Saturday 15 July 2017

डॉ. सुधीर भांडारकरांना उत्कृष्ट संशोधकाचा पुरस्कार


Dr. Sudhir Bhandarkar

नागपूर,दि.15- श्री शिवाजी साइंस कॉलेज नागपूर आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक संस्थेच्या सहयोगांने 'रीसेंट ट्रेंड इन साइंस एंड टेक्नोलॉजी: सस्टेनेबल डेवलपमेंट थ्रू साइंटिफिक एप्रोच' या विषयावर त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन नागपूच्या शिवाजी सायंस कॉलेजमध्ये (ता.12ते 14) करण्यात आले होते.
या परिषदेत देवरी येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुधीर भांडारकर यांना प्रतिष्ठेचा उत्कृष्ठ संशोधक पुरस्कार' देण्यात आला आहे.  डॉ. भांडारकर यांचे आता पर्यंत चाळीसच्या वर संशोधन पत्र आंतरराष्ट्रीय पत्रिकेत प्रकाशित झाले आहेत. ते अनेक आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेचे संपादक सुद्धा आहेत. पर्यावरण संवर्धनासंदर्भात त्यांनी अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय गोंदिया एजुकेशन सोसाइटीचे अध्यक्ष वर्षा पटेल,  राजेंद्र जैन, नरेंद्र जैन प्राचार्य डॉ देवेंद्र बिसेन, कुटुंबिय, विद्यार्थी, शिक्षकमित्र आणि सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहे. प्रा. भंडारकारांनी संशोधनात सहकार्य करणाऱ्या सर्वाचे आभार मानले आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...