Sunday 30 July 2017

युद्धासाठी तयार राहा - चिनी राष्ट्रपती


नवी दिल्ली, दि. 30 - पीपल्स लिबरेशन आर्मीला 90 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त साधून चीनने आज लष्करी सामर्थ्याचं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी युद्धासाठी तयार राहा, असा आदेशच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लष्कराला दिला. त्यामुळे आगामी काळात भारत-चीन दरम्यान युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्ट रोजी चीनचा आर्मी डे असतो. मात्र, आर्मी डेच्या दोन दिवस आधीच लष्करी सामर्थ्याची परेड करण्याची १९४९च्या कम्युनिस्ट आंदोलनानंतरची ही पहिलीच वेळ आहे.
भारत- चीनमध्ये सिक्कीमधल्या डोकलाम भूभागावरून महिन्याभरापासून तणाव निर्माण झालाय. ब्रिक्स देशांच्या परिषदेनिमित्त भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे चीन दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली होती. दोन्ही देशांमधील डोकलामचा वाद सोडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनाही यश आलं नाही. त्याउलट डोवाल भारतात परतल्यानंतर जिनपिंग यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका केली आहे. 
ते म्हणाले, सैन्याने नेहमीच युद्धास तयार असायला हवे. देशाचे सैन्य जगातलं सर्वात शक्तिशाली सैन्य म्हणून समोर येण्यासाठी सैनिकांनी स्वतःला तयार केले पाहिजे. चिनी सैन्य युद्धात शत्रूंचा पराभव करण्यासाठी सक्षम आहे. या कार्यक्रम सोहळ्याला जिनपिंग सैनिकांच्या पेहरावात आले होते. 

सामाजिक कार्यकर्ते जगदीशसिंह पवार यांचे निधन

देवरी,30- देवरी तालुक्यातील सुरतोली येथील सामाजिक कार्यकर्ते जगदीशसिंह सखारामसिंह पवार (67) यांचे आज रविवारी दुःखद निधन झाले.
स्व. जगदीशसिंह पवार यांच्यावर गेल्या काही दिवसापासून नागपूर येथे उपचार सुरू होते. त्यांचे आज सकाळी त्यांचे राहते घरी निधन झाले. ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. त्यांचे मागे दोन मुले, एक मुलगीस पत्नी, नातवंडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचेवर आज स्थानिक मोक्षधाम येते दुपारी अंत्यसंकार करण्यात येणार आहे.

Saturday 29 July 2017

बोगस काम करणाऱ्यांना बुलडोजरखाली घालणार - गडकरी

जालना, दि. 29 - ठेकेदारानं रस्तेबांधणीचं काम बोगस केले तर त्याला बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी इशारा दिला आहे. देशात आजवर सहा लाख कोटींची कामे केली, पण अजूनहीर लक्ष्मीचे दर्शन घेतले नाही, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना टोला लगावला. 
नितीन गडकरी यांच्या हस्ते आज जालन्यातील वाटूर येथे शेगाव-पंढरपूर, दिंडी आणि वाटूर फाटा ते परभणी या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं उद्घाटन झालं. यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.  कार्यक्रमाला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरदेखील उपस्थित होते.
' देशभरात आजवर मी इतकी काम केली असताना ठेकेदार कोण असतो? हे मला माहित नसतं. आजवर एकाही ठेकेदाराच्या पैशाचा मी मिंदा नाही', असं नितीन गडकरी बोलले आहेत. सोबतच शेगाव-पंढरपूर रस्त्याचं काम चांगलं झालं पाहिजे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. 'रस्त्याचं काम चांगलं होत नसेल, तर फक्त मला कळवा. या ठेकेदाराला मी बुलडोजरखाली घातल्याशिवाय राहणार नाही', असा इशाराच गडकरींनी यावेळी दिला आहे.


नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी कोरचीची बाजारपेठ शंभरटक्के बंद


गडचिरोली,दि.२८: नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या आजच्या पहिल्याच दिवशी कोरची येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद असल्याचे दिसून आले. दुर्गम भागातील वाहतूकही ठप्प होती.
दरवर्षी नक्षलवादी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. या कालावधीत ते ठार झालेल्या नक्षल्यांचे स्मारक उभारुन त्यांना श्रद्धांजली वाहतात. त्यासाठी नक्षली ठिकठिकाणी बॅनर लावून लोकांना शहीद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन करतात. सप्ताहादरम्यान नक्षलवादी हिंसक कृत्य करण्याची भीती असल्याने नागरिक धास्तावतात. याच भीतीने आज कोरची या तालुकास्थळावरील बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. धानोरा, भामरागड व एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागातील वाहतूकही ठप्प राहिल्याने कर्मचारी व नागरिकांची गैरसोय झाली. मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनूचित घटना घडली नाही. हा सप्ताह ३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

दलित-बहुजनांची सत्ता स्थापन करा-विलास गरुड


नागपूर,दि.29 : महाराष्ट्रात दलित-बहुजनांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी. तोच खºया अर्थाने मायावती यांच्या अपमानाचा बदला असेल, असे प्रतिपादन बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी येथे केले.बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांना राज्यसभेत सहारनपूर विषयावर भाजपच्या खासदार व मंत्र्यांनी बोलू दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या मायावती यांनी गेल्या १८ जुलै रोजी राज्यसभेचा राजीनामा दिला. मायावती यांच्या या अपमानाचा बदला आणि त्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या सन्मानार्थ बसपातर्फे राज्यभरात धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात शुक्रवारी नागपुरातून करण्यात आली.
संविधान चौक येथे भव्य धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना विलास गरुड बोलत होते. यावेळी नागपूर शहर व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रभारी अ‍ॅड. वीरसिंग, प्रदेश उपाध्यक्ष कृष्णा बेले, अ‍ॅड. संदीप ताजने यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, विश्वास राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविक जितेंद्र म्हैसकर यांनी केले. संचालन रुपेश बागेश्वर यांनी केले. आशिष सरोदे यांनी आभार मानले. यावेळी मंगेश ठाकरे, राजू बसवनाथे, दिलीप मोटघरे, हेमलता शंभरकर, प्रभात खिल्लारे, शहराध्यक्ष राजू चांदेकर, बाबुल डे, रमेश पिसे, नवनीत धडाडे, आनंद सोमकुंवर, संजय सेलोटकर, मोहम्मद जमाल, मोहम्मद इब्राहीम, शैलेंद्र यादव, जितेंद्र घोडेस्वार आदी उपस्थित होते.

राज्यातील सात पोलीस अधिकाºयांची बदल्या


सोलापूर दि २९ : भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधिक्षक व उप विभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या सात अधिकाºयांची बदल्या करण्यात आल्या आहेत़ बदल्याचे आदेश गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढले आहेत़ 
बदली झालेल्या पोलीस अधिकाºयाचे नाव, समोर बदलीने पदस्थापना झालेले ठिकाण, कंसात सध्याचे ठिकाण : अतुल विकास कुलकर्णी :  सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी भायंदर उपविभाग, ठाणे ग्रामीण (सोलापूर ग्रामीण)़ जी़ विजय कृष्णा यादव : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी ईतवारा उपविभाग नांदेड (अमरावती ग्रामीण)़  संदीप भगवानराव घुगे : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी, तुळजापूर उपविभाग उस्मानाबाद (रायगड)़ भाग्यश्री बाबुराव नवटके : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी माजलगांव उपविभाग बीड (कोल्हापूर)़ नुरल हसन : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी धर्माबाद उपविभाग नांदेड (बीड)़ प्रियंका मिना : सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी वाशिम शहर उपविभाग, वाशिम (पालघर)़ रागसुधा आर :  सहा़ पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड उपविभाग नाशिक ग्रामीण (सातारा

देवरीत सिकलसेल दिनावर मार्गदर्शन उद्या

देवरी,29 (प्रतिनिधी)- सिकलसेल दिनाचे औचित्य साधून उद्या रविवारी (ता.30) या आजारावर एक दिवसीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दुपारी एक वाजता करण्यात आले आहे.
स्थानिक शिवाजी छत्रपती शिवाजी लॉन येथे आयोजित या शिबिराला देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम,माजी समाज कल्याण सभापती सविता पुराम, डॉ. दिप्ती जैन, डॉ. निमगडे, डॉ. चांदेवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सावली ओबीसी कृती समितीचे तहसिलदारांना निवेदन


मुल,दि.29(तुलसीदास भुरसे)- सावली तालुका ओबीसी कृती समितीच्यावतीने केंद्राच्या ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व केंद्रीय वैद्यकीय प्रवेश प्रकीयेत ओबीसी आरक्षणाला लावलेल्या कात्रीच्या विरोधात सावली तहसिलादारामार्फेतं प्रधानमंत्री,मुख्यमंत्री,केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री,चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री,केंद्रीय गृहराज्यमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.ओबीसी कृती समिती सावलीचे संयोजक अविनाश पाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांनी राज्यात ओबीसी मञालय स्थापन केल्याबद्दल अभिनंदन केले. पंरतु केंद्रात व राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृती कपात केल्यामुळे तसेच केंद्रीय वैद्यकीय प्रवेश प्रकीयेत 27%आरक्षण लागु न करता 2% केल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत ओबीसीचे आरक्षण पुर्ववत ठेवून शिष्यवृत्तीची रक्कम पुर्ण देण्याची मागणी केली आहे.यावेळी संयोजक अविनाश पाल,सतिश बोम्मावार अर्जुन भोयर,कोषाध्यक्ष दौलत भोपये,सौ. योगिताताई धनराज डबले,विनोद धोटे,अरुण पाल,मोतीराम चिमुरकर,चंद्रकात संतोषवार,दिवाकर गेडाम,देवराव चिताडे, संरपंच पुष्पाताई शेरकी, गुरुभाऊ कोसरे,अशोक नागापुरे समस्त ओबीसी बांधव उपस्थित होते.

देवरीत डाके आत्महत्याप्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा निषेध

देवरी,29(प्रतिनिधी)- बारामती झोन मधील केडगाव विभागात येणाऱ्या यवत वितरण केंद्रातील एका कर्मचाऱ्यांने सहायक अभियंत्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उडेजात आला आहे. या प्रकरणासंबंधाने महावितरणच्या देवरी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी काल शुक्रवारी (ता.28) देवरी येथे सभा घेऊन जाहीर निषेध केला
देवरी येथील महावितरणत्या विभागीय कार्यालयासमोर यवत वितरण केंद्रातील सहायक अभियंता पवार यांचे दडपशाहीचा निषेध करण्यासाठी सभेचे आयोजन काल शुक्रवारी करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशन चे विभागीय सचिव श्री विनोद चौरागडे  हे होते. यावेळी  देवरीचे शाखा सचिव जगदीशसिंग शेंगर, प्रितम राउत शाखा सचिव आमगांव,अमोल अमोल जीवनकर,विनोद भंडारकर,सुनील कुथे,दिनेश पटले उमेश पाटिल,अनिल मेंढे,ह्रषिकेश पिंजरकर,विलास वढाई,रवि भस्के,दिनेश कमरे,प्रभाकर नाट, दिलीप सहारे,सुनील बांत,सरिता सोरते,श्वेता अंबादे आणि कार्यालयीन कर्मचारी अधिकारी व बहुसंख्य विज कर्मचारी  उपस्थित होते   
  सविस्तर असे की, महावितरणच्या बारामती झोन मध्ये मोडणाऱ्या केडगाव विभागातील यवत या वीज वितरण केंद्रात कार्यरत राहुल माणिक डाके या तंत्रज्ञाने गेल्या 25 तारखेला आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्याला सहायक अभियंता पवार यांचेपासून मानसिक त्रास असल्याचे नमूद करीत आत्महत्येला त्यांना जबाबदार धरण्याविषयी लिहले होते. या प्रकरणी संपूर्ण राज्यातील महावितरणत्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लहान कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अभियंते मानसिक त्रासाचे कृत्रिम दडपण निर्माण करीत असल्याचा आरोप महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे..



खबरदार! चिखलाने माखलेला ट्रॅक्टर रस्त्यावर आणाल तर...!

तहसीलदार विजय बोरूडे यांचे तलाठी-ग्रामसेवक यांना कारवाईचे आदेश
देवरी,29(प्रतिनिधी)- चिखलाने माखलेल्या रस्त्यावर कोणतेही वाहन घसरून वाहनचालकाचा जीव जाऊ शकतो. रस्ते हे सुखकर प्रवासासाठी असतात. त्यामुळे रस्त्यावर चिखलाने माखलेले टॅक्टर आणता कामा नये. अन्यथा अशा ट्रॅक्टर चालक-मालकांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे यांनी दिली आहे. दरम्यान, तालुक्यातील सर्व तलाठी व ग्रामसेवक यांना आपल्या हद्दीतील ट्रॅक्टर मालकांना सूचना देण्याविषयीचे लेखी आदेश तहसीलदार देवरी यांनी नुकतेच निर्गमित केले आहेत.
सविस्तर असे की, पावसाळ्याच्या तसेच रब्बी हंगामात ट्रॅक्टरचालक हे शेतात चिखलणी करून माखलेले ट्रॅक्टर मुख्य मार्गावर आणत असतात. त्यामुळे ट्रॅक्टरला लागलेले चिखल हे रस्त्यावर येते. बहुधा या चिखलाने संपूर्ण रस्ता माखलेला असतो. परिणामी, रस्ता निसरडा होऊन अनेक वाहनांना अपघात होण्याची दाट शक्यता असते. ट्रॅक्टरचालकांच्या अशा चुकांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यामुळे सर्व ट्रॅक्टर चालकांनी शेतात चिखलणी केल्यानंतर आपले वाहन पाण्याने धुतल्यानंतरच मुख्य मार्गावर आणावे, अन्यथा संबंधित वाहन चालक-मालक यांच्यावर कडक कारवाई केली, जाणार असल्याचे तहसीलदार विजय बोरूडे यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यातील सर्व तलाठी आणि ग्रामसेवक यांना या संबंधी कारवाई करणाचे लेखी आदेश नुकतेच देण्यात आले आहेत.


Friday 28 July 2017

नववीच्या पुस्तकात बोफोर्स प्रकरणाचा उल्लेख, काँग्रेस आक्रमक



नागपूर,दि.28 – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने छापलेल्या नववीच्या पुस्तकामध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बोफोर्स घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. नववीच्या इतिहासाच्या पुस्तकात हा उल्लेख करण्यात आला आहे. यानंतर कॉंग्रेस पक्षाने अपेक्षेप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपूरमध्ये युवक काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
या पुस्तकात राजीव गांधी यांच्याबाबत माहिती देताना, संरक्षण सामग्री आणि विशेषतः बोफोर्स कंपनीकडून लांब पल्ल्याच्या तोफा खरेदी संदर्भात झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजीव गांधींवर बरीच टीका झाली असं म्हटलं आहे. त्यानंतर राजकीय भ्रष्टाचार हा या काळातील निवडणुकांमध्ये महत्तवाचा मुद्दा बनला आणि निवडणुकामध्ये काँग्रेसचा पराभव झाला, असं या पुस्तकात म्हटलं आहे. यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे प्रधानमंत्री झाले. इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान मानले जाते. पक्षातील अंतर्गत वादविवादामुळे ते फार काळ प्रधानमंत्रीपदावर राहू शकले नाहीत. 1990 मध्ये चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झाले. त्यांचेही सरकार अल्पकाळ टिकले. 1991 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे (LTTE) या संघटनेने राजीव गांधींची हत्या केली असा उल्लेख केला आहे.

भुजबळ हेच भ्रष्टाचारी का,उर्वरित राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मंत्री सज्जन आहेत का ?



सांगली, दि. 28 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रत्येक वेळी कर्जमाफीच्या वेगवेगळ्या घोषणा करून शेतक-यांची फसवणूक करीत आहेत. कर्जमाफीच द्यायची आहे, तर अर्जाच्या नावाखाली वेळकाढूपणा कशासाठी करता ?, असा सवाल शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. तसेच दीड लाख नव्हे, संपूर्णच कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी आर या पारची लढाई लढण्यासाठी शेतकरी सज्ज झाला आहे, असा इशाराही त्यांनी दिला.सोबतच मुख्यमंत्री फडणवीस सज्जन असल्याचा आव आणत आहेत.प्रत्यक्षात भ्रष्टाचारी आमदार,मंत्र्यांवर ते काहीच कारवाई करीत नाहीत.महाराष्ट्रात एकटे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हेच भ्रष्टाचारी आहेत,उर्वरित राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील मंत्री सज्जन आहेत का? त्यांच्यावर कारवाईचा एकही शब्द फडणवीस का बोलत नाहीत,करीत नाहीत.म्हणजेच मुख्यमंत्री केवळ सज्जनपणाचा आव आणत असल्याची टीकाही रघुनाथदादांनी केली.
ते पुढे म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या शेतक-यांना कर्जातून मुक्त करण्याची जबाबदारी शासनाचीच आहे. कर्जमाफी करून शेतक-यांवर उपकार करण्याची काहीच गरज नाही. कर्जमाफीचा एकदा निर्णय घेतल्यानंतर, दहा वेळा शासनाने आदेश बदलण्याची काहीच गरज नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफीची घोषणा केली जाते. पण त्यांच्यासारखे तात्त्विक धोरण राबविण्यात मुख्यमंत्री फडणवीस पूर्णत: अपयशी ठरले आहेत. कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला असताना शेतक-यांकडून अर्ज भरून पुन्हा काय साध्य करणार आहेत? शेतक-यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवण्याचे एकमेव धोरण फडणवीस सरकारचे आहे.१५ ऑगस्ट रोजी एकाही मंत्र्याला ध्वजारोहण करू देणार नाही. राज्यभरातील शेतक-यांच्या मनामध्ये प्रचंड उद्रेक असल्यामुळे शेतकरी आणि त्यांची पोरे पेटून उठली आहेत. तेच मंत्र्यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखणार आहेत, असा इशाराही रघुनाथदादांनी दिला. ध्वजारोहणास आमचा विरोध नसून मंत्र्यांऐवजी जिल्हाधिकारी, कर्मचारी अथवा शेतकºयांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यास त्याचे आम्ही स्वागतच करू, असेही त्यांनी सांगितले.

आश्रमशाळेतील विद्यार्थींनीची विहिरीत उडी मारून आत्महत्या


सालेकसा,दि.२८ : तालुक्यातील पिपरीया येथील कचारगढ आदिवासी आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थीनीने विहीरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना आज २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. मृतक मुलीचे नाव मनिषा सोमलाल कोंबे (१६) असे आहे.
सविस्तर असे, मनिषा कोंबे ही कचारगढ आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता दहावीची विद्यार्थीनी असून ती जवळच असलेल्या नवागढ येथील रहिवासी असून निवासी स्वरूपात या आश्रमशाळेत राहत होती. आज ९.३० वाजता आश्रमशाळेतील सर्व मुले मुले-मुली जेवण करीत असताना मनिषा अधीक्षकांना आढळून आली नाही. तेव्हा अधीक्षकांनी नवागढ येथील तिच्या घरी जावून ती आल्याची चौकशी केली असता,आढळून आली नाही. तेव्हा विद्यार्थी व अक्षिक्षकांनी शोधाशोध सुरू केली.तेव्हा मनिषा शाळेपासून काही अंतरावर असलेल्या विहीरीजवळ आढळून आली. विद्यार्थींनीनी समोर जावू नको तिकडे विहीर आहे असे म्हणत असतानाच तिने विहीरीत उडी घेतली.पोलीसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.विद्याथ्र्यांना अंघोळीसाठी नदी, ओढ्यावर पाठवू नये, आश्रमशाळा अथवा वसतिगृहातील स्नानगृहे व शौचालये स्वच्छ राहतील तसेच विद्यार्थी त्याचा वापर करतील हे मुख्याध्यापक व अधीक्षकांनी पाहणे, सकाळी ७ ते आठच्या सुमारास न्याहारी, दुपारी एक ते दीड या वेळेत जेवण आदी दक्षता घेण्याचा सूचना प्रशासकीय पातळीवर केल्या जातात. तरीसुद्धा मनिषावर आश्रमशाबाहेर जाण्याची का पाळी आली अशी शंका बळावत असून या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तर ती आश्रमशाळेबाहेर गेली नसावी अशा शंकाना पेव पुâटले असून सध्यातरी मनिाच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात असून पोलीस तपासात हे स्पष्ट होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या गाळे वाटपाला गैरव्यवहाराचा वास


प्रक्रियाच रद्द करून पारदर्शक व्यवहाराची मागणी
गोंदिया,दि.28(खेमेंद्र कटरे)- गोंदिया जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समिती क्षेत्रात नव्यानेच बांधकाम करण्यात आलेल्या दुकान गाळे वाटपाला गैरव्यवहाराचा वास सुटला आहे. या प्रकरणी खुद्द जि.प. सदस्य संभ्रमात असून त्यांच्यात कमालीची नाराजी आहे. परिणामी, संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली सदर गाळेवाटप प्रक्रिया रद्द करून पारदर्शक वातावरणात फेरलिलाव करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एका आमदाराची सेटिंग नाकारल्याने त्या आमदाराने जि.प. पदाधिकाऱ्यावर आर्थिक देवाण-घेवाणीचा आरोप केल्याचे वृत्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, सदर गाळे वाटप प्रक्रियेत लिलाव पद्धतीचा अवलंब करावयाचा होता. मात्र, जि.प. प्रशासन व प्रमुख पदाधिकाऱ्याने या प्रकरणी आपली खिचडी आधीच शिजविल्याचे बोलले जात आहे. यामुळे सदर लिलावाची जाहिरात कमीत कमी लोकांना माहित व्हावी, याचे नियोजन करण्यात आल्याचे काही नाराज जि.प. सदस्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्यामुळे काही पदाधिकारी व अधिकारी यांच्या संपर्कात असलेल्या मोजक्या लोकांनीच या लिलाव प्रक्रियेत भाग घेतला. या गाळेवाटपाच पारदर्शकतेचा अभाव असून गाळेवाटप कसे व कोणाला करायचे याचे कटकारस्थान आधीच शिजल्याचे वृत्त आहे. एका गाळ्याचा व्यवहार सुमारे ५ लाखापेक्षा अधिक रकमेचा मोबदला घेऊन गाळेवाटपाचे पूर्वनियोजन करण्यात आल्याचे जि.प. वर्तुळात बोलले जात आहे. आपल्या लोकांना गाळे मिळावे, यासाठी जिल्ह्यातील एका आमदाराने सुद्धा फिल्डिंग लावली असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गाळेवाटप झाल्याचे सांगून त्यांची बोळवण केल्याने त्यांनी संताप व्यक्त केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या गाळेवाटपात गोरेगाव तालुक्यातील भाजपच्या एका जि.प.सदस्याचा सक्रिय सहभाग असल्याचीही चर्चा आहे.या गाळेवाटपाच्या निधीचाही माऊंट आबूच्या सहलीसाठी वापर होऊ शकतो ,अशी चर्चा दबक्या आवाजात आहे.
काही जि.प. सदस्यांच्या मते, सदर प्रक्रियेत प्रचंड प्रमाणावर आर्थिक देवाण-घेवाणीचा प्रकार झाला आहे. सर्व गाळेवाटपात पाच-सहा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या चमूने गाळेवाटपाची खिचडी ही आधीच शिजवली असल्याचे समजते. केवळ खानापूर्ती करण्यासाठी या प्रक्रियेची निविदा काही ठराविक प्रसारमाध्यमात करण्यात आली. यामुळे गरजू लाभार्थींना याची जाणीवच झाली नाही वा ज्यांना झाली त्यांनी अर्ज व संपूर्ण प्रक्रिया करण्यासाठी वेळच मिळणार नाही, याची दक्षता या गैरव्यवहारात समाविष्ठ चमूने घेतल्याचे सांगण्यात येते. लाटरी पद्धतीने करावयाच्या गाळे वाटप प्रक्रियेतही मोठा झोल केल्याचा आरोप काही सदस्य करीत आहेत. साध्या कामवाटपाच्या प्रकरणात खुल्या पद्धतीचा अबलंब करण्यात येतो. गाळेवाटप प्रक्रिया सुद्धा पारदर्शक वातावरणात होणे अपेक्षित असताना दोन-चार लोकांनी बंद खोलीत ही प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती बाहेर येत आहे.
परिणामी, सदर गाळेवाटप प्रकरणी कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याची चर्चा असून गरजू लाभार्थ्यांना डावलण्यात आले आहे. सदर प्रक्रिया रद्द करून पुन्हा लॉटरी पद्धतीने खुल्या पद्धतीचा अबलंब करून दुकान गाळे वाटप करण्याची मागणी जोर धरू पाहत आहे. या प्रकरणाला घेऊन मोरगाव अर्जूनी तालुक्यातील काही लोक न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याची सुद्धा माहिती हाती आली आहे.वास्तविक या सर्व प्रकरणाता विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून गोंदिया जिल्हा परिषदेतील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची नितांत गरज झाल्याचेही बोलले जात आहे.

देवरीत पुनर्रचित शिक्षण अभ्यासक्रम- २०१२चे तालुकास्तरीय प्रशिक्षण

देवरी, २८(प्रतिनिधी)-स्थानिक आईएसओ मानांकन ब्लॉसम स्कूल येथे पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ इयत्ता ७वी साठी तालुकास्तरीय प्रशिक्षण २६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधित आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन ब्लॉसम पब्लिक स्कूल येथील ऑडीओविडीओ कॉन्फरेन्स हाॅलमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी साकुरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून देवरी बीआरसीचे गटसमन्वयक श्री. दिघोरे आणि मुख्याध्यापक सुजित टेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षणात तालुक्यातील ९७ शाळेतील विषय शिक्षक सहभागी झालेले होते. सदर प्रशिक्षण ३ ऑगस्ट पर्यंत चालणार असून यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण करण्यात येणार आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी साकुरे यांनी उपस्थितांना प्रशिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. मुख्याध्यापक सुजित टेटे यांनी अद्यावत शिक्षकाचे महत्व सांगतले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. लोथे यांनी केले.

अखेर नितीशकुमार विश्वासमत जिंकले


पाटणा, दि. 28 - सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणा-या नितीश कुमार यांनी शुक्रवारी बिहार विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव जिंकला  मात्र यावेळी विधानसभेत प्रचंड गोंधळ सुरु झाला आहे. दरम्यान तेजस्वी यादव यांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा करण्यात आली आहे. यावेळी तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांवर हल्लाबोल करत माझ्या आत्मविश्वासाला नितीश कुमार घाबरले असा टोला लगावला आहे. जेडीयू आमदारांनी मात्र आपण सहजपणे बहुमत सिद्ध करु असं सांगितलं आहे. 243 जागांच्या विधानसभेत एनडीएच्या सहाय्याने नितीश कुमार यांनी बहुमताचा 122 हा आकडा गाठला असल्याचा दावा करण्यात आला आहे. एनडीएकडून बुधवारी राज्यापालांना 132 आमदारांची यादी सोपवण्यात आली. यामध्ये जेडीयूचे 71, भाजपाचे 53, आरएलएसपीचे दोन, एलजेपीचे 2 आणि तीन अपक्ष आमदारांचा समावेश आहे.

'बिहारमधील लोकांना खूप सहन करावं लागलं आहे. आमच्याकडे 80 आमदार आहेत. मला हटवू शकत नाही हे नितीश कुमार यांना चांगलंच माहित होतं. हे सर्व सहा महिन्यांच्या तयारीनंतर करण्यात आलं आहे', असं तेजस्वी यादव बोलले आहेत.
दुसरीकडे पाटणा उच्च न्यायालयात नितीश कुमार यांच्या जेडीयूने भाजपासोबत हातमिळवणी करत केलेल्या सरकार स्थापनेविरोधात आरजेडीकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. सोमवारी याचिकेवरील सुनावणी होणार आहे.

पनामा पेपर लीकप्रकरणी नवाज शरीफ दोषी; पंतप्रधान पदावरुन डच्चू


पनामा पेपर लीकप्रकरणी नवाज  शरीफ दोषी; पाकिस्तानच्या SC चा निर्णय, पंतप्रधान पदावरुन डच्चूइस्लामाबाद,28 -पनामा पेपर लीकप्रकरणी दोषी ठरवत नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले आहे. नवाज शरीफ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
पनामा गेट प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ दोषी आढळले. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिल्यानंतर शरिफ यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आलं आहे. लंडन येथे अवैधरीत्या बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप शरीफ यांच्यावर होता.

पनामा पेपर प्रकरण उघडकीस आल्यानंतर सुप्रीम कोर्टाने आरोपांच्या चौकशीसाठी एका संयुक्त चौकशी समितीची स्थापना केली होती. या समितीने १० जुलै रोजी आपला अहवाल सादर केला होता. अहवालात शरीफ यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. शरीफ ,यांच्या राजीनाम्यानंतर पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कर्मचारी करणार एनपीएस योजनेचा त्याग- वितेश खांडेकर



देवरी,२८- राज्य शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कधी डीसीपीएस तर कधी एनपीएस या योजनांच्या मध्ये झुलते ठेवले आहे. दस्तुरखुद्द, सरकारलाच या योजना कळल्या नसल्याने कर्मचाèयांना त्या कशा कळणार? असा आरोप महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे प्रांताध्यक्ष वितेश खांडेकर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. दरम्यान, राज्यातील कर्मचारी या योजनांचा त्याग येत्या ऑगस्टअखेर पर्यंत करणार असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
 गेल्या ऑक्टोबर २००५ मध्ये कर्मचाèयांना लागू असलेली पेंशन योजना बंद करून राज्यात डीसीपीएस योजना सुरू करण्यात आली. यानंतर २०१५ मध्ये सदर योजना बंद करून एनपीएस योजनेची सुरवात केली. या दरम्यान शासनाने अनेक निर्णय बदलले. यामुळे या योजनांबाबत सरकार संभ्रमावस्थेतच आहे. गेल्या १०-१२ वर्षात या योजना सरकारलाच समजल्या नसतील तर, त्या कर्मचाऱ्यांना कशा समजणार, असा सवाल श्री. खांडेकर यांनी सरकारला केला आहे. या योजनेमध्ये अद्यापही अनेक कर्मचाऱ्यांचे खात सुद्धा उघडण्यात आले नाही, तर ज्यांचे खाते उघडले गेले त्यांच्या खात्यात सरकार आपला वाटा देत नाही. एवढेच नाही तर या योजनेच्या माध्यमातून निवृत्तीनंतर नक्की किती पेंशन मिळेल, हे अद्यापही सरकारला स्पष्ट करता आले नाही. याउलट केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यूपश्चात कुटुंबनिवृृत्तीवेतन योजना व उपदान देण्याचे मान्य केले आहे.
राज्य सरकारने आपल्या कर्मचाèयांना कोणते लाभ देता येतील, यासाठी १३ जुलै २०१६ ला वित्तमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीला एक वर्षाचा कालावधी लोटूनही कोणताही निर्णय अद्याप पर्यंत घेण्यात आला नाही. मात्र, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करण्यात येणारी १० रक्कम ही सरकार भांडवलदारांच्या फायद्यासाठी शेअरमार्केट मध्ये गुंतविण्यासारखे निर्णय जाहीर करत आहे. परिणामी, डीसीपीएस-एनपीएस या माध्यमातून राज्य सरकारला मिळणारी रसदच बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना घेण्याच्या निर्णयाप्रत पोचली असल्याचे पत्रकात म्हटले आहे. यासाठी येत्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस या पेंशन योजनांचा त्याग राज्य सरकारचे कर्मचारी करणार असून शासनाच्या धोरणाला विरोध सुद्धा करणार आहेत. या आंदोलनात राज्यातील कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने भाग घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क समितीने केले आहे.

देवरी-आमगाव राज्यमार्ग ठरू पाहतो 'स्वर्गाचे द्वार'



एक ट्रॉली मातीने बुजविले २ किमीचे खड्डे

साबां विभागाचा 'भीम' पराक्रम

सुरेश भदाडे

देवरी,२८- गेल्या काही वर्षापासून देवरी-आमगाव रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने हा राज्यमार्ग वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरू पाहत आहे. गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी केवळ एक ट्रॅक्टर ट्रॉली मातीमिश्रित मुरुमाचा वापर करून दोन किलोमीटर मधील खड्डे बुजविण्याचा भीम पराक्रम या विभागाने केला आहे. परिणामी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने या राज्यमार्गावर वाहनचालकांसाठी स्वर्गाचे द्वार तर उघडण्याचे धोरण आखले नसावे ना,अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सविस्तर असे की, देवरी-आमगाव राज्यमार्गावर मुल्ला ते वडेगाव या तीन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. परिणामी, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन काही चालकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेकांना अपंगत्वाला सामोरे जावे लागल्याचे वृत्त आहे. यंदा पावसाचे प्रमाण या भागात अत्यंत कमी असताना सुद्धा रस्त्यावर जागोजागी पाणी साचून राहत असल्याने दुचाकीस्वारासह पादचाèयांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही वर्षापासून राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे बंद केले आहे. परिणामी, पावसाच्या साचलेल्या पाण्याने डांबरी रस्ते खराब होत आहेत. मुल्ला ते वडेगाव दरम्यान गेल्या वर्षीपासून पडलेले खड्डे बुजविण्याचे काम विभागाने केले नसल्याचे दिसून येते. डागडुजीच्या नावाखाली कंत्राटदाराशी संगनमत करून गैरव्यवहार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
गेल्या तीन-चार दिवसापूर्वी देवरीच्या एका कंत्राटदाराच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचा देखावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला. या कंत्राटदाराने केवळ एक ट्रॅक्टर ट्रॉली मातीमिश्रित मुरुमाचा वापर करून दोन किलोमीटर रस्त्यातील खड्डे बुजविण्याचा भीम पराक्रम केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय म्हणजे हा कंत्राटदार सत्ताधारी पक्षाचा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाèयांचे चांगलेच फावत आहे.
या भागातील लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष देवून वाहनचालकांच्या जिवाचे संरक्षण करण्याची मागणी होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून सदर रस्त्याच्या डागडुजी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कार्यवाहीची मागणी सुद्धा होत आहे.

हत्या करुन 'ती' मृतदेहासोबत 2 दिवस झोपली

नवी दिल्ली, दि. 28 - दारुड्या पतीच्या अतिशय घाणेरड्या शिव्या  आणि दरदिवसी होणाऱ्या मारहाणीला कंटाळलेल्या एका महिलेनं आपल्या पतीची हत्या केली . धक्कादयक बाब म्हणजे पतीच्या मृतदेहाचा बंदोबस्त करता न आल्याने दोन दिवस ही महिला चक्क पतीच्या मृतदेहाशेजारीच झोपली. ही घटना दिल्लीतील कापसहेडा परिसरातील आहे.  दोन दिवसांनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिला युक्ती सुचली.
यानुसार तिस-या दिवशी सकाळी तिनं लोकांना असे सांगितले की, पतीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. लोकांनाही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला व मृतदेह घेऊन ते स्मशानभूमीत पोहोचले. आरोपी महिलेचं नाव शिल्पी अधिकारी (वय 32 वर्ष )असे असून पती नितीशची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे. 
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली व मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी 15 मिनिटांपूर्वी पोलीस स्मशानभूमीत पोहोचले. पोलिसांनी संशय आल्यानं त्यांनी मृतदेह रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी नेला. पोस्टमार्टेम रिपोर्टमुळे घडल्या प्रकाराचे सत्य सर्वांसमोर आले. या रिपोर्टमध्ये मृत व्यक्तीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी आरोपी पत्नी शिल्पीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये शिल्पीनं सांगितले की, नितीश दारू पिऊन मारहाण करायचा, सोबत शिवीगाळदेखील करायचा. त्याच्या या छळामुळे शिल्पी कंटाळली होती. या सर्व त्रासातून तिला मुक्तता हवी होती. याच कारणामुळे तिनं नितीशची गळा दाबून हत्या केली. शिल्पी मूळची पश्चिम बंगालमधील रहिवासी होती. शिल्पी व नितीशची दोन मुलं आहे. दोघंही मुलं शिल्पीच्या आईवडिलांजवळ राहतात. तर नवी दिल्लीत शिल्पी व नितीश राहत होते. 

काँग्रेसचे तीन आमदार भाजपच्या कळपात



अहमदाबाद,28: बिहारमध्ये आघाडी सरकार कोसळल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद बलवंतसिंह राजपूत, आमदार तेजश्री पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
बलवंतसिंह राजपूत हे शंकरसिंह वाघेलांचे व्याही असून त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते. वाघेलांच्या जाळ्यात काँग्रेस अडकत चालली असून, त्यात राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो. गुजरात काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली असून, अंतर्गत कलाहामुळे तीन आमदारांनी पक्ष सोडल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि गुजरात सरकार विकासकामांवर भर देत असल्याने भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे आमदारांनी म्हटले आहे. प्रल्हाद पटेल यांनी काँग्रेसचे पाटीदार समाजाबाबतचे धोरण अमान्य असल्याने आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचे सांगितले.
शंकरसिंह वाघेलांनंतर तीन आमदारांचे राजीनामे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. येत्या काही दिवसांत आणखी बारा ते पंधरा आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. येत्या आठ ऑगस्टला गुजरातला दोन राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीपूर्वीच काँग्रेसच्या तीन आमदारांनी एकाच वेळी राजीनामा दिल्याने गुजरात काँग्रेसला हादरा बसला आहे. काँग्रेसच्या तीन आमदारांनी राजीनामा दिल्याने काँग्रेसचे संख्याबळ 57 वरून 54 वर आले आहे. काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांना विजयी करण्यासाठी 47 आमदारांचे पाठबळ असणे गरजेचे आहे.

डवकी येथे बिबट्याने केल्या चार शेळ्या ठार

देवरी, 28 (प्रतिनिधी)- येथून चार किलोमीटर अंतरावरील डवकी येथे मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने चार शेळ्या मारल्याची घटना आज रात्री (ता.28 ) घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डवकी येथील शेतकरी कुवरलाल मयाराम घरत यांच्या गोठ्यातील चारही शेळ्या बिबट्याने मारून ठार केल्या. सकाळी श्री घरत हे आपल्या गोठ्यात गेल्यावर त्यांच्या चारही शेळ्यांचे लचके छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्या. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येते. यामुळे घरत कुटुंबीयांचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी घरत यांचेसह नागरिकांनी केली आहे. दरम्यान, गावात दहशतीचे वातावरण आहे.

Thursday 27 July 2017

वंचित शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेचा लाभ द्या – विखे पाटील



मुंबई. ( शाहरुख मुलाणी )दि.27 – दुष्काळाने होरपळलेल्या अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांसह संपूर्ण राज्यात पीक विमा योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना सदरहू योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींची तातडीने बैठक बोलवावी, असे निर्देश आज विधानसभेत सरकारला देण्यात आले.
काँग्रेसने हा मुद्दा आज विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर बोलताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी निर्माण होत असलेल्या अडचणी सभागृहात विषद केल्या. या योजनेसाठी सरकारने जाचक नियम आणि अटी घातल्याने अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, ही बाब त्यांनी महसूलमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. राज्यात मागील २-३ वर्षांपासून दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. त्यात अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले, ही वस्तुस्थिती आहे. कमांड क्षेत्रातील शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळणार नाही, हा नियम केल्याने बहुतांश शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अट तातडीने काढून टाकावी, अशी मागणी विखे पाटील यांनी केली. याच अनुषंगाने विधानसभेतील इतर आमदारांनी पीक विमा योजनेबाबत केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन याबाबत तातडीने बैठक बोलावून निर्णय करण्याबाबतचे निर्देश अध्यक्षांनी सरकारला दिले.

Tuesday 25 July 2017

देवरी येथे मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

देवरी,दि.२५- स्थानिक पंचशील चौकातील समाजमंदिर येथे तहसील कार्यालय व दीनबंधू ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने नवमतदार नोंदणी शिबिराचे आयोजन  १० ते २३ जुलै दरम्यान करण्यात आले होते.
तेरा दिवस चाललेल्या या शिबिरात देवरीतील ८५० मतदारांची नोंदणी करण्यात आली. या शिबिराला देवरीचे उपनगराध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, नगरसेवक यादोराव पंचमवार,  भाजपचे संघटनमंत्री वीरेंद्र अंजनकर, देवरीचे तहसीलदार विजय बोरुडे, नायब तहसीलदार यावलकर, प्रवीण दहिकर, आदी मान्यवरांनी भेट दिली.

ओबीसींचे द्वितीय महाअधिवेशन ७ ऑगस्टला दिल्लीत


गोदिया,25 - राष्ट्रीय  ओबीसी महासंघाचे दुसरे राष्ट्रीय महाअधिवेशन येत्या ७ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे.
दिल्लीच्या रफी मार्गावरील कान्स्टीटयुशनल क्लबच्या सभागृहात मंडल आयोग दिनी आयोजित या महाअधिवेशनाचे उद्घाटन माजी न्यायमूर्ती तथा मागासवर्गीय आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. ईश्वरैया यांचे हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्षपदी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री ना.अनंत गीते, केंद्रीय श्रममंत्री ना.बंडारू दत्तायत्र, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.राजेंद्र गेनई, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राच्या ग्रामविकास व महिलाबालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे, ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, ओबीसी संसदीय समितीचे अध्यक्ष खासदार गणेश सिंग, तेलंगाणाचे राज्यसभा सदस्य देवेंद्र गौड, महाराष्ट्राचे खासदार नाना पटोले,तेलंगानाचे खासदार बी.नरसय्या गौड, महाराष्ट्रातील आमदार सुनील केदार, नवीदिल्लीचे माजी कुलपती डॉ. पी.सी. पतंजली आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.
 पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक प्रा.बबनराव ताङ्मवाडे राहणार आहेत. दरम्यान, या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात भारतीय बहुजन आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व करणारे सामाजिक आणि राजकीय कार्यात अग्रणी माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार शरद यादव यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय समन्वयक तथा माजी खासदार डॉ. खुशालचंद्र बोपचे हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना. अनुप्रिया पटेल, महाराष्ट्राचे पशू,दुग्ध आणि मत्स्य विकासमंत्री ना.महादेव जानकर, बिहारचे खासदार हुकूमदेव यादव, हरियानाचे खासदार राजकुमार सैनी, तेलंगाणाचे राज्यसभा खासदार रापोलू भास्कर, के. केशवराव, डी. श्रीनिवासन, तेलंगाणाचे माजी खासदार व्ही. हनुमंतराव, महाराष्ट्रातील आमदार विजय वडेट्टीवार, डॉ. परिणय फुके, तेलंगाणाच्या बी.सी.सेंटर फार एम्पावरमेंटचे सचिव कस्तुरी जयाप्रसाद हे उपस्थित राहतील
या महाअधिवेशनात देशातील ओबीसींच्या सामाजिक व शैक्षणिक स्थितीवर चर्चा होणार असून ओबीसींच्या संवैधानिक हक्कांसाठी लढ्याची दिशा आणि दशा यावर विचारमंथन करण्यात येणार आहे. ओबीसींवर सतत होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर हे आयोजन करण्यात आले असून देशातील सर्व ओबीसी बांधवांना या महाअधिवेशनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

सरकारची योजना कर्जमाफीची नव्हे, ही तर कर्जवसुलीची – अजित पवार


सैनिकांच्या शेतकरी कुटूंबालाही कर्जमाफीचा लाभ द्या

मुंबई,25 ( शाहरुख मुलाणी ) – सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना, ही शेतकऱ्यांना दिलासा देणारी नसून राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली करणारी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याऐवजी हे सरकार (वन टाईम सेंटलमेंटच्या) नावाखाली शेतकऱ्यांकडूनच कर्जाची वसुली करीत असल्याची घणाघाती टीका आज राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते आ.अजित पवार यांनी विधानसभेत केली. विधानसभेत नियम-२९३ अन्वये कर्जमाफीबद्दल सत्ताधाऱ्याकडून मांडल्या गेलेल्या सरकारच्या अभिनंदन प्रस्तावावर सुधारणा सुचवताना ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले सरकारने जाहीर केलेल्या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी अनेक सुधारणा करणे गरजेचे आहे. सरकारने ही योजना राबविताना अनेक जाचक अटी, निकष लावलेले आहेत. यामुळे अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहत आहे. पाच लाख रुपये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्याला सरकारच्या दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर पहिल्यांदा त्याला साडेतीन लाख रुपये भरावे लागतील आणि मगच त्या शेतकऱ्याला दीड लाख रुपयांची कर्जमाफी मिळू शकणार आहे. परंतु त्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती हालाकीची असेल तर वरील रक्कम तो शेतकरी कोठून भरेल ? याचा विचार सरकारने केलेला नाही. त्यामुळे सरकारने ही जाचक अट न ठेवता सरसकट शेतकऱ्यांच्या कर्जातून दीड लाख वजा करावेत, उर्वरित राहिलेली कर्जाची रक्कम शेतकरी त्यांच्या सोयीनुसार बँकेत जमा करण्याची मुभा देण्यात यावी. तसेच सरकारने या कर्जमाफीतून जवानांच्या शेतकऱी कुटूबिंयांना वगळले आहे. देशाच्या संरक्षणासाठी दिवसरात्र सेवा करणाऱ्या या जवानांचा यात काय दोष ? जवानांच्या शेतकऱी कुटूंबियांना देखील या कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा, अशी मागणी यावेळी अजित पवार यांनी केली. सरकारने जाहीर केलेल्या कर्जाच्या पुनर्गठन योजनेत अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करुन घेतले होते. त्यामुळे या कर्जमाफीच्या लाभापासून हे शेतकरी वंचित राहिल्याने या शेतकऱ्यांचाही विचार करायला हवा. सरकारने कर्जमाफासाठी कुटूंब हा घटक लक्षात घेऊन कर्जमाफी दिलेली आहे. परंतु बँकेचा खातेदार असणाऱ्या प्रत्ये शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ द्यायला हवा. सरकारी तसेच जिल्हा बँका सोबतच नागरी सहकारी बँका व पतसंस्थाचा कर्जदार असणाऱ्या शेतकऱ्याचाही समावेश या कर्जमाफीच्या योजनेत करायला हवा होता. सरकारने पुरवणी मागण्यांमध्ये कर्जमाफीसाठी २० हजार कोटींरुपयांची तरतूद केली आहे, परंतु बाकीच्या १४ हजार कोटी रुपयांची तरतूद कशी करणार की शेतकऱ्यांकडून वसूल करणार याची माहिती सरकारने देणे गरजेचे आहे. अद्यापही कर्जमाफीसंदर्भात राज्यशासनाने परिपत्रके काढलेली नाहीत, अंमलबजावणी कशी काय करणार. शिवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ढोल बडविण्याचे नाटक करीत आहे. शिवसेनेच्या ताब्यात मुंबई महापालिका आहे आणि सध्या मुंबई महापालिकेकडे ६० हजार कोटीच्या ठेवी पडून आहेत. शिवसेनेने मोठा दिलदार पणा दाखवून त्यातील काही निधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी द्यावा राज्यातील जनता शिवसेनेला डोक्यावर घेईल असा टोला लगावला. तुमची संख्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संख्या एकत्र आली, मॅजिक फिगर झाली तर एका झटक्यात सरसकट शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होईल, शिवसेनेची आहे का तयारी ? असा सवालही त्यांनी यावेळी सेनेच्या आमदारांना उद्देशून विचारला. नोटाबंदीनंतर जिल्हा बँकेने खातेदारांचा पैसा जमा केला, त्यानंतर आरबीआयने जिल्हा बँकांना पैसे घेण्यास मनाई केली, सरकारनेही हात झटकल्यामुळे एका वर्षाचे व्याज हे जिल्हा बँकांना भरावे लागणार आहे त्यामुळे जिल्हा बँका व त्यावर अवलंबून असणारे शेतकरी अडचणीत येणार आहेत. शेतकऱ्यांना शासकीय योजनांसाठी ऑनलाइन अर्जासह ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्याची विनंती अजित पवार यांनी यावेळी सभागृहात केली.

गोंदिया येथे जैन कलार समाजाची सभा उत्साहात



गोंदिया,25- गोंदिया जिल्ह्यातील जैन कलार समाजबांधवाच्या जिल्हा बैठकीचे आयोजन काल सोमवारी (ता.24) स्थानिक पिंडकेपार रोड वरील समाज भवनात उत्साहात करण्यात आले होते.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज मंडळाचे अध्यक्ष तेजराम मोरघडे हे होते. या सभेत समाजोपयोगी विषयावर चर्चा करण्यात आली. समाजाला दिशा देण्यासाठी कार्यकारी मंडळ करीत असलेल्या प्रयत्नांना समाजबांधव करीत असलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 
समाजभवन बांधकामासाठी  माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल पटेल यांच्या खासदार निधीतून काही निधी प्राप्त झाला आहे. याच प्रमाणे खासदार नाना पटोले यांच्या खासदार निधी व आमदार गोपालदास अग्रवाल  यांच्या आमदार निधीतून मिळालेल्या निधीतून समाजभवन उभारण्याचे काम सुरू आहे.शासकीय फंडातून प्राप्त होणाऱ्या निधीनुसार बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. 
सामाजिक बांधिलकी जोपासता यावी, म्हणून काही समाज बांधवांनी या बांधकामासाठी आर्थिक सहकार्य सु्द्धा केले आहे. 
याशिवाय समाजबांधवांच्या सदस्यनोंदणीचे कार्य सुरू असून आजीवन किंवा वार्षिक सर्वसाधारण सदस्य नोंदणी करून घेण्याचे आवाहन कार्यकारी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

देवरीत भाजपचे मतदार नोंदणी अभियान

देवरी,दि.25-  भारतीय जनता पक्ष तालुका शाखा देवरीच्या वतीने मतदार नोंदणी उपक्रम राबविण्यात येत आहे.
 सविस्तर असे की, गेल्या 1 तारखेपासून देशात मतदार नोंदणी अभियानाला सुरवात झाली आहे. या अभियानाची अमलबजावणी देवरी तालुक्यात उत्तमप्रकारे व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता युवामोर्चा आणि भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने मतदार नोंदणी उपक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये आज मंगळवारला स्थानिक दुर्गा चौक, 26 तारखेला संजय नगर, मोठा नळ शारदा मंदीर आणि 27 तारखेला गणेश चौकात मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.
तरी नागरिकांनी या नोंदणी शिबिरांमध्ये जास्तीत जास्त संख्येने मतदार नोंदणी करण्याचे आवाहन  तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, सविता पुराम, राजेश चांदेवार, इंद्रजीत भाटीया, अनिता चन्ने, यादोराव पंचमवार, राजू शाहू,  कुलदीप लांजेवार, नूतम सयाम, माजीद खान, इमरान खान,  पवन गुप्ता, शोभा शेंडे, सरिता डुंभरे, रचना उजवणे, प्रशांत काळे आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.

घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली

घाटकोपरमध्ये चार मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली 30 ते 40 जण अडकल्याची शक्यता
मुंबई,दि.25-घाटकोपरच्या दामोदर पार्क येथे श्रेयस सिनेमाजवळ चार मजली इमारत कोसळली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या इमारतीच्या ठिगाऱ्याखाली 30 ते 40 जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एनडीआरएफची टीमही घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.
सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी ही इमारत कोसळली. ही इमारत 40 वर्ष जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. या इमारतीच्या तळ मजल्यावर सितप नर्सिग होम होते. इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही कुटंब राहत होती. तळ मजल्यावर असणाऱ्या नर्सिग होमचे नुतनीकरण सुरू होते. इमारतीमध्ये 15 कुटुंब वास्तव्यास होती. तातडीच्या वैद्यकीय मदतीसाठी 8 अॅम्ब्युलन्स घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत. ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढलेल्या नागरिकांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवसेनेच्या मेंदूत झोल-झोल – विखे पाटील

शेतकरी कर्जमाफी फसवी, सरकार वेळकाढूपणा करतेय!
मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी फसवी असून, यासंदर्भात शेतकऱ्यांना अर्जवाटप करण्याची घोषणा म्हणजे वेळकाढूपणा असल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मलिष्का प्रकरणावरून शिवसेनेवर हल्लाबोल करत शिवसेनेच्या मेंदूत झोल असल्याचा चिमटाही त्यांनी काढला.

शेतकरी कर्जमाफीवरून विखे-पाटील यांनी सरकारवर जोरदार तोफ डागली. सरकारची कर्जमाफी योजना अपूर्ण आहे, फसवी आहे. कर्जमाफीसाठी आम्ही एक-दोन दिवसांत शेतकऱ्यांना अर्जवाटप सुरू होईल, असे सरकारने दोन दिवसांपूर्वी जाहीर केले. पण् कर्जमाफी करायला शेतकऱ्यांनी अर्ज गोळा करण्याची काय गरज आहे? बॅंकांकडे असलेल्या आकडेवारीच्या आधारे कर्जमाफी केली जाऊ शकते. सरकार आता अर्ज वाटून पात्र शेतकरी आणि कर्जमाफीची एकूण रक्कम निश्चित करणार असेल तर यापूर्वी जाहीर केलेले एकूण शेतकरी व कर्जमाफीच्या एकूण रकमेचे आकडे कशाच्या आधारे जाहीर केले? अशी विचारणा त्यांनी केली. कर्जमाफीची घोषणा करण्यास विलंब झाल्याने शेतकऱ्यांचा रोष कमी करण्यासाठी सरकारने या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले. पण् प्रत्यक्षात शिवरायांच्या नावाखाली लोकांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मीलवरील स्मारक आणि अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अजून पुढे गेलेले नाही. पण त्यांची नावे वापरून लोकांची दिशाभूल मात्र सुरूच असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. शेतीच्या प्रश्नांबाबत सरकारच्या नकारात्मक धोरणाकडे लक्ष वेधताना विरोधी पक्षनेते म्हणाले की, गेल्या वर्षी 15 जुलैपर्यंत राज्यात 42 टक्के पीक कर्जाचे वाटप झाले होते. यावर्षी 15 जुलैपर्यंत फक्त 29 टक्के कर्ज वितरीत झाले आहे. कर्जमाफीची घोषणा करतेवेळी सरकारने पेरणीसाठी 10 हजार रूपये देण्याची घोषणा केली. पण् 15 जुलैपर्यंत हे सरकार राज्यातील 1 कोटी शेतकऱ्यांपैकी फक्त 2 हजार 200 शेतकऱ्यांनाच पैसे देऊ शकले. राज्यात कामांचा पत्ता नसला तरी लोकांनी आपल्याशी गोड-गोड बोलावे, अशी या सरकारची अपेक्षा आहे. कारण मलिष्कासारखे कोणी थोडे कडू बोलले की, त्याच्या घरात कशा अळ्या सापडतात, हे राज्याने बघितले आहे. ज्या तत्परतेने मनपाचे अधिकारी मलिष्काच्या घरी तपासणीसाठी पोहोचले, तितक्यात तत्परतेने कधी मातोश्रीवर गेले आहेत का, अशी विचारणाही त्यांनी केली. शिवसेनेविरूद्ध बोलली म्हणून मलिष्काविरूद्ध मानहानीचा दावा ठोकण्याची मागणी करणे ही शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी आहे. आता शिवसेनाही एक एफएम रेडिओ झाला आहे ‘शिवसेनेच्या मेंदूत झोल-झोल आहे; म्हणूनच त्यांची भूमिका गोल-गोल आहे’ असा टोलाही विखे पाटील यांनी लगावला. लोक आता उद्धव ठाकरेंना गझनी म्हणू लागले आहेत. ज्या प्रमाणे गझनी चित्रपटात आमिर खान फोटो पाहून आपली स्मृती जागृत करतो, तसे उद्धव ठाकरेंनी अमूक विषयावर आपण काय बोललो होतो, हे आठवण्यासाठी वर्तमानपत्रांची जुनी कात्रणे सोबत बाळगली पाहिजे. म्हणजे आपण कशावर नेमकी काय भूमिका घेतली आहे, ते त्यांच्या लक्षात येईल. त्यांनी मागणी केली तर अशी सर्व कात्रणे मी त्यांना पाठवेन, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले. अलिकडेच राज्यातील 13 हजार जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा तुघलकी निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे हजारो शिक्षक बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात अक्षम्य दिरंगाई झाली आहे. मुंबईच्या प्रश्नपत्रिका नागपूरला पाठवाव्या लागल्या. यासंदर्भात येत्या अधिवेशनात जाब विचारणार असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. राज्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीरच आहे. जानेवारी ते जून 2017 या 6 महिन्यात पालघर जिल्ह्यात 557 तर गडचिरोलीत 550 बालमृत्यू झाले आहेत. मागील दीड वर्षात राज्यातील बालमृत्युंची संख्या 18 हजारांवर गेली आहे. जीएसटी मंजूर करताना आम्ही अंमलबजावणीतील अनेक संभाव्य उणिवांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यावर सरकार उपाय शोधू शकलेली नाही. उद्योजक, व्यापारी संतापलेले आहेत. लहान व्यावसायिक भवितव्य संपल्याच्या भीतीने ग्रासले आहेत, अशा अनेक प्रश्नांकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधले. राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्यांनी एका विकासकावर केलेली कृपादृष्टी कागदपत्रांसह समोर आली आहे. सुमारे 1 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचे दिसून येते. या प्रकरणाला मुख्यमंत्र्यांची मान्यता असल्याचे गृहनिर्माण मंत्र्यांनी नमूद केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनीच स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. या घोटाळ्यातही मुख्यमंत्री संबंधितांना क्लीन चीट देणार की कारवाई करणार, असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर रविवारी दुपारी विरोधी पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी समाजवादी पक्षाचे नेते आ. अबू आझमी, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे आ.प्रा. जोगेंद्र कवाडे, लोकभारतीचे आ. कपिल पाटील, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. शरद रणपिसे, विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते आ. विजय वडेट्टीवार, आ. संजय दत्त आदी उपस्थित होते. राज्यातील अनेक ज्वलंत प्रश्नांसंदर्भात राज्य सरकार उदासीन असल्याने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शासकीय चहापानावर बहिष्कार घालण्याची घोषणा विखे पाटील यांनी यावेळी केली.

..आणि उदयनराजेंना पोलिसांनीच मारली मिठी


 सातारा,दि.25 - खंडणीचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले स्वत:ला अटक करून घेण्यासाठी पोलिस ठाण्यात आले असता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्यांना चक्क मिठी मारल्या प्रकार आज घडला. खंडणीचा गंभीर गुन्हा असताना भोसलेंना पोलिसांनी व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचे आश्चर्य आहे. परिणामी, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे. एका आरोपीला अटक करण्याचे सोडून चक्क मिठी मारल्याने आरोपीला काय अटक होणार? आणि उदयनराजेंना इतर सामान्य आरोपींसारखी वागणूक मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खंडणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने उदयनराजे भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे वाढत्या दबावामुळे उदयनराजे स्वत:ला अटक करून घेण्यासाठी सातारा पोलीस ठाण्यात आले. उदयनराजेंना इतर आरोपींप्रमाणेच वागणूक मिळेल अशी अपेक्षा असताना या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्यांना चक्क मिठी मारली. त्यांचं स्वागत करून त्यांना बसायला खुर्चीही दिली. उदयनराजे अवघे पाचच मिनिटं पोलीस ठाण्यात थांबले. त्यानंतर बाहेर पडले आणि पुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाले. नंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. दुपारनंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं.
दरम्यान, उदयनराजे यांना पोलिसांनी दिलेल्या व्हिआयपी ट्रिटमेंटवर टीका होत आहे. पोलिसांनी आरोपींची गळाभेट घेणे कितपत योग्य आहे? इतर आरोपींना पोलीस अधिकारी अशीच वागणूक देतील काय? उदयनराजेंवर सामाजिक आरोप असते तर वेगळी गोष्ट होती, हे तर गंभीर आरोप आहेत, असं असताना पोलिसांना असं वागणं शोभतं का? असे सवालही यावेळी उपस्थित केले जात आहेत. काही लोकांनी तर अशा पोलीस अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे.

जेष्ठ शास्त्रज्ञ प्रा. यशपाल यांचे निधन


 नवी दिल्ली,दि.25-जेष्ठ शास्त्रज्ञ, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रा. यशपाल यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. नोएडा येथे रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रा. यशपाल शास्त्रज्ञ आणि शिक्षण तज्ञ म्हणून भरीव योगदान दिले. प्रा. यशपाल यांनी योजना आयोगाचे सल्लागार, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या. टाटा मूलभूत संशोधन संस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. अंतराळ विषयक मोहिमांसाठी भारत सरकारने १९७२ साली स्थापन केलेल्या अंतराळ अनुप्रयोग केंद्राचे प्रा. यशपाल पहिले संचालक होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष असताना त्यांनी महत्त्वाची पाऊले उचलली होती. केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्रालयाने २००९ साली उच्च शिक्षणातील बदलासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच काढता पाय...




मुंबई,24 ( विशेष प्रतिनिधी ) – युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या गोंधळा बाबत राज्यपाल चे विद्यासागर राव यांची भेट घेऊन शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि कुलगुरूंचा राजीनामा घ्या, अशी मागणी राज्यपालांकडे ठाकरे यांनी केली. यावर प्रतिक्रिया देत असताना तावडे यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलत असताना आपले म्हणणे पूर्ण करून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच आपला काढता पाय घेतला.
इतर विद्यापीठाचे पदवूत्तर प्रवेश पूर्ण होताहेत, त्यामुळे इतर विद्यापीठाचे प्रवेश थांबवावेत, फेर तपासणी 600 रुपये माफ करा, ऑनलाइन ऍडमिशन होत नसताना ऑनलाइन असेसमेंट चा घाट का घातला ? आदींसंदर्भात आदित्य ठाकरे आणि राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्यासोबत चर्चा केली. विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे, विद्यापीठाचा निकाल आटोपण्यासाठी मुंबईतील महाविद्यालये गुरुवार पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. ऑनलाईन असेसमेंटसाठी 4 दिवस विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णयही दुर्दैवी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. या सर्व कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याची वाट लागत आहे याला कुलगुरु संजय देशमुख आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे जबाबदार आहेत, त्यामुळे त्या दोघांचे राजीनामे घ्यावे अशी मागणी आदित्य ठाकरेंनी राज्यपालांकडे केली आहे. यावर आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस या अनुषंगाने शिक्षण मंत्री विनोद तावडे हे विधानभवनात होते त्यावर प्रतिक्रिया देत असताना, कधी कधी संघटनेचे काम करताना अभ्यास कमी पडतो हे मान्य आहे असे सांगत आदित्य ठाकरेंना टोला लगावला. युवासेना प्रमुख यांनी राजीनामा मागितला आहे, कुलगुरू एक आहेत त्यांचा मागितला असावा, बहुदा उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांचा मागितला असावा. असे सांगत आपल्या वरची जवाबदारी झटकत सेनेची झडती घेतली. तसेच कुलचिव यांची बदली ही आम्ही केली नसून तसेच शिक्षण विभागाने केली नसून केंद्रच्या मायनोरीटी विभागाने केली आहे. फेर तपासणी शुक्ल कमी करण्याबाबत मुद्दा स्वागतार्ह आहे, यावर विचार करू चर्चा करू असे तावडे यांनी आपले म्हणणे पूर्ण करीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देत आपला काढता पाय घेतला.

Saturday 22 July 2017

बोरकन्हार नजीक एसटीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आमगाव,22- येथून 7 किलोमीटर अंतरावरील बोरकन्हार गावानजिक एसटीने दिलेल्या धडकेत एक दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना आज (ता.22) सकाळी दहाच्या सुमारास घडली.
मृताचे नाव नीलेश निलकंठ आस्वले, (वय-23) राहणार मुल्ला असे आहे.
घटनास्थळावरून प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, मृत नीलेश याचे आमगाव येथे वेल्डींगचे दुकान आहे. तो आपल्या गावावरून आमगावकडे हिरो स्प्लेंडर प्रो (क्र. एम एच 35- झेड 4074) या दुचाकीने कामावर जात होता. दरम्यान, बोरकन्हार गावाजवळ गोंदियावरून नागपूरला जाणारी एसटी बस क्र.एम एच 40-8949 च्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे एसटीची दुचाकीला धडक बसली. यात निलेशचा जागीच मृत्यू झाला. पुढील तपास आमगाव पोलिस करीत आहेत.

Friday 21 July 2017

मेडिकल प्रवेशसंबंधी आरक्षणमें किए बदलाव से केंद्र सरकार अनजान

केंद्रीय स्वास्थ मंत्री जे.पी नड्डा से ओबीसी प्रतिनिधी मंडल की भेंट
मंत्रीने लगाई केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड को फटकार
नईदिल्ली,२१- केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड द्वारा मेडिकल शिक्षा प्रवेश परीक्षा के नतीजे आने के बाद राष्ट्रीय स्तरपर आरक्षित सीटों के कोटेमें किए गये बदलावसे समूचे देशमें ओबीसी उम्मीदवारोंमे असंतोष का माहौल है। राष्ट्रीय स्तरपर ओबीसी को दिए जानेवाले २७ फीसदी आरक्षण को घटाकर २ फिसदी से भी कम करने का मामला उजागर हुआ है। उल्लेखनीय है की, ओबीसी आरक्षण मे किए गये बदलाव की जानकारी केंद्र के स्वास्थ विभाग को न देने का मामला राष्ट्रीय ओबीसी महासंघ के प्रतिनिधी मंडल एवम स्वास्थ मंत्री जे.पी. नड्डा दरम्यान हुयी भेंट मे प्रकाश मे आया। श्री. नड्डाने इस संदर्भ में शीघ्र संज्ञान लेकर ज्वाइंट सेक्रेटरी एवम संबंधित विभाग को आज शुक्रवार (ता.२१) चेतावणी दी। ज्ञात रहे, कल गुरुवार को ओबीसी शिष्टमंडलने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, स्वास्थ राज्यमंत्री अनुप्रिया पटेल एवम सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले से मुलाकात कर उन्हे इस संबंध मे ज्ञापन सौंपा।
स्वास्थमंत्री श्री जे.पी. नड्डा से भेट करने वाले राष्ट्रीय ओबीसी महासंघ के प्रतिनिधी मंडल में सांसद नाना पटोले,संयोजक प्रा. बबनराव तायवाडे, राजनितीक समन्वयक तथा पूर्वसांसद डॉ. खुशाल बोपचे, खेमेंद्र कटरे, सचिन राजूरकर, एड. जय ठाकूर, हंसराज जांगिड, गुडरी व्यंकटेश्वर राव, मनोज चव्हान, सुरेंद्र आर्य इन पदाधिकारीयोंने हिस्सा लिया था।
गत ७ मई को समूचे देशमें मेडिकल प्रवेश परीक्षा नीट का आयोजन किया गया था। इस परीक्षा मे ओबीसी उम्मीदवारोंने अपनी प्रतिमा को सिद्ध कर दिखाया। पूरे देश मे मेडिकल की कुल ६३ हजार ८३५ सीट उपलब्ध है। इन सीटोंने १५ फीसदी सीटे राष्ट्रीय कोटे से आरक्षित की गयी है। इन सीटोंमे से १५ फीसदी अनुसूचित जाती एवम ७.५ फीसदी सीटे अनुसूचित जनजाती के लिए आरक्षित है। लेकीन, आरक्षण संबंधी सभी नियमकायदों एवम सुप्रीम कोर्ट के फैसले का अनादर कर ओबीसी आरक्षण २७ फिसदी से घटाकर २ फीसदी से भी कम कर ओबीसी को केवल ६८ सीटे दी गयी। परिणामस्वरूप, ओबीसी कोटे की २ हजार ४५७ सीटे खुले वर्ग में तबदील कर दी गयी। खास बात यह है की, आरक्षण कोटे में किये गये इस बडे बदलाव की सूचना सीबीएसई ने केंद्र की सरकार से दबा कर रखी।
इस प्रकरण को लेकर राष्ट्रीय ओबीसी महासंघके के पदाधिकारीयोंने केंद्रीय स्वास्थ मंत्री जे.पी. नड्डा से मुलाकात कर उनसे विस्तारसे चर्चा की। इस सारे घटनाक्रमसे स्वास्थमंत्री नड्डा ने इस प्रकरण की कोई सूचना या जानकारी नही होने जानकारी देते हुये, ज्वाइंट सेक्रेटरीसे जानकारी हासिल करने का प्रयास किया। लेकीन ज्वाइंट सेक्रेटरी अरुण सिंघल ने भी जानकारी नही होने की बात कही। इस घटना से उद्विग्न मंत्रिमहोदय एवम श्री. सिंघलने सीबीएसई प्रमुख से फोन पर बात कर खरीखोटी सुनाते हुये प्रवेश प्रक्रिया संबंधी विस्तृत रिपोर्ट सोमवार तक देने की सूचना दी। दरम्यान, ओबीसी छात्रोंपर हुए अन्याय को दूर कर उचित कारवाई करने का आश्वासन मंत्रिमहोदय एवम ज्वाइंट सेक्रेटरी (स्वास्थ) ने प्रतिनिधी मंडल को दिया।

चीनी मीडिया: भारत के पास डोभाल का दौरा आखिरी मौका

बिजींग,23- गुरुवार को विदेश मंत्री सुषमा स्वराज ने भारत और चीन में जारी तनाव के बीच लोकसभा में सरकार का रुख स्पष्ट किया था। सुषमा के बयान को लेकर चीनी मीडिया में तीखी प्रतिक्रिया छपी है। चीन के सरकारी अखबार ग्लोबल टाइम्स के चीनी संस्करण ने लिखा है, ''यह महिला विदेश मंत्री भारतीय सांसदों से झूठ बोल रही है क्योंकि यह निर्विवाद रूप से सच है कि भारतीय सैनिकों ने चीनी इलाकों में अतिक्रमण किया है। भारत के इस जोखिम भरे कदम से अंतरराष्ट्रीय समुदाय हैरान है और भारत के इस कदम का कोई भी देश समर्थन नहीं करेगा।''
Chinese media: Doval's visit to China, India has the last chance for peace.
अखबार ने आगे लिखा है, ''भारत सैन्य शक्ति के मामले में चीन से बहुत पीछे है। अगर भारत ने सैन्य समाधान का जोखिम उठाया तो उसे बेशक हार का सामना करना पड़ेगा। चीन कभी दोनों देशों के सैनिकों की वापसी जैसे समाधान को स्वीकार नहीं करेगा। जहां गतिरोध है वह चीन का इलाका है। भारत को एकतरफा और बिना शर्त के सैनिकों को वापस बुलाना चाहिए। चीन अपनी नीति से पीछे नहीं हटने वाला।''
गुरुवार को सुषमा स्वराज ने लोकसभा में कहा था, ''चीन का कहना है कि भारत अपने सैनिकों को डोकलाम से वापस बुलाए। अगर कोई बातचीत करनी है तो दोनों देश अपनी-अपनी सेना को वापस बुलाएं। भारत की तरफ से कोई भी अतार्किक बात नहीं कही जा रही है। इस मामले में सारे देश हमारे साथ हैं। भूटान जैसे छोटे देश में चीन इतना आक्रामक हो रहा है।'' सुषमा ने आगे कहा था, ''एक जगह ऐसी है जिसे ट्राइ-जंक्शन स्पॉट कहते हैं और यहां पर लिखित में सहमति है कि भारत, चीन और तीसरा देश भूटान मिलकर चीजों को तय करेंगे। उनकी नीयत इस बार ये है कि वो इस बार नीचे आ जाएं जिससे वहां की यथास्थिति खत्म हो जाए।''

Thursday 20 July 2017

मेडिकल शिक्षा में ओबीसी का आरक्षण कायम रखा जाए- राष्ट्रीय ओबीसी महासंघ

  
   
केंद्रिय मंत्रियोेको सौंपा ज्ञापन
नईदिल्ली,२०- हालही में केंद्रीय शिक्षा बोर्ड द्वारा नीट परीक्षा का राष्ट्रीय स्तरपर आयोजन किया गया था। इस प्रक्रिया मे राष्ट्रीय स्तरपर नाममात्र ६८ सीटे दे कर ओबीसी के छात्रोंपर घोर अन्याय किया गया। सीबीएसईने आरक्षण संबंधमे सभी मानको का उल्लंघन कर सर्वोच्च न्यायालय के आदेश का भी अनादर किया है। इस अन्याय के विरुद्ध राष्ट्रीय ओबीसी महासंघने आवाज बुलंद कर इस अन्याय को शीघ्र दूर करने की अपील सरकार से की है। इसी संदर्भ में कल बुधवार को संघ के प्रतिनिधी मंडल ने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर एवम सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले से भेट कर उन्हे ज्ञापन सौपा।
इस प्रतिनिधी मंडल का नेतृत्व महासंघके राष्ट्रीय संयोजक प्रा. बबनराव तायवाडेने किया। ज्ञापन देते समय महासंघ के राष्ट्रीय राजकीय समन्वयक तथा माजी सांसद डॉ. खुशालचंद्र बोपचे, निमंत्रक सचिन राजूरकर, हंसराज जांगिड, खेमेंद्र कटरे, मनोज चव्हाण, गुडरी व्यंकटेश्वर राव, पी.सी. कुलपती, सुरेंद्र आर्य, डॉ. राजेशकुमार, एड. बिजेंद्र धनत, एम.एस. रोहीला आदी मान्यवर उपस्थित थे।
 सरकार को दिये गये ज्ञापन के अनुसार, समूचे देश मे मेडिकल शिक्षा के लिए कुल ६३ हजार ८३५ जगह है। यह सभी सीटोंपर उम्मीदवार का चयन हालमे हुए नीट परीक्षा के आधार पर होना है। इस परीक्षा में राष्ट्रीय स्तर पर ओबीसी उम्मीदवारोने बेहतर प्रदर्शन किया है। इसके बावजूद ओबीसी छात्रोंं को राष्ट्रीय स्तरपर केवल ६८ सीटे आरक्षित कर उन्हे मेडिकल शिक्षा से वंचित किया जा रहा है।
राष्ट्रीय स्तरपर ओबीसी समाज को २७ फीसदी, अनुसूचित जाती को १५ फीसदी एवम अनुसूचित जमातीको ७.५ फीसदी आरक्षण का प्रावधान है। इस प्रवेश प्रक्रिया अंतर्गत राष्ट्रीय स्तर पर १५ प्रतिशत आरक्षण लागू कर ९ हजार ५७५ जगह आरक्षित है। ओबीसी प्रवेशार्थीयो का लिए २ हजार ५२५ सीटोपर अधिकार होने के बावजूद उन्हे २ प्रतिशतसे कम आरक्षण दिया गया। ज्ञात रहे, राष्ट्रीय स्तरपर दिये गए १५ प्रतिशत आरक्षण मे तेलंगाणा, आंध्रप्रदेश एवम जम्मू कश्मिर राज्यों का समावेश नही है। यह आरक्षण संबंधी नियम एवम गाईडलाइन्स का सरासर उल्लंघन है।
मा. सर्वोच्च न्यायालय द्वारा  ०४ अप्रेल २००७ के निर्णयानुसार ओबीसी का आरक्षण २७ प्रतिशत से कम नही किया जा सकता। किंतु, मेडिकल कॉन्सील ने सारे नियमोंको ताकपर रख ओबीसी प्रवेशार्थियोंको मेडिकल शिक्षा प्राप्तीसे वंचित रखने का षडयंत्र रचा है। 
इस आपत्तीजनक प्रवेश प्रक्रिया का पुनर्विचार कर ओबीसी को उनके हक का २७ फीसदी आरक्षण अनुसार २ हजार ५२५ सीटे मुहैय्या कराई जाय, अन्यथा महासंघ द्वारा तीव्र आंदोलन की चेतावणी सरकार को दी गई।
मंत्रिमहोदयद्वय अहिर एवम आठवले इन्होने प्रतिनिधी मंडल को चर्चा पश्चात उचित कार्यवाही का भरोसा दिलाया है।



Wednesday 19 July 2017

धर्म सोडा किंवा शिक्षा भोगा! चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा सदस्यांना इशारा



बिजींग, दि. 19 - चीनमधल्या कम्युनिस्ट पार्टीच्या सदस्यांना पक्षातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी आपला धर्म सोडावा लागणार आहे. चीनमधले मार्क्सवादी नास्तिक असून ईश्वराला मानत नाहीत. धर्म सोडा किंवा शिक्षा भोगा असे चीनमधल्या धार्मिक बाबींचे नियमन करणा-या सरकारी विभागाने सांगितले आहे. ग्लोबल टाइम्समध्ये यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. 
 
चायनीस कम्युनिस्ट पार्टी ईश्वराला मानत नाही. पण चीनच्या संविधानाने धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. पक्ष सदस्यांनी कुठल्याही धर्माचे पालन करु नये असे वँग झ्युओअॅन यांनी म्हटले आहे.  ते धार्मिक विषयांवरील प्रशासकीय समितीचे संचालक आहेत. 
 
वँग यांचे विचार पक्षाच्या नियमांना धरुन आहेत. चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या धोरणानुसार त्यांच्या 9 कोटी सदस्यांना कुठल्याही धर्मावर विश्वास ठेवण्यास मनाई आहे. धार्मिक संघटनेशी संबंधित असलेल्या सदस्यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी अनेकदा करण्यात आली आहे. वँग यांनी त्याच नियमांची आठवण करुन दिली आहे. 

अहो साहेब! गवळीटोलावासींना पाणी पाजणार का?

पावसाचे पाणी गोळा करून तहान भागवतात नागरिक


चिचगड,१९(प्रतिनिधी)- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाèया वांढरा ग्रामपंचायतीतील गवळीटोला येथे गेल्या तीन चार महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाई असून गावकèयांच्या विनवणीला प्रशासन नेहमी हुलकावणी देत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पावसाळा सुरू झाल्याने गावकरी घराच्या छपराचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, अहो साहेब! आम्हाला पाणी पाजणार का?असा आर्त प्रश्न प्रशासनाला केला आहे. दरम्यान, देवरीचे गटविकास अधिकारी हिरुडकर यांनी तत्काळ व्यवस्था करीत असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.
सविस्तर असे की, देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वांढरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे ४० घरांची वस्ती असलेल्या गवळीटोला या आदिवासी खेड्याचा समावेश होतो. या गावात पिण्याच्या पाण्यासाठी तीन हातपंप व २ विहिरींची सोय करण्यात आली आहे. गावातील तीनही हातपंप गेल्या तीनचार महिन्यापासून बंद आहेत आणि विहिरीमध्ये पाण्याचा टिपूस सुद्धा नाही. हातपंपाच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी सरपंच सुरेंद्र वारई आणि सचिव कढव यांना वारंवार केविलवाणी विनंती केली. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाला गावकèयांची कीव आली नसल्याचे गावकèयांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय म्हणजे जलस्वराज योजनेतून नळाद्वारे पाणीपुरवठ्याची असलेली सोय ही पांढरा हत्ती ठरली आहे. उन्हाळ्यात सुमारे दोन किलोमीटर अंतरावरून महिला पाण्यासाठी पायपीट करून कुटुंबीयांची तहान  भागवीत होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने गावकरी ४-४ दिवस आंघोळीविना दिवस काढल्याचे आनंदाबाई अत्तरगडे, सरिपा तिरगम, तारा तिरगम, प्रतिमा नाटके, अंतकला फqटग, मंदा तिरगम, मनुका लोहंबरे, सिंधू फटिंग, हरिती तिरगम, टुकचंद तिरगम आणि दादाजी तिरगम या ग्रामसमस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, देवरीचे गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर यांचेशी संपर्क केला असता त्यांनी तत्काल हातपंप दुरुस्तीची व्यवस्था करीत असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.

केंद्रस्तरिय पहिली शिक्षण परिषद सम्पन्न

विषय शाळा सिद्धी
सावलीच्या शिक्षण परिषदेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना विषयतज्ज्ञ डी.टी.कावळे
देवरी,19- देवरी पंचायच समिती अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव केंद्रातील  जि.प.व.प्राथ. शाळा सावली येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद मोठ्या उत्साहात  पार पडली.
यावेळी  देवरीचे गटशिक्षणाधिकारी यांची प्रमुख उपस्थितीत होती. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत शाळा सिद्धी मूल्यमापनाद्वारे  केंद्रातील सर्व शाळा अ श्रेणीत आणण्यासाठी करावयाचे प्रयत्न व त्यासाठी लागणारे पुरावे यासंबंधाने श्री शेंडे सर केंद्र प्रमुख व श्री कावळे सर विषयतज्ज्ञ देवरी यानी सखोल मार्गदर्शन केले.
 या परिषदेला गट साधन केंद्र देवरी चे विषयतज्ज्ञ श्री भरणे , श्री मस्के व श्री वलथरे आदी कर्मचारी उपस्थित होते.

Berartimes 19-25 Jul 2017





देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...