Thursday 13 July 2017

SBI ने ऑनलाइन बँकिंग केली 75% पर्यंत स्वस्त, 15 जुलैपासून मिळणार ग्राहकांना लाभ

SBI ने ऑनलाइन बँकिंग केली 75% पर्यंत स्वस्त, 15 जुलैपासून मिळणार ग्राहकांना लाभ
नवी दिल्ली -भारतीय स्टेट बँकेने  आपल्या ऑनलाइन बँकिंगला खूप स्वस्त केले आहे. याअंतर्गत एसबीआयने नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) वरील चार्ज 75 टक्क्यांपर्यंत स्वस्त केले आहेत. हा बदल 15 जुलैपासून लागू होईल. बँकेने देशभरात इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.
- एसबीआयचे मॅनेजिंग डायरेक्टर (एनबीजी) रजनीश कुमार म्हणाले की, चार्जमध्ये केलेली कपात इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सर्व्हिसेसद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर लागू असेल.
- भारताला डिजिटल इकॉनॉमी बनवण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न आणि आमच्या धोरणांनुसार आम्ही हे पाऊल उचलल्याचेही ते म्हणाले.
IMPS वरून 1000 रुपयांच्या फंड ट्रान्सफरवर चार्ज नाही
- याआधी एसबीआयने इमीडिएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस) च्या माध्यमातून 1000 रुपयांच्या फंड ट्रान्सफरवरील चार्ज काढले होते.
- बँकेने छोट्या रकमेसाठी डिजिटल ट्रान्झॅक्शन्सला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले होते. यापूर्वी एसबीआय 1000 रु. पर्यंतच्या आयएमपीएस ट्रान्झॅक्शनवर 5 रुपये आणि सर्व्हिस टॅक्स चार्ज करत होती.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...