Friday 14 July 2017

अर्धापूर वळण रस्त्याची फेरचौकशी सुरू

अर्धापूर (नांदेड)दि.14-  नांदेड- नागपूर महामार्ग अर्धापूर वळण रस्त्याच्या  निकृष्ट कामाच्या  तक्रारीची शासनाने गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. श्री.चामकुरे यांनी केलेल्या चौकशीविरुद्ध नागरिकांच्या तक्रारी असल्याने त्या कामाच्या फेर चौकशीची मागणी होती. यामुळे नाशिक गुणनियंत्रक विभागाचे अधीक्षक अभियंता  एस.एस.पाटील व त्यांच्या पथकानी बुधवारी  पाहणी केली आहे. रस्ता अतिशय निकृष्ठ झाला असून पाटील यांच्या अहवालानंतर संबधित कंत्राटदारासह अभियंत्यांवर सदर प्रकरण शेकण्याची दाट शक्यता आहे.

   नांदेड नागपूर महामार्ग  अर्धापूर शहरमधून जात असल्याने अनेक अपघात व वाहतुकीस अडथळा होत होता. यासाठी शहरातील नागरिकांनी वळण रस्ता करण्याची मागणी केली होती .शहरवासीयांच्या मागणीनुसार  केंद्र सरकारच्या केन्द्रीय रस्ता विकास निधी अंतर्गत २० कोटी केंद्र, व राज्य शासनाचा साडे तीन  कोटी रूपये खर्च करून सहा कि.मी. वळण रस्त्याचे काम मुदतीत होणे अपेक्षित होते. मात्र, सदर काम वेळेत पूर्ण करण्यात आले नाही. कामाला मुदत वाढ सुद्धा देण्यात आली.  त्यात मूळ प्रोव्हिजनपैकी काहीही विशेष तरतूद नसताना नियम डावलून  राज्य शासनाचा साडे तीन कोटीचा निधी दिला. मात्र, कामाचे निकष पायदळी तुडवत रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा करण्यात आला. एक फुटापेक्षाही कमी मजबुतीकरण आहे. सदर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग असून नेहमी जड वाहनाची वर्दळ असते. वाईट अवस्था झाल्याने या मार्गावर अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांना आपल्या प्राणास मुकावे लागले तर अनेकांना अपंगत्व आले आहे. परिणामी, या कामाच्या चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याची मागणी मुख्यमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री व वरिष्ठ अधिकार्‍यांकडे करून पाठपुरावा केला. या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेउन चौकशीचे आदेश दिले.या मुळे कांही दिवसापूर्वी गुणनियंत्रक अधीक्षक अभियंता मुंबई चामकुरे यांनीश चौकशी केली. पण चौकशीत घोळ करून सदोष अहवाल दिला गेला. या गैरप्रकारात संबंधितांना वाचविण्यात सहकार्य केले, अशी तक्रार करण्यात आली. या तक्रारीची गंभीर दखल घेत नाशिक गुणनियंत्रक विभागाचे अधिक्षक अभियंता एस.एस.पाटील यांची नेमणूक केली. श्री पाटील यांच्या पथकाने गुरूवार दि.१३ रोजी महामार्गावर अनेक ठिकाणी पहाणी केली.यावेळी पत्रकार व नागरीक उपस्थित होते पहाणीत रस्ता निकृष्ठ आसल्याचे आढळून आले आसल्याने आता पाटील यांच्या अहवालानंतरच संबधितावर कार्यवाही होणार आहे.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...