Wednesday 5 July 2017

भूमीअभिलेख कार्यालयातील अभिलेखापाल ‘एसीबी’च्या जाळ्यात


जागेचे फेरफार करण्यासाठी केली २ हजाराच्या लाचेची मागणी
गडचिरोली,दि.5 : जागेचे फेरफार करण्यासाठी २ हजाराची लाच मागणाऱ्या भूमिअभिलेख कार्यालयातील अभिलेखापालास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  आज ५ जुलै रोजी रंगेहाथ पकडून अटक केली.
 नितिन सोनमारे (३६) असे आरोपीचे नाव असून तो कुरखेडा येथील भूमिअभिलेख कार्यालयात अभिलेखापाल पदावर कार्यरत आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  तक्रारकर्ता बेरोजगार युवक असून त्याच्या वडीलांना भाऊ हिस्स्याप्रमाणे कुरखेडा शहरात भूमापन क्रमांक ५०३ मधील  जागेवर वडीलोपार्जीत घर आणि खुली जागा मिळाली आहे. तक्रारकर्त्याच्या मोठ्या वडीलाचे निधन झाल्याने त्याच्या मुलाच्या नावे वारसदार म्हणून रेकार्डवर नाव नोंदवून वडीलोपार्जीत घर व खुल्या जागेचे फेरफार करण्याकरीता त्याने कुरखेडा येथील भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर काय कार्यवाही झाली हे पाहण्याकरीता त्याने अभिलेखापाल नितिन सोनमारे यांची भेट घेतली.  परंतु,  सोनमारे याने सबंधीत कामाकरीता  तक्रारदारास २ हजाराची मागणी  केली.तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्याने गडचिरोली येथील एसीबी कार्यालयाकडे तक्रार केली.
त्याअनुषंगाने एसीबीच्या पथकाने आज भूमिअभिलेख कार्यालयात सापळा रचला असता अभिलेखापाल सोनमारे यास  तक्रारदाराकडून २ हजार रूपये स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सदर कारवाई एसीबीचे पोलीस उपायुक्त पी.आर.पाटील, पोलीस उपअधीक्षक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस निरीक्षक एम.एम.टेकाम, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, रविंद्र कात्रोजवार, मिलींद गेडाम, देवेंद्र लोनबले, घनश्याम वडेट्टीवार यांनी केली.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...