Monday, 3 July 2017

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज- प्राचार्या भोयर


लिटील फ्लावर शाळा लाखनी येथे वृक्ष लागवड कार्यक्रम


लाखनी,दि.1 -पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज आहे. हे संतुलन बिघडू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन लिटिल फ्लाॅवर शाळेच्या प्राचार्या कल्पना भोयर यांनी केले.
      दि. 1 जुलै रोजी 4 कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत लाखनी येथील लिटील फ्लाॅवर शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. आपण सर्व शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन माननीय प्राचार्यांनी याप्रसंगी केले.
      वृक्षारोपणप्रसंगी सहा.शिक्षक प्रशांत वाघाये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पर्यवेक्षक आशीष बडगे, शिक्षकवृंद विशाल हटवार, दामोधर गिरेपुंजे, देवीदास नान्हे, अल्का खटके, वर्षा बांते, आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...