Friday 28 July 2017

आश्रमशाळेतील विद्यार्थींनीची विहिरीत उडी मारून आत्महत्या


सालेकसा,दि.२८ : तालुक्यातील पिपरीया येथील कचारगढ आदिवासी आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थीनीने विहीरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना आज २८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. मृतक मुलीचे नाव मनिषा सोमलाल कोंबे (१६) असे आहे.
सविस्तर असे, मनिषा कोंबे ही कचारगढ आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता दहावीची विद्यार्थीनी असून ती जवळच असलेल्या नवागढ येथील रहिवासी असून निवासी स्वरूपात या आश्रमशाळेत राहत होती. आज ९.३० वाजता आश्रमशाळेतील सर्व मुले मुले-मुली जेवण करीत असताना मनिषा अधीक्षकांना आढळून आली नाही. तेव्हा अधीक्षकांनी नवागढ येथील तिच्या घरी जावून ती आल्याची चौकशी केली असता,आढळून आली नाही. तेव्हा विद्यार्थी व अक्षिक्षकांनी शोधाशोध सुरू केली.तेव्हा मनिषा शाळेपासून काही अंतरावर असलेल्या विहीरीजवळ आढळून आली. विद्यार्थींनीनी समोर जावू नको तिकडे विहीर आहे असे म्हणत असतानाच तिने विहीरीत उडी घेतली.पोलीसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.विद्याथ्र्यांना अंघोळीसाठी नदी, ओढ्यावर पाठवू नये, आश्रमशाळा अथवा वसतिगृहातील स्नानगृहे व शौचालये स्वच्छ राहतील तसेच विद्यार्थी त्याचा वापर करतील हे मुख्याध्यापक व अधीक्षकांनी पाहणे, सकाळी ७ ते आठच्या सुमारास न्याहारी, दुपारी एक ते दीड या वेळेत जेवण आदी दक्षता घेण्याचा सूचना प्रशासकीय पातळीवर केल्या जातात. तरीसुद्धा मनिषावर आश्रमशाबाहेर जाण्याची का पाळी आली अशी शंका बळावत असून या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तर ती आश्रमशाळेबाहेर गेली नसावी अशा शंकाना पेव पुâटले असून सध्यातरी मनिाच्या मृत्यूचे कारण गुलदस्त्यात असून पोलीस तपासात हे स्पष्ट होणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...