Saturday 29 July 2017

देवरीत डाके आत्महत्याप्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा निषेध

देवरी,29(प्रतिनिधी)- बारामती झोन मधील केडगाव विभागात येणाऱ्या यवत वितरण केंद्रातील एका कर्मचाऱ्यांने सहायक अभियंत्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उडेजात आला आहे. या प्रकरणासंबंधाने महावितरणच्या देवरी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी काल शुक्रवारी (ता.28) देवरी येथे सभा घेऊन जाहीर निषेध केला
देवरी येथील महावितरणत्या विभागीय कार्यालयासमोर यवत वितरण केंद्रातील सहायक अभियंता पवार यांचे दडपशाहीचा निषेध करण्यासाठी सभेचे आयोजन काल शुक्रवारी करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशन चे विभागीय सचिव श्री विनोद चौरागडे  हे होते. यावेळी  देवरीचे शाखा सचिव जगदीशसिंग शेंगर, प्रितम राउत शाखा सचिव आमगांव,अमोल अमोल जीवनकर,विनोद भंडारकर,सुनील कुथे,दिनेश पटले उमेश पाटिल,अनिल मेंढे,ह्रषिकेश पिंजरकर,विलास वढाई,रवि भस्के,दिनेश कमरे,प्रभाकर नाट, दिलीप सहारे,सुनील बांत,सरिता सोरते,श्वेता अंबादे आणि कार्यालयीन कर्मचारी अधिकारी व बहुसंख्य विज कर्मचारी  उपस्थित होते   
  सविस्तर असे की, महावितरणच्या बारामती झोन मध्ये मोडणाऱ्या केडगाव विभागातील यवत या वीज वितरण केंद्रात कार्यरत राहुल माणिक डाके या तंत्रज्ञाने गेल्या 25 तारखेला आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्याला सहायक अभियंता पवार यांचेपासून मानसिक त्रास असल्याचे नमूद करीत आत्महत्येला त्यांना जबाबदार धरण्याविषयी लिहले होते. या प्रकरणी संपूर्ण राज्यातील महावितरणत्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. लहान कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अभियंते मानसिक त्रासाचे कृत्रिम दडपण निर्माण करीत असल्याचा आरोप महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे..



No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...