Tuesday 18 July 2017

लैंगिक अत्याचारप्रकरणी रोहित टिळकवर गुन्हा दाखल


Rohit Tilak

पुणे,दि.18 - लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून रोहित दीपक टिळक (वय 38, रा. केसरीवाडा, नारायण पेठ) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका महिलेने (वय 41) फिर्याद दिली. त्यानुसार लग्नाचे आमिष दाखवून मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. तसेच, लग्नाची मागणी केल्यानंतर टिळक याने शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. रोहित टिळक याने 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते गिरीश बापट यांच्याविरोधात लढलेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. 
रोहित टिळक हा लोकमान्य बाळ गंगाधर टीळकांचा पणतु, तसेच विधान परिषदेचे माजी सभापती जयंतराव टीळकांचा नातू व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु दिपक टिळक यांचा मुलगा आहे. रोहीतवर भारतीय दंड विधान ३७६, ३७७, ३२३, ५०४, ५०६, ५०७ कलमां अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...