आशा खेमका या त्यांच्या विवाहानंतर ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाल्या. त्या वेळी इंग्रजी भाषेचे ज्ञान नसतानाही त्यांनी जिद्दीने ही भाषा आत्मसात करत आज त्या वेस्ट नॉटिंगहॅमशायर महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शिक्षणक्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
खेमका या मूळ बिहारमधील सीतामढी गावातील असून, वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी शाळा सोडून दिली होती. यानंतर वयाच्या पंचविशीमध्ये आपल्या पती आणि मुलांसह त्या ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्या. येथे आल्यावर टीव्हीवरील लहान मुलांचे कार्यक्रम पाहत त्या इंग्रजी शिकल्या. त्यांनी कॅराडिफ विद्यापीठातून पदवी संपादन केली आणि नंतर त्या प्राध्यापिका झाल्या. 2013 मध्ये त्यांना "डेम कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' हा ब्रिटनमधील अत्यंत प्रतिष्ठेचा नागरी सन्मान प्राप्त झाला. हा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या 1931 नंतरच्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला होत. 1931 मध्ये हा पुरस्कार धार संस्थानच्या महाराणी लक्ष्मीदेवीबाई साहिबा यांना मिळाला होता.
आशियाई लोकांची श्रीमंती वाढली
ब्रिटनमधील श्रीमंत आशियाई व्यक्तींची यादीही या वेळी जाहीर करण्यात आली. येथील एशियन मीडिया अँड मार्केटिंग ग्रुपतर्फे ही यादी प्रसिद्ध करण्यात येते. या यादीमध्ये बोपारन कुटुंबाची संपत्ती 90 कोटी पौंड, लॉर्ड स्वराज पॉल (80 कोटी पौंड), संजीव गुप्ता (25 कोटी पौंड) यांच्या नावांचा समावेश आहे.

No comments:
Post a Comment