Thursday 6 April 2017

वैद्यकीय अहवालानंतर अखेर त्या शिक्षकावर गुन्हा दाखल

बोंडगावदेवी- जिल्हा परिषद शाळेमध्ये कामकाजाच्या वेळेत मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या प्रभारी मुख्याध्यापकावर अर्जूनी मोरगाव पोलिसांनी अखेर गुन्हा नोंदविला, 
रमेश फुलबांधे (53) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 13 फेब्रुव ारी रोजी साडेचारच्या सुमारास पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर यांनी इसापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली यावेळी फुलबांधे दारूच्या नशेत आढळून आले. सभापतींनी त्याविषयी विचारताच तुम्ही मला बोलणारे कोण असे उर्मटपणे बोलून फुलबांधे यांनी सभापतींशी गैरवर्तन केले. याची तक्रार पोलिसांत करण्यात आली होती. फुलबांधे यांचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याने अखेर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...