Tuesday 18 July 2017

क्रिकेटपटू उमेश यादवच्या घरी चोरी


Umeshkumar Tilak Yadav

 नागपूर,दि.18-भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरात चोरी झाली असून चोरट्यांनी ४५ हजार रुपयांच्या रकमेसह एक मोबाईल लंपास केला आहे. ही घटना नागपुरामधील शंकरनगर भागात घडली.
उच्चभ्रू वस्ती अशी ओळख असलेल्या शंकरनगरमध्ये उमेश यादवचे घर आहे. चोरट्यांनी चोरी केली त्यावेळी उमेश यादव हा नागपूर शहरातच होता परंतु कुटुंबासोबत पार्टीसाठी तो घराबाहेर होता. घरात कोणी नाही, ही संधी साधून चोरट्यांनी सोमवारी संध्याकाळी चोरीचा डाव साधला. उमेश यादव हा पार्टी करून घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतनर त्याने पोलीस स्टेशनमध्ये जावून रितसर चोरीची तक्रार दाखल केली. घरात ठेवलेले ४५ हजार आणि एक फोन चोरट्यांनी लंपास केल्याचे उमेश यादवने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
नागपूर शहरातील उच्चभ्रू वस्ती तसेच भारतीय संघाचा क्रिकेटपटू उमेश यादवच्या घरात चोरी झाल्याने नागपूर शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून नागपूर शहरात चोरी, हाणामारी, विनयभंग, हत्या यासारख्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...