेगवेगळ्या रोगांविरुद्ध लढता यावे, म्हणून लसीकरण केले जाते. अगदी त्याच प्रमाणे पिकांना लसीकरण करणे आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. येत्या खरीप हंगामात धान पिकाला लसीकरण करण्याचे उदिष्ट्ये ठेवण्यात आले आहे.
आरोग्य शास्त्राप्रमाणे, मानवाला होणाèया दुर्धर आजाराविरुद्ध आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर अगदी बाल्यावस्थेपासून लसीकरण केले जाते, याविषयी सर्वांनाच माहिती आहे. अगदी शून्य वयोगटापासून ते अठरा वर्षाच्या बालकांना वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यानुसार आरोग्य विभागामार्फत वा खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून लसीकरण केले जाते. यामुळे मनुष्याचे सरासरी जीवनमान उंचावले आहे. याशिवाय लसीकरणाच्या माध्यमातून अनेक आजारांना हद्दपार करणे सुद्धा शक्य झाले आहे.
वनस्पतींच्या बाबतीतही हे शक्य आहे. यावर आजच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून निरनिराळे प्रयोग केल्यानंतर शास्त्रज्ञांना यात यश आले आहे. पिकांच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास आज शेतकरी पिकांवर पडणाèया रोगांमुळे हैराण आहेत. हजारो रुपयांचे रासायनिक खत असो वा महागडे कीटकनाशके यांचा वापर करूनही रोगांमुळे शेतकèयांच्या हाती पाहिजे तसे पीक येत नाही. त्यातून त्यांना प्रचंड आर्थिक तोटा सहन करावा लागतो. यामुळे शेतकèयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.या सर्व बाबींवर अगदी वेळेवर उपाययोजना केली तर शेतकèयांना आर्थिक नुकसानीतून बाहेर काढणे शक्य आहे, तेही अगदी अल्प खर्चात.
पारंपरिक शेती पद्धतीमध्ये खताचा डोस देताना अनेक त्रुट्या राहतात. त्याचप्रमाणे रोग पडल्यास लागणारा खर्च हा अधिक असतो. त्याचे प्रमुख कारण म्हणजे हे पीक प्रौढ होत जाऊन त्याच्या क्षेत्रफळातसुद्धा वाढ झालेली असते. त्यामुळे औषधांचा खर्च आणि प्रत्यक्ष देखभालीचा त्राससुद्धा वाढलेला असतो. त्यामुळे हे पीक बाल्यावस्थेत असताना त्याला पुढे कोणत्याही रोगाची लागण होऊ नये, यासाठी पिकांच्या लसीकरणाचा विचार पुढे आला आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामासाठी लागवडी खालील क्षेत्र निर्धारित करण्यात आले आहे. त्यानुसार, खरीप हंगाम २०१७ साठी १ लाख ८८ हजार ८७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामासाठी १ लाख ८८ हजार ४०१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित होते. त्यासाठी ४१ हजार ९५४ qक्वटल बियाण्यांची मागणी होती. खरीप हंगाम २०१७ साठी कृषी विभागाप्रमाणे भातपीक लागवडीसाठी १ लाख ८८ हजार ८७० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे.                        
 धानपिकाला ही लसीकरण होणार     
                   
बालकांच्या लसीकरणाप्रमाणे आता धानाच्या रोपट्यांनाही लसीकरण करून भविष्यातील होणाèया रोगांपासून बचावासाठी लसीकरण मोहीम येत्या मे च्या पहिल्या दिवसापासून सुरू करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सुमारे ९० हजार शेतकèयांपर्यंत पोचविण्याचे उदिष्ट्ये ठेवण्यात आले आहे. ही जबाबदारी महाराष्ट्रातील गोंदिया येथील कृषी क्षेत्रात काम करणारी संस्था यासाठी कृषी विषयात पदवी पदव्युत्तर झालेल्या मुलांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. यासाठी गोंदियाच्या रुची ग्रुपने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचा फायदा जिल्ह्यातील २ लाख ४८ शेतकèयांना मिळणार आहे.                        

कोटींची उलाढाल करणारे डोंगरदऱ्यातील आदिवासी गाव ‘धमदीटोला‘



सुजित टेटे

देवरी,दि.२५- गोंदिया जिल्ह्यातील देवरीवरून जसजसे आपण दक्षिणेकडे सरकत जातो, तसतसे निसर्गाच्या कुशीत दडलेले अनेक गुपिते हळूहळू आपल्याला उलगडू लागतात. हिरव्याकंच वनराईचे दर्शन झाल्याने मन प्रफुल्लित होते. घनदाट जंगलात आणि डोंगरदèयात दडलेले  छोटे-छोटे गाव बघून तेथे वास्तव्यास असणारे आदिवासी जीवन मनास अलगद भुरळ पाडून जाते. या आदिवासींच्या जीवनाविषयी जाणून घेण्याची अभिलाषा मनात सहज जागृत होते. उन्हाची दाहकता शहरी जीवनात चटके देत असताना निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या या लहानलहान खेड्यातील प्रवास हा मनाला गारवा देऊन जातो.
देवरीपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर ककोडी हे गाव आहे. या भागातील ती एक छोटी व्यापारपेठ म्हणता येईल. ककोडीवरून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर साडे तीनशे लोकवस्तीचे एक गाव आहे धमदीटोला. आदिवासींची वस्ती अशी धमदीटोलाची ओळख. सार्वजनिक प्रवासाची साधने तशी नगण्यच. नक्षलप्रभावीत भाग म्हणून एसटीची सोय नाही. विद्याथ्र्याची ने-आण करणारी मानवविकासाच्या बसचे दर्शन क्वचितच होते. अगदी महाराष्ट्राच्या सीमेवर, निसर्गाच्या सानिध्यात, अतिशय डोंगराळ आणि दाट जंगलात धमदीटोला हे गाव वसले आहे. गावातील प्रत्येकजण हा गुण्यागोqवदाने नांदणारा आहे. नक्षलग्रस्त गाव असल्याने नवख्या व अपरिचित लोकांशी भेटताना qकचित संकुचितपणा लोकांच्या वागण्यातून जाणवतो. पण, ओळख पटल्यावर हेच आदिवासी बांधव पाहुण्यांची आवभगत करण्यास पुढे येतात.
घनदाट जंगलात असल्याने गावकरी इंधनासाठी जंगलावर अवलंबून असतील,असे कोणालाही सहज वाटू शकते. पण लोकांशी वार्तालाप केल्यावर लक्षात आले की, येथील गावकरी हे निसर्गप्रेमी असून जंगलाच्या संरक्षणाविषयी नेहमी सजग असतात. गावात शंभरटक्के कुèहाडबंदी आहे. घराघरांत एलपीजी इंधन म्हणून वापरला जातो. त्यामुळे जळाऊ लाकडाचा धूर येथे आपणाला बघायला मिळणार नाही. प्रत्येक घरातील गृहिणीची गॅसवरच स्वयंपाक करते.
गावालगत भले मोठे जंगल आहे. साहजिकच या भागात तेंदूपत्ता संकलनाचे कार्य मोठ्या प्रमाणावर होते. या माध्यमातून गावकèयांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. येथे सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती वनविभागाच्या माध्यमातून तयार करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून तेंदूपाने संकलित करणे व औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीचे उत्पादन आणि विक्री यावर भर दिला गेला आहे. यातून बèयाप्रमाणावर रोजगार निर्मिती होते. सन २०१६-१७ या वर्षात या गावातील लोकांनी तब्बल अडीच हजार प्रमाणगोणी तेंदूपानांचे संकलन केले. यातून सुमारे सव्वा कोटीची उलाढाल एकट्या धमदीटोल्याने केली, हे विशेष. यावर्षी म्हणजे २०१७-१८ मध्ये  चार हजार प्रमाणगोणी संकलनाचे उद्दिष्ट्य असल्याची माहिती ग्रुप ऑफ ग्रामसभा फेडरेशनचे अध्यक्ष गोपाल कुमेटी यांनी बेरारटाईम्सशी बोलताना दिली. यातून साडेतीन कोटींचे उत्पन्न अपेक्षित असल्याचेही श्री. कुमेटी यांनी सांगितले. यासाठी वनविभागाकडून ३० टक्के रक्कम वनहक्क संरक्षण समितीला आगावू प्राप्त झाले आहेत.


Wednesday 26 April 2017

नवेझरीच्या पांडव भातगिरणीला सहकार क्षेत्रात मानाचे स्थान

         
      व्यापारी तत्त्वाचा अवलंब करणारी विदर्भातील पहिली भातगिरणी

खेमेंद्र कटरे

गोंदिया,दि.२५- सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेक प्रकल्प-उद्योग उदयास आले खरे. पण विदर्भात या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या उद्योगांनी पाहिजे तसा ठसा व्यापार जगतात उमटवल्याची उदाहरणे ही अत्यल्पच. असे असताना पूर्व विदर्भाच्या मागास गणल्या जाणाèया गोंदिया जिल्ह्यातील एका लहानशा गावात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भातगिरणीने ही किमया मात्र आपल्या उद्योग साधनेच्या बळावर साध्य करून दाखविली. तांदूळ उद्योगातील पॅकेqजग ही व्यापाèयांची मक्तेदारी मोडीत काढत व्यापारपेठेत स्वतःचे ब्रँड या भातगिरणीने निर्माण केले. एकीकडे अवसायनात जात असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सहकारी भातगिरण्याची संख्या वाढत असताना १० मे १९६२ ला स्थापन केलेल्या या सहकारी संस्थेची आपली घोडदौड मात्र जोमात आहे. सहकार क्षेत्रातील मानाचा पुरस्कार देऊन नुकतेच या सहकारी भात गिरणीला गौरविण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात येणाèया नवेझरी या गावी १० मे १९६२ ला अवघ्या २० लोकांनी एकत्र येऊन दि पांडव सहकारी विपणन आणि भात गिरणी मर्यादित नवेझरी नावाची सहकारी संस्था स्थापन केली. या २० लोकांनी २० हजार ८०० एवढे भागभांडवल अवघ्या पंधरा दिवसात गोळा केले. शासनाकडून २० हजार ८०० एवढे समप्रमाण भागभांडवल मिळाले. या निधीतून संस्थेची इमारत तयार करण्यात आली.
त्या काळात नवेझरी परिसरातील शेतकèयांना आपले धान भरडाई करण्यासाठी १२-१५ किलोमीटर अंतरावरील खोपडा qकवा मुंढरी येथे जावे लागत असे. परिसरात भातगिरण्या नसल्याने शेतकèयांना फार अडचणींचा सामना करावा लागत असे. यावर तोडगा काढण्याचा निर्णय नवेझरीच्या सहकारी संस्थेच्या पदाधिकाèयांनी घेतला. त्यातून सहकारी भात गिरणी सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. सन १९६९मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून ६० हजाराचे कर्ज मिळाले. यातून भातगिरणीला लागणाèया मशिनरी विकत घेतल्या. राइसमील उभी राहिली खरी. पण विजेचे साहित्य व जोडणी घेण्यासाठी संस्थेकडे भांडवल नव्हते. या अडचणीच्या वेळी  तत्कालीन अध्यक्ष बाळकृष्ण भांडारकर आणि महादेवराव हरडे यांनी संस्थेला मदतीचा हात पुढे केला. तीस हजाराची उसनवार करून अखेर २३ मार्च १९६९ ला या भातगिरणीची चाके अखेर फिरायला सुरवात झाली, ती अद्यापही अविरत फिरतच आहेत.
प्रारंभीच्या काळात २२ गावापुरते मर्यादित असलेले संस्थेचे कार्यक्षेत्र आजमितीला ५३ गावांपर्यंत विस्तारले आहे. सध्या सदस्य संख्या ३०५ एवढी आहे. शेतकèयांचे धान भरडाईच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या भातगिरणीचे संचालक मंडळ हे दूरदृष्टी बाळगणारे असल्याने त्यांनी सुरवातीपासूनच लेव्हीचे धान खरेदीला सुरवात केली. खरेदी केलेल्या धानाची संस्थेच्या भातगिरणीत भरडाई होत असल्याने नफ्यात वाढ होत गेली. पुढे १९७२ च्या सुमारास या संस्थेने ऑईलमील तर १९९० मध्ये पोहामिल, मिरची-हळद मशिन लावून आपल्या कार्याचा विस्तार केला.
महाराष्ट्र सहकारी बँकेकडून मिळालेले कर्ज आणि शासनाने दिलेले भागभांडवल या संस्थेने १९७५ पर्यंत पूर्ण परत केले. आपल्या यशाचे घोडे पुढे दामटत या संस्थेने आपले पाय व्यापारात रोवण्यास १९९४-९५ सुरवात केली. शेतकèयांना सोयीच्या दरात रासायनिक खते आणि कीटकनाशके उपलब्ध करून देण्यासाठी कृषीसेवा केंद्रास सुरवात केली. आज या संस्थेच्या मालकीचे ८ व्यापारी गाळेसुद्धा आहेत. यापैकी एका गाळ्यात बॅक भाडेतत्त्वावर सुरू आहे. गेल्या २०१०च्या सुमारास भातगिरणीचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. या माध्यमातून स्वतःच्या भातगिरणीत तयार होणारे तांदळाला पांडव या नावाने ब्रँडिग करणे सुरू केले आहे. या तांदळाचे पॅकेजिंग करून विदर्भातील ठिकठिकाणच्या व्यापारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जात आहे.
दि पांडव सहकारी विपणन आणि भातगिरणीच्या या यशस्वी घौडदौडीची दखल राज्याच्या सहकार विभागानेसुद्धा घेतली. गोंदियाचे  जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांचे संस्थेला व्यापारासाठी मार्गदर्शन लाभत आहे. या संस्थेच्या पांडव ब्रँड तांदळाचे पॅqकग पश्चिम महाराष्ट्राच्या व्यापारपेठेत पोचविण्यासाठी संदीप जाधव प्रयत्नशील आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नवेझरी सारख्या छोट्या खेड्यात निर्मित पांडव ब्रँड तांदूळ आता मुंबई-पुणेकरांच्या चवीचा लवकरच भाग बनेल, यात शंका नाही. 

जुनी पेन्शन हक्क संघटनेची सभा


गोंदिया दि. 26 :: जुनी पेन्शन हक्क संघटनेची सभा शिक्षक सहकारी पतसंस्था, गणेशनगर गोंदियाच्या सभाग्रहात नुकतीच पार पडली. सर्वप्रथम मागील कार्यकारिणीला निरोप देण्यात आला. यानंतर १९८२ ची जुनी पेन्शन योजना अंमलात आणण्यात यावी. जीपीएफ योजना, अनुकंपा भरती सुरू करण्यात यावी. या रास्त मागण्या आणि संघटनेच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. दरम्यान संघटनेची पुढील रूपरेषा ठरविण्यात आली. या सभेला आशिष रामटेके, सचिन राठोड, लिकेशसिंह हिरापुरे, राकेश डोंगरे, चंदू दुर्गे, जयेश लिल्हारे, सुभाष सोनवाने, अनमोल उके, दत्तात्रय बागडे, चिंतामन वलथरे, अजित रामटेके, सचिन धोपेकर, जितेंद्र गणवीर, हितेंद्र डोंगरे, संजय उके, अजय शहारे, शालिक कठाणे आदी उपस्थित होते.

अतिदुर्गम भागातील अप्रगत विद्यार्थी प्रगत झाला पाहिजे- प्रशांत डवरे

देवरी,दि.26(प्रतिनिधी)- देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात बालकांना शिक्षण देणाऱ्या शाळा या  प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या आहेत. काही गावांचा आजही मुख्य रस्त्यांशी संपर्क होऊ शकला नाही. अशा ही परिस्थितीत या तालुक्यात ज्ञानाचे झरे वाहते ठेवण्याचे काम शिक्षक अविरत करीत आहेत. या अतिदुर्गम भागातील विद्यार्थी हे अधिकाधिक प्रगत कसे होतील, याकडे शिक्षणक्षेत्रातील प्रत्येकाने जातीने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गोंदिया येथील डायटचे प्राचार्य प्रशांत डवरे यांनी काल मंगळवारी आपल्या भेटीदरम्यान केले.

ते पुढे म्हणाले की  अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त भाग अशी देवरी तालुक्याची ओळख आहे. निसार्गाच्या सानिध्यात येथील जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे जणू ज्ञानाचे  वाहते झरेच. या भागात शिक्षण घेणारा विध्यार्थी कसा असेल, त्याला मिळणारे वातावरण कसे असेल, या विषयी मनात उत्सुकता होती. तालुका मुख्यालयापासून शाळेपर्यंत पोहचने म्हनजे तारेवरची कसरतचं. श्री डवरे यांनी भर उन्हात पंचायत समिति देवरीतील शाळानां नुकतीच भेट दिली. यावेळी देवरीच्या समूहसाधन गटातील विषयतज्ज्ञ लोथे, पालांदूर केंद्राचे केंद्रप्रमुख एन.एस.लंजे उपस्थित होते.
या भेटीत डवरे यांनी भेट दिलेल्या शाळांमधील प्रत्येक वर्गात डेमोलेसनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे मार्गदर्न केले.
 शिक्षक व विद्यार्थी यांच्यात मित्रत्वाचे नाते असण्यावर त्यांनी यावेळी भर दिला. कृतियुक्त मार्गदर्शन, विचारांचे आदानप्रदान, कविता कौशल्य विकास, अध्यापन यावर भर दिला तर विद्यार्थी सहज प्रगत होऊ शकतो, असे मतही त्यांनी या भेटीदरम्यान नोंदवले.
श्री डवरे यांनी तालुक्यातील चुंभली या दुर्गम व रस्ते नसलेल्या गावाला सुद्धा भेट दिल्याने देवरी पंचायत समितीच्या समूहसाधन गटातील कर्मचाऱ्यांनी श्री डवरे यांचे अभिनंदन केले.


BERARTIMES_APR_26- MAY_01_2017





Tuesday 25 April 2017

ग्रामविकासात ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वपूर्ण-अमृता फडणवीस

नागपूर,दि.25 -हाताला काम मिळणे ही प्रत्येक व्यक्तीची गरज असून, प्रत्येक व्यक्तीला काम मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ग्रामविकासामध्ये ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी कवडस येथे शेतीसमवेत वस्त्रोद्योगासारख्या इतर जोडधंद्यांना प्रोत्साहन देण्यात येईल तसेच ग्रामवासीयांना गरजेनुसार पशुधनाचे वाटपही करण्यात येईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या कवडस गावाला सोमवारी (दि.२४) त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी जनसुविधेंतर्गत ग्रामपंचायत भवनाला भेट देत कवडस येथील ग्रामस्थांना शिधापत्रिका तसेच सातबाराचे वाटप केले. त्यानंतर अधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला.
‘हॅबीटाट’ या स्वयंसेवी संस्थेच्या वंदना क्रिपलानी, स्मिता विल्सन, उपजिल्हाधिकारी आशा पठाण, हिंगणा तहसीलदार प्रीती डुडुलकर, सरपंच मनीषा गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. गावातील लोकांना शुद्ध पाण्याचे पाणी मिळावे, यासाठी विहिरीच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य करण्यात येईल. यासाठी ‘आरओ वॉटर प्रोजेक्ट’ लवकरच सुरू करण्यात येईल. गावातील घरकूल बांधकामासाठी ‘हॅबीटाट’ स्वयंसेवी संस्था सहकार्य करणार आहे.
जलयुक्त शिवार योजनेच्या धर्तीवर गावकऱ्यांना सर्व ऋतूंमध्ये पाणी उपलब्ध राहावे, यासाठी सिंचनाच्या विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतील. ग्रामपंचायत भवन येथे महसूल कॅम्पला सुरुवात झाली आहे. याअंतर्गत ग्रामस्थांना अल्पावधीत मोफत सातबारा तसेच शिधापत्रिका मिळतील. ही एक नवीन पर्वाची नांदी असल्याचे मतही अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात लंका गोंडगे, सिंधू मोजनकार, सुनीता मडावी यांना फडणवीस यांच्या हस्ते शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले. तसेच सुरेश गोंडगे, गणेश गोंडगे, शेषराव मोजनकार, संदीप मोजनकार, श्यामराव बोळके, सचिन तोतडे, कृष्णाजी कांबळे यांना सातबाराचे वाटप करण्यात आले.मुख्यमंत्री व अमृता फडणवीस यांच्या दत्तकग्राम फेटरी येथे जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत बांधलेल्या अंगणवाडी इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा वार्षिक अनुदानातून बांधलेल्या अंगणवाडीचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. यावेळी गटशिक्षण अधिकारी किरण कोवे, सभापती नम्रता राऊत, पर्यवेक्षिका रजनी निखोटे व गावकरी उपस्थित होते.

शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा डोळा निकामी

भंडारा,दि.25: कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या पाच वर्षीय बालकाला शिक्षिकेने पेन फेकून मारली. ही पेन उजव्या डोळ्याला लागल्याने तो निकामी झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील जांब येथील सेंट जॉन कॉन्व्हेंटमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा न नोंदविता आरोपीला अभय दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
ओम बादल श्रीपात्रे असे जखमी बालकाचे नाव आहे. ही घटना ७ एप्रिलला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडल्याची जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात पालकांनी म्हटले आहे. बादल श्रीपात्रे यांचा ओम हा पाच वर्षीय मुलगा नित्याप्रमाणे ७ एप्रिलला शाळेत गेला होता. शाळा सुटल्यानंतर ओमची आई रजनी ही त्याला घ्यायला शाळेत गेली होती. यावेळी त्याच्या उजव्या डोळ्याला जखमी दिसून आल्याने तिने शिक्षिका शीतल जावळकर यांना विचारणा केली. यावर तिने उडवाउडवीचे उत्तर दिल्याचा आरोप रजनी श्रीपात्रे यांनी केला आहे.
डोळ्याची दुखापत असल्याने पालकांनी ओमला तातडीने शीतल जावळकर व तिच्या पतीसह भंडाऱ्याला आणले. येथील डॉक्टरांनी त्याला नागपुरला उपचारासाठी नेल्याचा सल्ला दिला. यावेळी शीतल जावळकरचे पती हे स्वत: विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत नागपुरला गेले. तिथे महात्म्ये रुग्णालयात ओमच्या डोळ्याची तपासणी केली असता तेथील डॉक्टरांनी डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया करावी लागेल व याकरिता एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले. यानंतर शिक्षिका जावळकर यांचे पती यांनी नागपूर येथे ओम व त्याच्या पालकांना सोडून गाव गाठले व त्यानंतर त्यांनी याप्रकरणात कुठलीही मदत करण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी ओमच्या पालकांनी आंधळगाव पोलिसात शिक्षिका शीतल जावळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय दिल्याचा आरोप ओमचे आईवडील बादल व रजनी श्रीपात्रे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

भरनोली बोरटोला परिसरात नक्षल्यांचे बॅनर

गोंदिया,दि.24नक्षलवादी संघटना पीएलएफआयने आज झारखंड बंदची हाक दिली आहे.त्यानुसार संपूर्ण राज्यात सुरक्षा वाढवण्यात आली असतानाच गोंदिया जिल्ह्यातील केशोरी पोलीस ठाणेतंर्गत येणार्या बोरतोला परिसातही नक्षल्यांनी पोस्टर्स बॅनर्स लावून भितीचे वातावरण निर्माण करीत शासनाच्या षडयंत्राला बळी पडू नका असे आवाहन  केले आहे.पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरची दलमच्या नक्षल्यांनी आज 24 एप्रिल रोजी भरनोली ते बोरटोला दरम्यानच्या सडक मार्गावर पोस्टर्स लावूून लाल रंगाने लाल सलाम लिहून प्रतिबंधित माओवादी संघटनेने बांबू व तेंदुपत्ता कंत्राटदारांना जंगलातील बांबू व तेंदूपत्ता संकलन व तोडण्यावर बंदीचा धमकीवजा इशारा दिला आहे.त्या बॅनरमध्ये पोलीस विभागाच्यावतीने चालविण्यात येत असलेल्या जनजागरण अभियानाचाही विरोध करण्यात आला आहे.सोबतच गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थींनीवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढण्याचे आवाहन करीत गडचिरोली विकास समिती व आदिवासी युवक समिती ही लोकांना भ्रमित करुन माओवादी संघटनेला बदनाम करीत असल्याचे पोस्टर्समध्ये उल्लेख केला आहे.दरम्यान केशोरी पोलीस ठाण्यात कोरची दलम कमाडर जगदिश व त्यांच्या साथीदाराविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरु करण्यात आली आहे.

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...