गोंदिया,दि.12- पत्नीला माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावणाऱ्या पतीने मुलीच्या भेटीसाठी आलेल्या सासूसासऱ्यासह पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला चढवून तिघांना जखमी केल्याची घटना सडक अर्जुनी तालु्नयातील पांढरी येथे १० जुलै रोजी सकाळी ८.३० वाजता सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपीचे नाव वसंता पटले (३२) रा.पांढरी असे असून जखमींमध्ये पत्नी त्रिवेणी पटले रा.पांढरी, सासू राधिका राणे, सासरा मार्कंड राणे दोन्ही रा.कमरगाव यांचा समावेश आहे.गोरेगाव तालु्क्यातील कमरगाव येथील मार्कंड राणे यांच्या मुलीचे लग्न पांढरी येथील वसंता रामलाल पटले याच्याशी पार पडला. सुरवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर वसंताने पत्नीला माहेरून पैसे आण या कारणावरून त्रास देणे सुरू केले. अशातच मुलीच्या भेटीला मार्कंडराणे व त्यांची पत्नी राधिका हे दोघेही पांढरीला गेले. या दोघांच्या समक्ष वसंताने पैशांच्या कारणावरून वाद निर्माण केला. वाद ऐवढा विकोपाला गेला, की वसंताने सरळ चाकूने तिघांवरही प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर डुग्गीपार पोलिस जखमींचे बयान नोंदविण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाले होते. तर दुसरीकडे वृत्तलिहेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. या घटनेने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...
-
गोंदिया : ओबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळू शकल्याने व शहरात राहण्याची इतर सोय नसल्याने शिक्षणापासून वंचि...
-
तिरोडा,दि.४ मेः-भारतीय जनता पक्षाच्यावतीने तिरोडा येथे लोकसभा पोटनिवडणुकीला घेऊन कार्यकर्ता मेळावा व जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राज्या...
No comments:
Post a Comment