Thursday, 13 July 2017

पुराडा येथे 'येडा' मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु

सुजित टेटे
देवरी,दि. १३- महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त आणि अतिशय मागास म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक आणि वैद्यकीय सोयीसुविधाचा कायम अभाव असलेल्या देवरी तालुक्यातील पुराडा या गावामध्ये सध्या "येडा" या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे.
ग्रामीण भागातिल कलावंतानां आपली कला जगासमोर दाखविन्याची संधी या भागातील होतकरु तरुण कलावंतानां मिळालेली आहे.
ग्रामीण भागातील तरुण सोयी सुविधेअभावी आपले कौशल्य जगासमोर दाखवू शकत नाही. या चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे तरुणमंडळी मध्ये उत्साह संचारला आहे.  नुकतेच या क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी चित्रीकरण स्थळी भेट देऊन कलावंतांना शुभेच्छा दिल्या.


No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...