Saturday 8 July 2017

ही हिंसा ‘आमच्या नावाने नको’-विविध संघटनांनी नोंदविला निषेध


नागपूर,दि.08 : गोरक्षणाच्या नावावर हिंसक झालेल्या जमावाद्वारे हिंसाचार वाढला आहे. अखलाखपासून नुकत्याच झालेल्या जुनैदच्या हत्येपर्यंत घडलेल्या हिंसाचारामुळे विशिष्ट समुदायांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मंदिर-मशीदच्या नावावर, कधी जाती-धर्माच्या आणि गोरक्षणाच्या नावावर होणारा हिंसाचार देशातील शांतता नष्ट करीत आहे. हा हिंसाचार ‘आमच्या नावावर करू नका’ असे संदेश देत विविध संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी संविधान चौकात निषेध नोंदविला.
‘नॉट इन माय नेम’ ही मोहीम सध्या देशभरात जोर धरत आहे. गोरक्षणाच्या नावावर अचानक कुठेतरी आग भडकते आणि शेकडो, हजारोंच्या संख्येने असलेल्या जमावाद्वारे विशिष्ट समुदायाच्या लोकांना लक्ष्य केले जाते. अखलाखपासून जुनैदपर्यंत अनेकजण या हिंसाचाराचे बळी ठरले असून हा भीतीदायक प्रकार लोकतांत्रिक देशात अशांतता पसरवित आहे. द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांकडून असे भडकविण्याचे काम केले जात असून या हिंसाचाराविरोधात राष्ट्रव्यापी आवाज उठत आहेत. याच मोहिमेंतर्गत संविधान चौकात जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी या हिंसाचाराविरोधात निषेध नोंदविला. या निषेध आंदोलनात जमाअत-ए- इस्लामी हिंद, वेलफेअर पार्टी आॅफ इंडिया, भारत मुक्ती मोर्चा, मुव्हमेंट फॉर पीस अ‍ॅन्ड जस्टीस, इंडिया पीस सेंटर, मराठा सेवा संघ, जमियत-उलेमा-ए-हिंद, एमपीजे, बामसेफ, स्टुडंट्स इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडिया, सेंटर फॉर सोशल रिसर्च अ‍ॅन्ड एम्पॉवरमेंट, संविधान फाऊंडेशन, संभाजी ब्रिगेड, निळाई, लोकशाही संरक्षण समिती, भारिप बहुजन महासंघ, असोसिएशन फॉर प्रोटेक्शन आॅफ सिव्हील राईट्स आदी संघटनांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...