Tuesday 18 April 2017

देवरीतील अतिसंबेदनशिल गावे अवघड क्षेत्रात समाविष्ठ करा- आ.पुराम

देवरी,18 (प्रतिनिधी)- तालुक्यातील अतिसंवेदनशील भागातील 84 गावे ही अवघड यादीत नव्याने समाविष्ट करण्याविषयीची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या एका शिष्टमंडळाने आमदार संजय पुराम यांना निवेदनामार्फत केली आहे. या गावांना यादीस स्थान मिळण्यासाठी आ.पुराम यांनी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन या शिष्टमंडळाच्या  पदाधिकाऱ्यांना दिले.
  शिक्षक समिती गोंदियाचे जिल्हासहसचिव संदिप तिडके यांच्या नेतृत्वात समितीचे शिष्टमंडळ आमदार मा. संजय पूराम यांना भेटले. यावेळी अवघड व सर्वसाधारण यादी नव्याने तयार करून देवरी व जिल्ह्यातील अतिसंवेदनशिल, दुर्गम, परिवहन सुविधा नसलेली गावे ककोडी, पालांदूर, मिसपिर्री, आलेवाडा, चिचगड यासह उर्वरीत केंद्रातील अतिसंवेदनशिल गावे अवघड यादीत समाविष्ट करण्यासाठी मागणी करण्यात आली. निवेदनाची दखल घेत शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासासाठी व एकस्तर वेतनश्रेणीत समोर कुठलीही अडचन येवू नये, यासाठी आमदार साहेबांनी मा. मूकाअ यांना फोन करून देवरी मधील भौगोलिक परिस्थिति समजावून सांगितली.  सोबतच 70% गावे अवघड क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी केली.
  यावेळी शिष्टमंडळात समितीचे सरचिटणीस विनोद बहेकार, उत्तम टेंभरे, पी. टी. ठाकरे, सोढी सर, वसंता नाईक सर उपस्थित होते..

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...