Sunday 16 July 2017

नागपुरातील भाजप महामंत्र्याच्या बारमध्ये पोलिसांचा छापा



नागपूर, दि. 16 -  'बाहेर टाळा आणि आत घोटाळा' याप्रमाणे  नागपुरातील मानेवाडा परिसरात असलेल्या एका बिअर बारवर पोलिसांनी शनिवारी रात्री छापा घातला. सदर बिअर बार हा दक्षिण नागपूरचे भाजपचे महामंत्री विलास करांगळे यांच्या मालकीचे आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बार मालकांसर मद्यशौकिनांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई  सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांनी स्वत: केली आहे
मानेवाडा रिंग रोड चौकात एस.के. बियर बार आहे. विलास मानिकराव करांगळे हे या बारचे मालक असून ते भाजपा दक्षीण नागपूरचे महामंत्री आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील महामार्गापासून ५०० मिटर आत असलेल्या बियर बारमध्ये मद्य विक्रीला बंदी आहे. यामुळे उपराजधानीतील महामार्गालतच्या अनेक बियर बारला राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील लावले. असे असतानाही उपराजधानीतील कायद्याला वाकुल्या दाखवत बारमालकांनी मुजोरी सुरूच होती. मानेवाड्यातील एस. के. बारमध्ये अशाच प्रकारे ग्राहकांना मद्य विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दोन दिवस शहानिशा केल्यानंतर गुन्हे शाखेचे एसीपी वाघचौरे यांनी आपल्या पथकासह शनिवारी रात्री साडेआठच्या दरम्यान या बारमध्ये छापा घातला. यावेळी तेथे रेस्टॉरंटच्या नावाखाली ग्राहकांना मद्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पोलिसांना आढळले. हा बार भाजपा पदाधिका-याचा असल्याची कल्पना असल्यामुळे पोलिसांनी संपूर्ण कारवाईचा व्हीडिओ तयार केला आहे.
असे सुरु होते व्यवहार
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारमध्ये ठेवलेली दारू एका खोलीत ठेवून त्या खोलीला सील केले होते. बारमालकाने त्या सीलमधून एक असे छिद्र केले की ते चावी लावून कुलूप उघडता येत होते. या रूममध्ये नियमित मद्य ठेवून आणि तेथील मद्य काढून ते ग्राहकांना विकले जात होते. 

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...