Wednesday 12 July 2017

मग्रारोहयोतील कंत्राटी अभियंत्यांच्या बदल्या कधी होणार

गोंदिया,दि.१२-ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो विभागामार्फत केंद्र सरकारची महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. या योजनेतील तांत्रिक बाबी हाताळण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कंत्राटी अभियंत्यांची नेमणूक केली जाते. अशा कंत्राटी अभियंत्यांना एकाच ठिकाणी दीर्घकाळ ठेवता येत नसल्याच्या सरकारचा आदेश आहे. असे असताना शासकीय आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून या अभियंत्यांच्या बदल्या रोखून धरत भ्रष्टाचाराच्या राक्षसाला खतपाणी घालण्याचे काम होत असल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळत आहे.
केंद्र सरकार अनुदानावर चालविण्यात येणाèया मनरेगा योजनेमध्ये तांत्रिक कामे करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून कंत्राटी अभियंत्यासह इतरही पदे भरली गेली आहेत. ही पदे कंत्राटी स्वरूपातील असली तरी या कर्मचाèयांना एकाच ठिकाणी अधिक काळ कार्यरत न ठेवता त्यांच्या बदल्या इतर ठिकाणी करण्याच्या राज्य सरकारच्या सूचना आहेत. नियोजन विभागाचे उपसचिव प्रमोद qशदे यांनी १० एप्रिल २०१७ रोजी सर्व जिल्हाधिकारी, सीईओ व जिल्हा कार्यक्रम समन्वयकाला तसे पत्र दिले आहे. परंतु, या पत्राला ४ महिन्याचा कालावधी लोटूनही गोंदियासह राज्यातील एकाही जिल्हाधिकारी कार्यालयाने या पत्राला केराची टोपली दाखविल्याचे समोर आले आहे. या संदर्भात मंत्रालयातील उपसचिवांच्या कार्यालयातील रोहयो शाखेत संपर्क करून विचारणा केल्यावर जिल्हाधिकारी व रोहयो उपजिल्हाधिकारी यांना त्यांच्याच पातळीवर बदल्या करण्याचे अधिकार दिल्याचे सांगितले गेले. गोंदिया जिल्ह्याचा विचार केल्यास २००७-०८ पासून ते तीन एनजीओच्या माध्यमातून कंत्राटी अभियंत्यांची भरती करून पंचायत समिती स्तरावर नियुक्त करण्यात आले. यामध्ये जे बेरोजगार अभियंते कंत्राटी अभियंते म्हणून रुजू झाले, त्यांना बेरोजगार अभियंत्यांचे नोंदणी असलेली कामे करता येत नाही. परंतु, गोरेगाव पंचायत समितीअंतर्गत कार्यरत तांत्रिक अभियंता विजय रहांगडाले यांनी कंत्राटी अभियंत्याच्या नोकरीसह खासगी कंत्राटाची कामे अधिकाèयांच्या संगनमताने बिनधास्तपणे करण्यास सुरवात केली आहे. या अभियंत्याच्या अनेक तक्रारी असतानाही गोरेगाव पंचायत समितीचे स्थानिक पदाधिकारी, मग्रारोहयोचे अधिकारी यांनी चिरीमिरी घेऊन रहांगडालेंना अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याची चर्चा आहे. एकाच पंचायत समितीमध्ये ७ ते ८ वर्षापासून हे कंत्राटी अभियंते कार्यरत असल्याने त्यांचे हितसंबंध स्थानिक नेत्यांशी व कंत्राटदारांशी जोडले गेल्याने गैरव्यवहाराची चांगलाच बोकाळला आहे. त्यामुळे पंचायत समिती स्तरावर या कंत्राटी अभियंत्यासह कृषी तांत्रिक अधिकारी यांच्या बदल्या ३१ जुलै रोजी संपत असलेल्या कार्यकाळापूर्वी जिल्हाधिकारी करणार की चिरीमिरी घेऊन गप्प बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत २००७ पासून हेमंत बघेले, २००८ पासून विजय रहांगडाले, २०११ पासून प्रवीण खरवडे व तांत्रिक अभियंते म्हणून तर २००८ पासून विजय पटले व भगत कृषी तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आमगाव पंचायत समिती अंतर्गत २००९ पासून पृथ्वीराज टेंभुर्णेकर व २०१० पासून बोरकर तांत्रिक अभियंता म्हणून तर २००९ पासून देवचंद ठाकरे, २०१० पासून हरिणखेडे कृषी तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. देवरी पंचायत समिती अंतर्गत २००८ पासून संजय डोये, २०१० पासून सुधीर वाघमारे व मनोज बोपचे हे कृषी तांत्रिक अधिकारी म्हणून तर जगदीश रहांगडाले २०११ पासून व घनश्याम पारधी २०१२ पासून तांत्रिक अभियंता तर गौतम साखरे २०१३ पासून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मोरगाव अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत २०११ पासून श्री गणवीर २०१२ पासून राजेश रहांगडाले व बोपचे व श्रीमती बडोले तांत्रिक अधिकारी म्हणून तर २०१० पासून डेवीड बडोले व २०११ पासून पुरुषोत्तम बावणकर कृषी तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे गोंदिया पंचायत समिती अंतर्गत २०१० पासून लिल्हारे, २०११ पासून खोमेंद्र टेंभरे व २०१२ पासून विनोद धावडे तांत्रिक अधिकारी सिवील म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे सडक अर्जुनी, तिरोडा व सालेकसा पंचायत समितीमध्ये सुद्धा २०१० पासून तांत्रिक अधिकारी व कृषी तांत्रिक अधिकारी एकाच ठिकाणी चार ते पाच वर्षापासून कार्यरत आहेत. जेव्हा की शासनाचे धोरण दर तीन वर्षानी बदली करण्याचे आहेत. तीन वर्षानी बदली करण्याचे धोरण असताना मग्रारोहयोच्या अधिकाèयांनी या कंत्राटी अभियंत्यांना सहा ते सात वर्षापासून एकाच ठिकाणी कार्यरत ठेवण्यामागचे धोरण काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर जे कर्मचारी बदलीसाठी डोळे लावून बसले आहेत त्यांना जिल्हाधिकारी न्याय देणार की डोळ्यावर पट्टी बांधून आंधळ्याची भूमिका निभावणार? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...