Saturday 8 July 2017

दहशतवादी हल्ल्यात 2 जवान जखमी


श्रीनगर, दि. 8 – जम्मू-कश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी भारतीय लष्करातील सैनिकांवर हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहे. हा हल्ला बांदीपोरामधील हाजिन परिसरात झाला आहे. हल्ल्यानंतर तातडीनं जवानांकडून परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, भारतीय सुरक्षा दलानं हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला कंठस्नान घातल्याच्या घटनेला आज (8 जुलै) एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीर खो-यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काश्मीर खो-यात 20 हजारहून अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...