Tuesday 25 July 2017

..आणि उदयनराजेंना पोलिसांनीच मारली मिठी


 सातारा,दि.25 - खंडणीचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले स्वत:ला अटक करून घेण्यासाठी पोलिस ठाण्यात आले असता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्यांना चक्क मिठी मारल्या प्रकार आज घडला. खंडणीचा गंभीर गुन्हा असताना भोसलेंना पोलिसांनी व्हीआयपी ट्रिटमेंट दिल्याचे आश्चर्य आहे. परिणामी, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे. एका आरोपीला अटक करण्याचे सोडून चक्क मिठी मारल्याने आरोपीला काय अटक होणार? आणि उदयनराजेंना इतर सामान्य आरोपींसारखी वागणूक मिळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खंडणीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने उदयनराजे भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे वाढत्या दबावामुळे उदयनराजे स्वत:ला अटक करून घेण्यासाठी सातारा पोलीस ठाण्यात आले. उदयनराजेंना इतर आरोपींप्रमाणेच वागणूक मिळेल अशी अपेक्षा असताना या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने त्यांना चक्क मिठी मारली. त्यांचं स्वागत करून त्यांना बसायला खुर्चीही दिली. उदयनराजे अवघे पाचच मिनिटं पोलीस ठाण्यात थांबले. त्यानंतर बाहेर पडले आणि पुन्हा पोलीस ठाण्यात दाखल झाले. नंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. दुपारनंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलं.
दरम्यान, उदयनराजे यांना पोलिसांनी दिलेल्या व्हिआयपी ट्रिटमेंटवर टीका होत आहे. पोलिसांनी आरोपींची गळाभेट घेणे कितपत योग्य आहे? इतर आरोपींना पोलीस अधिकारी अशीच वागणूक देतील काय? उदयनराजेंवर सामाजिक आरोप असते तर वेगळी गोष्ट होती, हे तर गंभीर आरोप आहेत, असं असताना पोलिसांना असं वागणं शोभतं का? असे सवालही यावेळी उपस्थित केले जात आहेत. काही लोकांनी तर अशा पोलीस अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्याची मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...