Monday 10 July 2017

मुंबई विमानतळावर 'नमाज'; भाजपचा विरोध




मुंबई,दि.10- मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुस्लिम व्यक्तीने नमाज पढल्याने भाजप नेते विनीत गोयंका यांनी या नमाजाला कडाडून विरोध केला व याविरोधात धरणे आंदोलन केले. गोयंका यांनी मुंबई विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये सीआयएसएफ जवानांविरोधात तक्रारही दाखल केली आहे.

शनिवारी रात्री भाजप नेते विनीत गोयंका हे आपल्या पत्नीसह मुंबईवरून दिल्लीला एअर इंडियाच्या फ्लाइटने जाणार होते. विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना गँगवेमध्ये दोन मुस्लिम लोक नमाज पढताना दिसले. गोयंका यांनी यावर आक्षेप घेत याला विरोध केला व याची तक्रार सीआयएसएफ जवानांकडे केली. जर विमानतळावर नमाज पढण्यासाठी वेगळी जागा आहे तर गँगवेमध्ये नमाज का पढली जात आहे?, असा सवाल त्यांनी जवानांना केला.

नमाजावरून गोयंका आणि सीआयएसएफ जवानांमध्ये वाद झाला. त्यामुळे गोयंका यांनी दिल्लीला जाणारी फ्लाइट सोडली व विमानतळावर धरणे आंदोलन केले. गोयंका यांनी शनिवारी ८ वाजेपासून रविवारी सकाळी ११ वाजेपर्यंत धरणे आंदोलन केले. तसेच त्यांनी सीआयएसएफ जवान शशी सिंह आणि अन्य एका जवानाविरोधात मुंबई विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. विमानतळावर नमाज पढतानाचे रेकॉर्डिंग माझी पत्नी आपल्या मोबाईलमधून करत होती परंतु तो मोबाईल सीआयएसएफ जवानांनी हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही गोयंका यांनी आपल्या तक्रारीत केला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...