Friday 14 July 2017

खा.अशोक नेते यांची भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती



गडचिरोली,दि.१४: भाजपचे जिल्हाध्यक्ष व गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांची भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामविचार नैताम यांनी खा.नेते यांची नियुक्ती केली आहे.
भाजपच्या अनुसूचित मोर्चाचे वजनदार नेते म्हणून ओळख असलेल्या अशोक नेते यांनी भाजपमध्ये अनेक महत्वाची पदे भूषविली आहेत. १९९१ ते ९४ या कालावधीत श्री.नेते हे भाजयुमोचे तालुकाध्यक्ष होते. १९९४ ते ९७ पर्यंत भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्षपद त्यांनी सांभाळले. त्यानंतर १९९७ ते ९९ अशी दोन वर्षे त्यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम केले. १९९९ मध्ये अशोक नेते यांची भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाचे राज्य सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे २००१ मध्ये भाजपचे राज्य सचिव म्हणून पक्षाने त्यांना मानाचे स्थान दिले. २००६ ते २००९ या कालावधीत ते अनुसूचित जमाती मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य झाले. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने २००९ मध्ये श्री.नेते यांच्याकडे पक्षाने अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविली होती.आता पक्षाने त्यांची अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...