Monday 24 April 2017

देवरीच्या वीज वितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा

देवरी,दि.24 (प्रतिनिधी) -येथील महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या कार्यालयावर आज सोमवारी सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा परिसरातील शेतकऱ्यांनी मोर्च्याचे आयोजन केले होते. मोर्चेकरी शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
जोपर्यंत विजेच्या दाबाची समस्या निकाली काढण्यात येत नाही,तोपर्यंत येथून हलणारच नाही अशी भूमिका शेतकर्यांनी घेतल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे आंदोलनकारी शेतकरी हे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या मतदारसंघातीलच नव्हे तर तालुक्यातील होते.आंदोलनकारी शेतकऱ्यांनी तत्काळ उच्चदाबाचा विज पुरवठा सुरळीत सुरु करणे,झालेल्या पिकाची नुकसान भरपाई देणे,शेंडा येथील उपकेंद्राचे काम त्वरीत सुरु करणे,विज बिल मिटरची रिंडीग घेऊनच देण्यात यावे,शेतकर्यांचे वीज बील माफ करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता.यावेळी आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य सरिता कापगते,विलास कापगते,ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हा सचिव व माजी जि.प.सदस्य राजेश चांदेवार,लल्लन मिश्रा,पवन टेकाम,प्यारेलाल जांभुळकर यांच्यासह शेंडा,कोयलारी,उशीखेडा,कन्हारपायली,पुतळीसह आदी गावातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले
 होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...