Friday 14 July 2017

आधार क्रमांक मागून ६५ हजार लंपास

तुमसर,दि.14-‘तुमचा एटीएम बंद होईल, त्याकरिता आधार क्रमांक तात्काळ सांगा’ असा भ्रमणध्वनीवरून संदेश आला. आधार क्रमांक सांगितल्यावर बचत खात्यातून सातवेळा ६५ हजार रुपयांची रक्कम लांबविण्यात आल्याचा प्रकार येरली येथील विनोद शालीकराम पटले यांच्यासोबत घडला. याप्रकरणी त्यांनी तुमसर पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली असून स्थानिक सेंट्रल बँकेतही लेखी तक्रार दाखल केली आहे.
येरली येथील रहिवासी विनोद पटले व पत्नीच्या नावे तुमसर सेंट्रल बँकेच्या शाखेत एकत्रित खाते आहे. ८ जुलै रोजी पटले यांना दुपारी २ वाजताच्या सुमारास भ्रमणध्वनी क्रमांक ९७0९८१८७१७ वरून फोन आला. मी बँकेतून बोलत आहे, असे सांगून ‘तुमचा एटीएम बंद होईल त्याकरिता तुमचा आधार क्रमांक सांगा’ असा फोन आला. एटीएम बंद होईल, या भीतीने पटले यांनी संबंधिताला आधार क्रमांक सांगितला. त्यानंतर विनोद पटले यांच्या भ्रमणध्वनीवर ६५ हजार रुपये डेबीट झाल्याचा मॅसेज आला. १0 जुलै रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया तुमसर शाखेत पासबुकची प्रिंट केली. त्यात ६५ हजार रुपए कमी दाखविण्यात आले. यात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विनोद पटले यांनी तुमसर पोलीस ठाण्यात व स्थानिक सेंट्रल बँकेच्या तुमसर शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार केली. पटले हे कुक्कुटपालनाचा घरगुती व्यवसाय करतात. कॅशलेस व डिजीटल इंडियाचे स्वप्न पाहणार्‍या या देशात ग्रामीण भागातील जनतेची अशी फसवणूक होत आहे. हा गुन्हा सायबर क्राईमच्या कक्षेत हा मोडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...