Wednesday 19 July 2017

अहो साहेब! गवळीटोलावासींना पाणी पाजणार का?

पावसाचे पाणी गोळा करून तहान भागवतात नागरिक


चिचगड,१९(प्रतिनिधी)- देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाèया वांढरा ग्रामपंचायतीतील गवळीटोला येथे गेल्या तीन चार महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाई असून गावकèयांच्या विनवणीला प्रशासन नेहमी हुलकावणी देत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पावसाळा सुरू झाल्याने गावकरी घराच्या छपराचे पाणी पिण्यासाठी वापरत असल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी, अहो साहेब! आम्हाला पाणी पाजणार का?असा आर्त प्रश्न प्रशासनाला केला आहे. दरम्यान, देवरीचे गटविकास अधिकारी हिरुडकर यांनी तत्काळ व्यवस्था करीत असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.
सविस्तर असे की, देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वांढरा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे ४० घरांची वस्ती असलेल्या गवळीटोला या आदिवासी खेड्याचा समावेश होतो. या गावात पिण्याच्या पाण्यासाठी तीन हातपंप व २ विहिरींची सोय करण्यात आली आहे. गावातील तीनही हातपंप गेल्या तीनचार महिन्यापासून बंद आहेत आणि विहिरीमध्ये पाण्याचा टिपूस सुद्धा नाही. हातपंपाच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी सरपंच सुरेंद्र वारई आणि सचिव कढव यांना वारंवार केविलवाणी विनंती केली. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाला गावकèयांची कीव आली नसल्याचे गावकèयांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय म्हणजे जलस्वराज योजनेतून नळाद्वारे पाणीपुरवठ्याची असलेली सोय ही पांढरा हत्ती ठरली आहे. उन्हाळ्यात सुमारे दोन किलोमीटर अंतरावरून महिला पाण्यासाठी पायपीट करून कुटुंबीयांची तहान  भागवीत होते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने गावकरी ४-४ दिवस आंघोळीविना दिवस काढल्याचे आनंदाबाई अत्तरगडे, सरिपा तिरगम, तारा तिरगम, प्रतिमा नाटके, अंतकला फqटग, मंदा तिरगम, मनुका लोहंबरे, सिंधू फटिंग, हरिती तिरगम, टुकचंद तिरगम आणि दादाजी तिरगम या ग्रामसमस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, देवरीचे गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर यांचेशी संपर्क केला असता त्यांनी तत्काल हातपंप दुरुस्तीची व्यवस्था करीत असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...