Sunday 30 July 2017

युद्धासाठी तयार राहा - चिनी राष्ट्रपती


नवी दिल्ली, दि. 30 - पीपल्स लिबरेशन आर्मीला 90 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त साधून चीनने आज लष्करी सामर्थ्याचं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी युद्धासाठी तयार राहा, असा आदेशच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लष्कराला दिला. त्यामुळे आगामी काळात भारत-चीन दरम्यान युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. 1 ऑगस्ट रोजी चीनचा आर्मी डे असतो. मात्र, आर्मी डेच्या दोन दिवस आधीच लष्करी सामर्थ्याची परेड करण्याची १९४९च्या कम्युनिस्ट आंदोलनानंतरची ही पहिलीच वेळ आहे.
भारत- चीनमध्ये सिक्कीमधल्या डोकलाम भूभागावरून महिन्याभरापासून तणाव निर्माण झालाय. ब्रिक्स देशांच्या परिषदेनिमित्त भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे चीन दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली होती. दोन्ही देशांमधील डोकलामचा वाद सोडवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांनाही यश आलं नाही. त्याउलट डोवाल भारतात परतल्यानंतर जिनपिंग यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका केली आहे. 
ते म्हणाले, सैन्याने नेहमीच युद्धास तयार असायला हवे. देशाचे सैन्य जगातलं सर्वात शक्तिशाली सैन्य म्हणून समोर येण्यासाठी सैनिकांनी स्वतःला तयार केले पाहिजे. चिनी सैन्य युद्धात शत्रूंचा पराभव करण्यासाठी सक्षम आहे. या कार्यक्रम सोहळ्याला जिनपिंग सैनिकांच्या पेहरावात आले होते. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...