Thursday 13 July 2017

करचोरीवर केंद्र सरकारची करडी नजर, छोट्या शहरे आहेत टप्प्यात

केंद्र सरकारची इन्कम टॅक्‍स न देणाऱ्यांवर नजर, करवाढीसाठी छोट्या शहरांवरही फोकस वाढवणार
नवी दिल्ली,दि.13केंद्र सरकार आता करपात्र लोकांची नोंद करणार आहे.  कर चुकवणाऱ्या लोंकासाठी सरकार खासकरून लहान शहरांवर फोकस करणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्रादेशिक प्राप्तिकर प्रमुखांना एक पत्र पाठवले आहे. य पत्रामध्ये अशा प्रकारच्या लोकांच्या नोंदी करण्याविषयी सांगण्यात आले आहे.
आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये टॅक्स बेस वाढवण्यावर जोर
- सीबीडीटी चेअरमन सुशील चंद्रा यांनी प्रादेशिक प्राप्तिकर प्रमुखांना पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये टॅक्स बेस वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न करावा. तथापि, गत आर्थिक वर्षात नव्याने 91 लाख करदात्यांचा कराच्या परिघात समावेश झाला आहे.
संभावित करदात्यांना शोधणे आता सोपे
- चंद्रा यांनी पत्रात म्हटले की, नोटबंदी आणि ऑपरेशन क्लीन मनीनुसार इन्कम टॅक्स विभागाची डाटा माइनिंग आणि डाटा अॅनालिसिसमुळे संभावित करदात्यांनो ओळखणे आता सोपे झाले आहे. टॅक्स बेस वाढवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. त्याचे खूप चांगले परिणाम समोर येत आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...