गोंदिया(ता.7) : शहरातील मुख्य रस्त्यावर शहरातील व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक व रहदारीला होणारा त्रास लक्षात घेऊन नगर परिषद व वाहतूक पोलिसांनी आज (ता.७) अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाहीला सुरवात करताच या पथकाला चांदणी चौकात कार्यवाही करताना तेथील १५ ते २० व्यापाऱ्यांनी गुंडागर्दी करीत पोलिसांनाच नाही तर अतिक्रमणाचे वृत्तसंकलन व छायाचित्र काढण्यासाठी आलेल्या दैनिक भास्करचे प्रतिनिधी नवीन अग्रवाल यांना ट्रॅक्टरवरून ओढून मारहाण केली. यात मारहाणीत नवीन अग्रवाल यांच्या गळ्याला व मानगटीला दुखापत झाली आहे. तसेच वृत्तवाहिनीचे दिलीप लिल्हारे यांचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न झाला. महिला पोलिसांच्या विनयभंगाचा प्रयत्न तसेच वाहतूक पोलिस शाखेचे पोलिस कर्मचारी आणि नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. सदर प्रकरणानंतर शहरातील श्रमिक पत्रकार संघ, गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघ, प्रेस ट्रस्ट आॅफ गोंदिया, मराठी इलेक्टॉनिक पत्रकार संघ यांच्यासह सर्व पत्रकारांनी पोलिस निरीक्षक दिनेश शुक्ला यांना निवेदन देवून या प्रकरणातील आरोपींवर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.Friday, 7 April 2017
आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे : पत्रकार संघटना
गोंदिया(ता.7) : शहरातील मुख्य रस्त्यावर शहरातील व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक व रहदारीला होणारा त्रास लक्षात घेऊन नगर परिषद व वाहतूक पोलिसांनी आज (ता.७) अतिक्रमण काढण्याच्या कार्यवाहीला सुरवात करताच या पथकाला चांदणी चौकात कार्यवाही करताना तेथील १५ ते २० व्यापाऱ्यांनी गुंडागर्दी करीत पोलिसांनाच नाही तर अतिक्रमणाचे वृत्तसंकलन व छायाचित्र काढण्यासाठी आलेल्या दैनिक भास्करचे प्रतिनिधी नवीन अग्रवाल यांना ट्रॅक्टरवरून ओढून मारहाण केली. यात मारहाणीत नवीन अग्रवाल यांच्या गळ्याला व मानगटीला दुखापत झाली आहे. तसेच वृत्तवाहिनीचे दिलीप लिल्हारे यांचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न झाला. महिला पोलिसांच्या विनयभंगाचा प्रयत्न तसेच वाहतूक पोलिस शाखेचे पोलिस कर्मचारी आणि नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. सदर प्रकरणानंतर शहरातील श्रमिक पत्रकार संघ, गोंदिया जिल्हा श्रमिक पत्रकार संघ, प्रेस ट्रस्ट आॅफ गोंदिया, मराठी इलेक्टॉनिक पत्रकार संघ यांच्यासह सर्व पत्रकारांनी पोलिस निरीक्षक दिनेश शुक्ला यांना निवेदन देवून या प्रकरणातील आरोपींवर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
देवरी येथे सर्ववर्गीय कलार समाज संमेलन थाटात देवरी,दि.03- कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या शैक्षणिक, अर्थिक आणि राजकीय स्थित...
No comments:
Post a Comment