
सविस्तर असे की, गेल्या 1 तारखेपासून देशात मतदार नोंदणी अभियानाला सुरवात झाली आहे. या अभियानाची अमलबजावणी देवरी तालुक्यात उत्तमप्रकारे व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता युवामोर्चा आणि भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने मतदार नोंदणी उपक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये आज मंगळवारला स्थानिक दुर्गा चौक, 26 तारखेला संजय नगर, मोठा नळ शारदा मंदीर आणि 27 तारखेला गणेश चौकात मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.
तरी नागरिकांनी या नोंदणी शिबिरांमध्ये जास्तीत जास्त संख्येने मतदार नोंदणी करण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, सविता पुराम, राजेश चांदेवार, इंद्रजीत भाटीया, अनिता चन्ने, यादोराव पंचमवार, राजू शाहू, कुलदीप लांजेवार, नूतम सयाम, माजीद खान, इमरान खान, पवन गुप्ता, शोभा शेंडे, सरिता डुंभरे, रचना उजवणे, प्रशांत काळे आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment