Sunday 16 July 2017

13 कोटी नागरिकांना पुराचा धोका...



मनिला,दि.16- (वृत्तसंस्था)- या शतकाच्या अखेरपर्यंत भारत आणि पाकिस्तानसह बांगलादेशमध्ये किनारपट्टीलगतच्या भागात राहणारे तब्बल 13 कोटी नागरिक पुरामुळे विस्थापित होण्याचा धोका एका पाहणी अहवालाद्वारे वर्तविण्यात आला आहे.
दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा एशिया-पॅसिफिक प्रांतातील वीस शहरांना मोठा फटका बसणार असल्याचे एशियन डेव्हलपमेंट बॅंक (एडीबी) व पॉट्‌सडम इन्स्टिट्यूट फॉर क्‍लायमेट इम्पॅक्‍ट रिसर्चने (पीआयके) आपल्या अहवालात म्हटले आहे. या शहरांत भारतातील मुंबई, चेन्नई, सुरत, कोलकातासह 13 शहरांचा समावेश आहे. 2050 पर्यंत या शहरांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागेल, असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे.
संभाव्य पूरस्थितीचा फटका अंदाजे चार अब्ज नागरिकांना बसेल. तसेच त्याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाल्याचेही दिसून येईल, असे अहवालात म्हटले असून, तापमानवाढीमुळे वातावरणात कमालीचे बदल अनुभवास येतील. कृषी, मत्स्य व्यवसाय, व्यापार, शहरी विकास, आरोग्य, तसेच सागरी जैवविविधता यांमध्ये हे बदल घडतील, असे अहवालात नमूद आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...