Friday 7 April 2017

गोंदियात वृतांकन करणाऱ्या पत्रकारांसह पोलिस आणि पालिका कर्मचाऱ्यांना अतिक्रमणधारकाची मारहाण

पत्रकार,पालिका कर्मचाऱ्यांसह पोलिसांना जबर मारहाण
महिला पोलिसांच्या विनयभंगाचा प्रयत्न: अतिक्रमणधारकाचा प्रताप
गोंंदिया,(07)- गोंदििया नगरपरिषदेने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव मोहीमेेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारासह अतिक्रमण हटविणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांवर अतिक्रमणधारकाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना आज दुपारी तीनच्या सुमारास घडली. दरम्यान, राज्याच्या विधानसभा सभागृहात पत्रकार सुरक्षा कायद्यासंबंधी विधेयक मांडले जात असताना ही घटना घडल्याने राज्यात पत्रकार असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे.
सविस्तर असेकी, शहरातील मुख्य बाजारपेठेत दुकानदारांनी रस्त्यावर ८ ते १० फुट केलेले अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांनी नगर परिषद पंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम १८९ अन्वये आज अतिक्रमण काढण्याची मोहिम आज राबविली. दरम्यान, दुपारी १२ वाजता स्टेडियमपासून कार्यवाहीला सुरवात करण्यात आली. अतिक्रमण हटविणारे पथक चांदणी चौकात आले असता दुकानाबाहेरील अतिक्रमीत जागेत ठेवलेल्या वस्तू नगर परिषदेचे १३ कर्मचारी ट्रॅक्टरमध्ये भरत असताना चांदणी चौकातील ५ ते १० दुकानातील १५ ते २० लोकांनी एकत्र येवून या कर्मचाऱ्यांना मारहाण करायला सुरवात केली. या कार्यवाहीची व्हिडीओ तयार करणाऱ्या पोलिस कर्मचारी नागेश दासरवार यांचा कॅमेरा तोडून नाशधूस केली. वाहतूक पोलिस विभागाच्या एम.बी.प्रधान या महिला कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. या सर्व कार्यवाहीचे छायाचित्र घेत असलेले दैनिक भास्करचे प्रतिनिधी ट्रॅक्टरवर चढून फोटो घेत असताना त्यांना ओढले व जबर मारहाण केली.
प्रकरणाची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांनाही धमकविण्यात व्यापाऱ्यांनी मागे पुढे बघितले नाही. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार दिनेश शुक्ला घटनास्थळी पोहाचले. तसेच चांदणी चौकात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या प्रकरणी पत्रकार नवीन अग्रवाल व पोलीस कर्मचारी तसेच नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी या प्रकरणात संशयीत आरोपी भरत गोलानी, गिरीश गोलानी, आकाश गोलानी, गुड्डू ककवानी, नरेश गोलानी, निरज मानकानी, इंद्रकुमार गोलानी आदींना ताब्यात घेतले. पत्रकार नविन अग्रवाल यांना झालेल्या मारहाणीत डोळा, डावा हाताला मार लागला आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोलिसांनी केली. याच बरोबर अतिक्रमण करणारा प्रकाश ट्रेडर्सचे मालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वृत्तवाहिनीचे पत्रकार दिलीप लिल्हारे आणि शासकीय कर्मचारी व्हिडीओग्राफी करत होता, त्यांचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिस कर्मचारी श्रीमती प्रधान यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले. त्याच बरोबर वाहतूक पोलिस कर्मचारी आणि पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. दरम्यान, सदर प्रकरण पुढे वाढू नये यासाठी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण होऊन देखील प्रकरण दडपण्याकरिता पालिकेचे खुद्द अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी दबाव आणताना दिसून आले.

प्रकरण मिटवा : नगराध्यक्ष
पालिका कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि पत्रकारांना अतिक्रमण करणाऱ्या प्रकाश ट्रेडर्सच्या गुंडांनी मारहाण केली. या प्रकरणी शहरातील सर्व पत्रकार संघटना तक्रार दाखल करण्याकरिता पोलिस ठाण्यात पोहोचल्या. मात्र, त्याठिकाणी नगर पालिकेचे नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी येऊन अतिक्रमणधारकाची बाजू घेत उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पत्रकारांना हे प्रकरण इथेच मिटवा, शहर विकासात असे अडथडे येत असल्याचे म्हणाले. त्यामुळे नगराध्यक्ष पालिकेच्या मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन देत असल्याची चर्चा सुरू झाली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...